नीता अंबानींकडून साईंच्या चरणी 1 कोटी 17 लाखांच्या वस्तू दान

'मुंबई इंडियन्स'च्या मालकीण नीता अंबानी (Nita Ambani) यांनी साई संस्थानला सुरक्षेसाठी लागणारं साहित्य दान दिलं. त्यांनी (Nita Ambani) बॅग स्कॅनर, फ्रेम डिटेक्टरसह 1 कोटी 17 लाख रूपयांच्या वस्तू दान स्वरुपात दिल्या.

नीता अंबानींकडून साईंच्या चरणी 1 कोटी 17 लाखांच्या वस्तू दान

शिर्डी : गुरूपौर्णिमेच्या निमित्ताने अनेक भाविकांनी साईबाबांना (Shirdi Sai Baba) कोट्यवधींचं दान दिलं. रोख रक्कम, सोनं, चांदी, ऑनलाईनद्वारे साईंच्या झोळीत 4 कोटी 52 लाखांचं दान प्राप्त झालं. तर दुसरीकडे बाबांवर श्रद्धा असणारे भाविक संस्थानला नित्य वापरातील उपयोगी साहित्यही दान स्वरुपात देतात. ‘मुंबई इंडियन्स’च्या मालकीण नीता अंबानी (Nita Ambani) यांनी साई संस्थानला सुरक्षेसाठी लागणारं साहित्य दान दिलं. त्यांनी (Nita Ambani) बॅग स्कॅनर, फ्रेम डिटेक्टरसह 1 कोटी 17 लाख रूपयांच्या वस्तू दान स्वरुपात दिल्या.

रिलायन्स इंडस्ट्रिजचे चेअरमन मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांच्या पत्नी नीता अंबानी या निस्सीम साईभक्त आहेत. नीता अंबानी वर्षातून दोन ते तीन वेळा हमखास साई दरबारी हजेरी लावतात. आयपीएलच्या सामन्यादरम्यानही त्यांनी साई दरबारी येऊन बाबांना साकड घातलं होतं. नीता अंबानी यांच्या मुंबई इंडियन्सने आयपीएलचं विजेतेपदही पटकावलं होतं.

यानंतर पुन्हा एकदा साईंच्या (Shirdi Sai Baba) निस्सीम भक्त असलेल्या नीता अंबानी यांनी कोट्यवधींचं उपयोगी साहित्य दान केलं. मुख्य प्रवेशद्वारावर अत्याधुनिक बॅग स्कॅनर, त्याचबरोबर फ्रेम डिटेक्टर, हँड मेटल डिटेक्टर आणि वॉकी टॉकीचे 77 संच असे एकूण 1 कोटी 17 लाखाचं साहित्य त्यांनी साईचरणी अर्पण केलं.

या वस्तू साईसंस्थान आजपर्यंत भाडेतत्वावर वापरत होतं. नीता अंबानी यांनी केलेल्या दानामुळे साईसंस्थानचे लाखो रूपये वाचणार आहेत. गुरूपौर्णिमेच्या दिवशी बॅग स्कॅनर मशिन शिर्डीत दाखल झाल्या होत्या. आता त्या चारही दरवाजावर बसवण्यात आल्या आहेत. नीता अंबानी यांनी दान केलेल्या 1 कोटी 17 लाख रुपयांच्या साहित्यामध्ये 45 लाख रुपयांचे बॅग स्कॅनर, 5 लाख रुपयांचे 55 हँड डिटेक्टर आणि 15 लाख रुपयांचे 77 वॉकी टॉकी यांचा समावेश आहे.

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI