TRP Scam | गुन्हे शाखेकडून आणखी 6 जणांना समन्स जारी, रिपब्लिकच्या अडचणीत वाढ

फेक टीआरपी प्रकरणी गुन्हे शाखेकडून टीआरपी स्कॅम केसमध्ये आणखी 6 जणांना समन्स जारी करण्यात आलं आहे. (Mumbai Police Summons 6 Republic senior person)

TRP Scam | गुन्हे शाखेकडून आणखी 6 जणांना समन्स जारी, रिपब्लिकच्या अडचणीत वाढ
Follow us
| Updated on: Oct 10, 2020 | 7:28 PM

मुंबई : टीआरपी घोटाळा प्रकरणी रिपब्लिक चॅनेल अडचणीत आलं असताना तसंच मुंबई पोलिसांनी रिपब्लिकच्या रिपोर्टरला समन्स बजावलेलं असताना आता गुन्हे शाखेकडून टीआरपी स्कॅम केसमध्ये आणखी 6 जणांना समन्स जारी करण्यात आलं आहे. त्यामुळे रिपब्लिक चॅनेलपुढच्या अडचणी वाढल्या आहेत. (Mumbai Police Summons 6 Republic senior person)

रिपब्लिकच्या 4 वरिष्ठ पदावरील व्यक्तींना समन्स जारी करण्यात आलंय. हंसा रिसर्च ग्रुपच्या दोघांना गुन्हे शाखेकडून समन्स बजावण्यात आल्याची माहिती आहे. गुन्हे शाखा उद्या (शनिवारी) आणखी 6 जणांची चौकशी करणार आहे.

विकास खानचंदानी (सीईओ रिपब्लिक), हर्ष भंडारी (सीओओ रिपब्लिक), प्रिया मुखर्जी (सीओओ रिपब्लिक), आणि घनश्याम सिंग (डिस्ट्रीब्युशन हेड ऑफ रिपब्लिक) यांना समन्स बजावण्यात आल्याची माहिती आहे.

टीआरपी घोटाळा प्रकरणी मुंबई पोलीस 5 जणांची चौकशी करणार होते. शिवा सुब्रम्हणयम,आईएफवो,रिपब्लिक चॅनेल, सॅम बलसारा , चेअरमन , मॅडसन जाहिरात कंपनी, शशी सिन्हा , लिंटास जाहिरात कंपनी, फक्त मराठी चॅनेलचे सी इ ओ आणि बॉक्स चॅनेलचे सीइओ यांची चौकशी होणार होती. मात्र,आजच्या चौकशीला केवळ मॅडसन कंपन चे मालक सॅम बालसारा आणि लिंटासचे शशी सिन्हा हे दोघेच हजर होते. बाकी सर्वांनी आपण बाहेर आहोत,असं सांगून चौकशीला दांडी मारली. सुमारे सात तासाच्या चौकशीनंतर त्या दोघांना सोडून देण्यात आलं.

मुंबई पोलिसांनी रिपब्लिक चॅनेलचा टीआरपी घोटाळा उघडकीस आणला आहे. बॅरोमिटरमध्ये फेरफार करून टीआरपी आकडे वाढवले जात होते.याबाबत मुंबई पोलिसांनी कारवाई करून जणांना अटक केली आहे. या व्यक्तींच्या चौकशीत आरोपींनी रिपब्लिक चॅनेल पैसे देऊन लोकांना आपलं चॅनेल बघायला भाग पाडत असल्याचं उघडकीस आलं आहे.यामुळे पोलिसांनी रिपब्लिक चॅनेलवर कारवाई करायला सुरुवात केली होती. त्यानुसार रिपब्लिक चॅनेलचं सी एफ वो शिवा सुब्रम्हणयम यांना आज क्राईम ब्रांच च्या अधिकाऱ्यांनी चौकशी साठी बोलावलं होतं.मात्र,त्या आधीच रिपब्लिक चॅनेलने सकाळीच सुप्रीम कोर्टात धाव घेतली आहे.

रिपब्लिक चॅनेलने घटनेच्या कलम 32 नुसार याचिका केली आहे. त्याचा क्रमांक 7848/2020 असा आहे. या याचिकेवर पुढील आठवड्यात सुनावणी होणार आहे. यामुळे आता हे प्रकरण सुप्रीम कोर्टात असल्याने आपण तपासाची घाई करू नये, अस शिवा सुब्रम्हणयम यांनी मुंबई पोलिसांनी पाठवलेल्या पत्रात म्हटलं आहे. (Mumbai Police Summons 6 Republic senior person)

संबंधित बातम्या

कंगनाच्या घराबाहेर गर्दी गोळा करुन भडकावल्याचा आरोप, मुंबई पोलिसांचा रिपब्लिक टीव्हीला समन्स

Sanjay Raut | टीआरपीसंदर्भात मुंबई पोलीस सत्य समोर आणतील: संजय राऊत

BARC Fake TRP Racket | अडाणी लोकांच्या घरातही इंग्रजी चॅनल, ‘रिपब्लिक’कडून TRP चा खेळ, दोन मालकांना अटक : मुंबई पोलीस

Non Stop LIVE Update
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.
शशिकांत शिंदेंचे घोटाळे दाबणार का?सवाल करत उदयनराजेंचा पवारांवर निशाणा
शशिकांत शिंदेंचे घोटाळे दाबणार का?सवाल करत उदयनराजेंचा पवारांवर निशाणा.
महायुतीत अद्याप 7 जागांचा पेच? पारंपारिक जागा भाजपला विरोधकांचा निशाणा
महायुतीत अद्याप 7 जागांचा पेच? पारंपारिक जागा भाजपला विरोधकांचा निशाणा.
मनामनातील सूनबाई, सुनेला पाठवा दिल्लीत अन् लेकीला...कुणी घेतला समाचार?
मनामनातील सूनबाई, सुनेला पाठवा दिल्लीत अन् लेकीला...कुणी घेतला समाचार?.
नवनीत राणांवर बोलताना संजय राऊत घसरले, बाई खुणावेल, डोळा मारेल पण...
नवनीत राणांवर बोलताना संजय राऊत घसरले, बाई खुणावेल, डोळा मारेल पण....
ईव्हीएम मशीनबद्दल कोर्टानं काय सांगितलं? याचिकाकर्त्यांना झापलं आणि...
ईव्हीएम मशीनबद्दल कोर्टानं काय सांगितलं? याचिकाकर्त्यांना झापलं आणि....
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?.
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण.