मुंबईत उद्या केवळ महिलांचे विशेष लसीकरण, ऑनलाइन पूर्व नोंदणी बंद राहणार

मुंबई मनपाच्या वतीने उद्या (17 सप्टेंबर) मुंबईतील सर्व शासकीय आणि महानगरपालिका कोविड-19 लसीकरण केंद्रांवर फक्त महिलांसाठी राखीव असे विशेष लसीकरण सत्र राबवले जाणार आहे.

मुंबईत उद्या केवळ महिलांचे विशेष लसीकरण, ऑनलाइन पूर्व नोंदणी बंद राहणार
कोरोना लसीकरण

मुंबई : कोविड-19 प्रतिबंध लसीकरण मोहिमेतंर्गत, बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वतीने उद्या शुक्रवारी (17 सप्टेंबर) सकाळी 10.30 ते सायंकाळी 6.30 या वेळेत, मुंबईतील सर्व शासकीय आणि महानगरपालिका कोविड-19 लसीकरण केंद्रांवर फक्त महिलांसाठी राखीव असे विशेष लसीकरण सत्र राबवले जाणार आहे. यामध्ये महिलांना थेट लसीकरण केंद्रावर येवून कोविड लसीची पहिली किंवा दुसरी मात्रा देखील घेता येणार आहे. या विशेष सत्राच्या कारणाने उद्यासाठीची ऑनलाइन पूर्व नोंदणी बंद ठेवण्यात येणार आहे. (Mumbai : special vaccinations for women only on 17th september, online pre-registration will be closed)

कोविड-19 विषाणू प्रतिबंधक लसीकरण अधिकाधिक वेगाने आणि सर्व स्तरातील नागरिकांपर्यंत नेण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिका देखील प्रयत्नशील आहे. त्यासाठी विशेष सत्र राबविण्यात येत आहेत. याचाच एक भाग म्हणून फक्त महिलांसाठी राखीव असे विशेष कोविड लसीकरण सत्र शुक्रवारी सकाळी 10.30 ते सायंकाळी 6.30 या वेळेत राबवले जाणार आहे.

मुंबईतील सर्व 227 निर्वाचन प्रभागांमधील लसीकरण केंद्र आणि त्यासोबत सर्व शासकीय व महानगरपालिका रुग्णालये आणि कोविड सेंटर येथील लसीकरण केंद्रावर थेट येवून (वॉक इन) महिलांना कोविड लस घेता येणार आहे. पहिली किंवा दुसरी मात्रा देखील या सत्रात दिली जाणार आहे. फक्त महिलांना लस दिली जाणार असल्या कारणाने, उद्या साठीची प्रचलित ऑनलाइन पूर्व नोंदणी बंद ठेवण्यात आली आहे.

भारतीय शास्रज्ञांनी कोरोनावर औषध शोधलं?

केंद्रीय औषध अनुसंधान केंद्र म्हणजेच ( CDRI ) सीडीआरआयसीच्या शास्रज्ञांनी कोरोनावर ( Corona ) मात करणारं औषध ( corona drug ) शोधल्याचा दावा केला आहे. हे देशातील पहिलं अँटीव्हायरल ड्रग ( Antiviral drug) असणार आहे, ज्याद्वारे कोरोना ( Covid ) उच्चाटनाचा दावा केला जात आहे. या औषधाचं नाव आहे उमिफेनोविर.( Umifenovir Drug) CDRIच्या दाव्यानुसार, आतापर्यंत 132 कोरोना रुग्णांवर याचा प्रयोग करण्यात आला, ज्यात या औषधाने कमाल केल्याचा दावा शास्रज्ञांनी केला आहे.

CDRI च्या शास्रज्ञांच्या दावानुसार हे औषध कोरोनाच्या डेल्टा प्लस व्हेरिएंटवरही काम करण्याची पूर्ण शक्यता आहे. कारण, डेल्टा व्हेरिएंटच्या रुग्णांवर उमिफेनोवीर हे औषध काम करत असल्याचं दिसलं आहे. CDRIच्या शास्रज्ञांचा दावा आहे की, हे औषध 5 दिवसांत रुग्णाच्या शरीरातील कोरोनाला संपवतं.

प्रयोगिक तत्त्वावर सध्या उमिफेनोविरचा उपयोग

CDRIचे संचालक तपस कुंडू यांच्या म्हणण्यानुसार, कोरोना महामारी आल्यानंतर संस्थेच्या 16 सदस्यांनी हे औषध प्रायोगिक तत्त्वावर कोरोना रुग्णांना देण्याची मागणी केली. 3 पातळ्यांवर हा प्रयोग झाला, ज्यात कमी लक्षणं असणाऱ्या आणि लक्षणं नसणाऱ्या कोरोना रुग्णांवर उमिफेनोविर प्रभावी ठरल असल्याचं दिसलं. या औषधाने कोरोनाचा रुग्णांवरील प्रभाव जवळपास संपुष्टात आणला. या औषधाचा 800MG चा डोस रुग्णांना 5 दिवसांत सकाळी आणि संध्याकाळी देण्यात आला. त्यानंतर हे औषध प्रभावी असल्याचं शास्रज्ञांना कळालं.

इतर बातम्या

मोठी बातमी! राज्य मागासवर्ग आयोगाचे सदस्य तायवाडे राजीनामा देणार, 27 टक्के आरक्षणासाठी केंद्राशी संघर्ष करणार

थांबवा हा अमानुषपणा! रेड्यांची झुंज लावून रचलेला जुगाराचा डाव उधळला, 12 रेड्यांच्या जोड्या पोलिसांकडून जप्त

रत्नागिरीत साकारणार सुपर मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल, रुग्णालयासाठी 5 एकर जागा देण्याचा निर्णय; चव्हाणांची माहिती

(Mumbai : special vaccinations for women only on 17th september, online pre-registration will be closed)

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI