थांबवा हा अमानुषपणा! रेड्यांची झुंज लावून रचलेला जुगाराचा डाव उधळला, 12 रेड्यांच्या जोड्या पोलिसांकडून जप्त

जालन्यातील परीकल्याण परिसरात पोलिसांनी ही कारवाई केली. या ठिकाणी 5 ते 25 हजार रुपयांपर्यंतच्या रकमेसाठी रेड्यांची टक्कर लावली होती. या झुंजीमध्ये जो रेडा हरतो, त्याच्याविरुद्ध असलेल्या मालकाला ही रक्कम देण्यात येणार होती.

थांबवा हा अमानुषपणा! रेड्यांची झुंज लावून रचलेला जुगाराचा डाव उधळला, 12 रेड्यांच्या जोड्या पोलिसांकडून जप्त
संग्रहित छायाचित्र

औरंगाबाद: जालना तालुक्यातील पीरकल्याण परिसरात हाल्यावर झुंज लावून जुगार खेळणाऱ्यांचा डाव पोलिसांनी उधळून लावला आहे. या प्रकरणी एकाला पोलिसांनी जेरबंद केले असून टोळीतील इतर साथीदारांचा शोध सुरु आहे. मात्र मूक्या प्राण्यांच्या शर्यती (Illegal animal race) लावून, त्यांच्या जीवाशी खेळ करणारी ही प्रवृत्ती समाजातून कधी नष्ट होईल, असा प्रश्न विचारला जात आहे. प्राण्यांच्या शर्यतीवर किंवा पैशांसाठी प्राण्यांचा वापर करून घेण्यावर कायद्याने बंदी असतानाही राज्यात अनेक ठिकाणी राजरोसपणे बैलांच्या, रेड्यांच्या झुंजी (Bedfellow race ) लावल्या जातात. अशा गैर प्रकारांची माहिती मिळताच, त्वरीत पोलिसांना कळवण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

5 ते 25 हजार रुपयांसाठी झुंज

जालन्यातील परीकल्याण परिसरात पोलिसांनी ही कारवाई केली. या ठिकाणी 5 ते 25 हजार रुपयांपर्यंतच्या रकमेसाठी रेड्यांची टक्कर लावली होती. या झुंजीमध्ये जो रेडा हरतो, त्याच्याविरुद्ध असलेल्या मालकाला ही रक्कम देण्यात येणार होती. विशेष म्हणजे या रेड्यांच्या झुंजीसाठी विविध जिल्ह्यांतून 10 ते 12 रेड्याच्या जोड्या पीरकल्याण परिसरात आणल्या होत्या. प्राण्यांची शर्यत लावण्यास कायद्याने बंदी असतानाही अशा झुंजींचे आयोजन केल्याचे उघडकीस आले. त्यामुळे तालुका पोलिसांनी अशा झुंजीच्या प्रकारावर कारवाई केली.

रेड्यांच्या झुंजींची माहिती त्वरीत कळवा

जालन्यातील पीरकल्याण परिसरात झालेल्या या पोलिसांच्या कारवाईमुळे एकच खळबळ माजली आहे. सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव असल्यामुळे गर्दी टाळण्याचे आवाहन पोलिसांकडून करण्यात येत आहे. तसेच धार्मिक स्थळांवर आणि इतरही ठिकाणी गर्दी होणारे कार्यक्रम आयोजित करू नये, असे नियमही शासनाकडून लागू आहेत. तसेच प्राण्यांच्या शर्यतीवर तर कायद्यानुसार आधीपासूनच निर्बंध आहेत. त्यामुळे कुठेही असा गैरप्रकार घडू लागल्यास सजग नागरिकांनी त्वरीत पोलिसांना याबद्दल माहिती द्यावी, असे आवाहन जालना पोलिस पथकाने केले आहे. सदरची कारवाई पोलीस अधीक्षक विनायक देशमुख, अप्पर पोलीस अधीक्षक विक्रांत देशमुख, डिवायएसपी सुनिल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली झाली.

ग्रामीण भागात राजरोसपणे होतात झुंजी

प्राण्यांच्या शर्यतीवर कायद्यानुसार बंदी घालण्यात आली आहे. मात्र अजूनही राज्यातील अनेक गावांमध्ये ठराविक उत्सवाच्या काळात गायी-बैलांना सजवून त्यांचा अमानुष छळ केला जातो. शर्यतीवर लाखोंच्या पैजा लावल्या जातात. अवघ्या काही तासात रेड्याचे मालक लाखो रुपये कमावतात. विशेष म्हणजे शेकडो लोक जमवून हा प्रकार घडवला जातो आणि पोलिसांना याची कानोकान खबरही नसते.

इतर बातम्या-

चंद्रपुरात वाघाच्या हल्ल्यात गुराख्याचा मृत्यू, यवतमाळमध्ये पट्टेदार वाघाचा वावर, शेतकऱ्यांत भीती

बंद पडलेल्या फ्रिजमधून अवैध बायोडिझेल विक्री, औरंगाबाद गुन्हे शाखेचा छापा, 23 हजार 40 हजारांचा ऐवज जप्त

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI