मुंबईत एका दिवसात 184 रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह, राज्यात कुठे किती नवे रुग्ण?

राज्यात आज (18 एप्रिल) दिवसभरात 328 जणांचा रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. धक्कादायक म्हणजे मुंबईत आज दिवसभरात तब्बल 184 रुग्ण वाढले आहेत.

मुंबईत एका दिवसात 184  रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह, राज्यात कुठे किती नवे रुग्ण?
Follow us
| Updated on: Apr 18, 2020 | 10:32 PM

मुंबई : महाराष्ट्रातील कोरोनाचा विळखा दिवसेंदिवस वाढत (Mumbai Highest Corona Patient) आहे. राज्यात आज (18 एप्रिल) दिवसभरात 328 जणांचा रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. धक्कादायक म्हणजे मुंबईत आज दिवसभरात तब्बल 184 रुग्ण वाढले आहेत. मुंबईतील ही आतापर्यंतची सर्वाधिक वाढ आहे. मुंबई महापालिकेच्या आरोग्य विभागाने याबाबतची माहिती दिली.

राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या 3 हजार 648 वर पोहोचली  आहे. राज्यात (Mumbai Highest Corona Patient) आज दिवसभरात 328 जणांचा रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. यातील 184 रुग्ण हे एकट्या मुंबईतील आहेत. तर पुण्यात 78 नव्या रुग्णांची वाढ झाली आहे.

मुंबईत आतापर्यंत सर्वाधिक कोरोना रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे मुंबईकरांची धाकधूक वाढली आहे. एकट्या मुंबईतील कोरोनाग्रस्तांचा आकडा दोन हजाराच्या पार गेल्याने धाकधूक वाढली आहे.

राज्यात कुठे किती नवे रुग्ण?

मुंबई – 184 पुणे – 78 अकोला – 1 अमरावती – 1 औरंगाबाद – 1 कल्याण डोंबिवली – 5 मिरा -भाईंदर – 11 नागपूर – 3 नंदुरबार – 1 नवी मुंबई – 2 पालघर – 7 पनवेल – 1 पिंपरी चिंचवड – 8 पुणे ग्रामीण – 1 रायगड – 5 सातारा – 4 सोलापूर – 2 ठाणे – 9 वसई विरार – 1 भिवंडी – 3

मुंबईची धाकधूक वाढली, सातहून अतिगंभीर वार्डमध्ये प्रत्येकी 110 पेक्षा अधिक रुग्ण

आतापर्यंत पाठविण्यात आलेल्या 67 हजार 468 नमुन्यांपैकी 63 हजार 476 जणांचे कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. तर 3 हजार 648 जण कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 82 हजार 299 लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. तर 6999 लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

आज राज्यात 11 करोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. कोरोनामुळे राज्यात झालेल्या मृत्यूंची संख्या आता 211 झाली आहे. या मृत्यूमध्ये मुंबई येथील 5 आणि पुणे 4 , औरंगाबाद आणि ठाण्यातील प्रत्येकी एकाचा समावेश आहे.

त्यात 6 पुरुष तर 5 महिला आहेत. त्यामध्ये 60 वर्षे किंवा त्यावरील 5 रुग्ण आहेत. तर 6 रुग्ण हे वय वर्षे 40 ते 60 या वयोगटातील आहेत. मृत्यू झालेल्या 11 जणांपैकी 9 रुग्णांमध्ये मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयरोग अशा स्वरुपाचे अतिजोखमीचे आजार आढळले आहेत.

आतापर्यंतची अपडेट आकडेवारी 

जिल्हारुग्णबरेमृत्यू
मुंबई34396231899511535
पुणे 4395624056968144
ठाणे 2930522748165873
पालघर 4987247852939
रायगड72974697611613
रत्नागिरी1233611646425
सिंधुदुर्ग67776359180
सातारा60722571201858
सांगली51829492941800
नाशिक1374491281672093
अहमदनगर79880763801171
धुळे1887016902337
जळगाव 69604630981542
नंदूरबार 1144810157229
सोलापूर59754563791859
कोल्हापूर 50144480561684
औरंगाबाद59429509871289
जालना1671315779394
हिंगोली 53424497100
परभणी93327943313
लातूर 2692725245716
उस्मानाबाद 1853317413576
बीड2079618513577
नांदेड 2617022710692
अकोला 2030216111404
अमरावती 4331838752567
यवतमाळ 2198918875497
बुलडाणा 2086517605270
वाशिम 1135210120169
नागपूर1735471529593584
वर्धा 1614314254325
भंडारा1460413711315
गोंदिया 1485814440175
चंद्रपूर2598724485422
गडचिरोली93258994103
इतर राज्ये (महाराष्ट्रात उपचार सुरु)146091
एकूण2314413213407252861
Non Stop LIVE Update
लोक कडाक्याच्या उन्हान हैराण अन भर उन्हाळ्यात पाण्यात बुडाल्या गाड्या?
लोक कडाक्याच्या उन्हान हैराण अन भर उन्हाळ्यात पाण्यात बुडाल्या गाड्या?.
अयोध्येत राऊत म्हणाले, आपण बंड करू; शिवसेना नेत्याच्या दाव्यानं खळबळ
अयोध्येत राऊत म्हणाले, आपण बंड करू; शिवसेना नेत्याच्या दाव्यानं खळबळ.
शिंदेंना शिवसेना संपवायची होती, 2013 मध्ये.. विचारेंचा मोठा गौप्यस्फोट
शिंदेंना शिवसेना संपवायची होती, 2013 मध्ये.. विचारेंचा मोठा गौप्यस्फोट.
शरद पवार गट काँग्रेसमध्ये विलीन होणार? एका मुलाखतीतून मोठा गौप्यस्फोट
शरद पवार गट काँग्रेसमध्ये विलीन होणार? एका मुलाखतीतून मोठा गौप्यस्फोट.
नॉट रिचेबल असणाऱ्या किरण सामंत यांच्याबद्दल नारायण राणे म्हणाले...
नॉट रिचेबल असणाऱ्या किरण सामंत यांच्याबद्दल नारायण राणे म्हणाले....
एसटी बँकेच्या संचालकपदाबाबत सदावर्ते दाम्पत्याला मोठा दणका
एसटी बँकेच्या संचालकपदाबाबत सदावर्ते दाम्पत्याला मोठा दणका.
दिल्ली गाजवणार मुंडेसाहेबांची लेक, कुठून आली तुतारी..,शिंदेंचा घणाघात
दिल्ली गाजवणार मुंडेसाहेबांची लेक, कुठून आली तुतारी..,शिंदेंचा घणाघात.
तुझी लायकी XXX...पवारांच्या कार्यकर्त्याला दादांच्या आमदारांची शिवीगाळ
तुझी लायकी XXX...पवारांच्या कार्यकर्त्याला दादांच्या आमदारांची शिवीगाळ.
मतदानावेळी ताई दादांच्या घरी? दादांच्या बंगल्यावर ताई का आल्या?
मतदानावेळी ताई दादांच्या घरी? दादांच्या बंगल्यावर ताई का आल्या?.
महाराष्ट्रात कुठं किती टक्के मतदान? कुठ झाली कमाल तर कुठं वाढल टेन्शन?
महाराष्ट्रात कुठं किती टक्के मतदान? कुठ झाली कमाल तर कुठं वाढल टेन्शन?.