धक्कादायक: दोन मुलांसमोर जावयाकडून सासूवर चाकूचे वार, डोक्यात फरशी घालून खून, जालन्यात घटना

पती-पत्नीत वाद असल्याने मुलीला नांदायला पाठवण्यास सासूने नकार दिला होता. हाच राग मनात धरून विजय धिल्लोड याने सोमवारी रात्री सासूच्या डोक्यात चाकूने वार केले. एवढेच नव्हे तर फरशी मारून त्यांना मारहाणही केली. यातच त्यांची हत्या झाली.

धक्कादायक: दोन मुलांसमोर जावयाकडून सासूवर चाकूचे वार, डोक्यात फरशी घालून खून, जालन्यात घटना
दोन चिमुकल्यांसमोर जावयाने केला सासूचा खून
Follow us
| Updated on: Nov 24, 2021 | 3:42 PM

जालनाः भांडण झाल्यानंतर माहेरी गेलेली पत्नी वर्ष झालं तरी घरी नांदायला येत नाही, याचा राग आल्यानं जावयानं थेट सासूचाच निर्घृण खून (Murder) केल्याची घटना जालन्यात घडली. विशेष म्हणजे हा भयंकर प्रकार घडताना या जोडप्याची दोन मुलंही तिथं होती. दोन चिमुकल्यांसमोरच या इसमाने सासूवर चाकूचे वार केले. यात त्या महिलेचा मृत्यू झाला. जालना पोलिसात (Jalna Police) पत्नीने पतीविरोधात तक्रार दाखल केली.

औरंगाबादचे सासर, जालन्यात माहेरी गेली होती पत्नी

जालना शहरातील संभाजीनगर परिसरात सदर घटना सोमवारी मध्यरात्री घडली. या घटनेतील मृत महिलेचे नाव सखुबाई भीमसिंग काळे असे आहे. तर विजय किशन धिल्लोड असे आरोपीचे नाव आहे. औरंगाबाद येथील भीमनगर येथे राहणाऱ्या विजय किसन धिल्लोड याची पत्नी जालना येथे माहेर तिच्या आईकडे गेल्या काही वर्षांपासून राहते. घरात पती-पत्नी दरम्यान वाद होत असल्याने सासूने मुलगी ज्योती विजय धिल्लोड हिला नांदायला पाठवण्यास नकार दिला होता. हाच राग मनात धरून विजय धिल्लोड याने सोमवारी रात्री सासूच्या डोक्यात चाकूने वार केले. एवढेच नव्हे तर फरशी मारून त्यांना मारहाणही केली. यातच त्यांची हत्या झाली.

हत्या करून आरोपी फरार, 4 तासात पकडलं

सासूची एवढी क्रूर हत्या केल्यानंतर सदर आरोपी घटनास्थळावरून फरार झाला. पोलिसांनी रेल्वेस्टेशन, बसस्थानक आदी भागात शोध घेतला. अखेर शहरातील गांधी चमन भागात आरोपी झोपलेला दिसला. पोलिसांनी त्याला तत्काळ उचलले. दरम्यान गंभीर सखुबाई काळे यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं. आरोपीच्या पत्नीने दिलेल्या फिर्यादीवरून सदर बाजार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

इतर बातम्या-

एमपी गजब है, लेडीज स्पेशल वाईन शॉप उघडणार, चार शहरात ‘ओ वुमनियाचा’ प्रयोग, वाईन फेस्टिव्हलही घेणार

VIDEO: विलीनीकरण की पगारवाढ? एस.टी. कर्मचाऱ्यांच्या मागण्यांवर शरद पवारांनी अडचणी-पर्याय सविस्तर सांगितले

अखेर डिस्चार्ज अन् सैफ पहिल्यांदाच आपल्या चाहत्यांसमोर...बघा VIDEO
अखेर डिस्चार्ज अन् सैफ पहिल्यांदाच आपल्या चाहत्यांसमोर...बघा VIDEO.
पालकमंत्रीपद वाटपावरून आता राष्ट्रवादीत धुसफूस, दादांचे मंत्री नाराज
पालकमंत्रीपद वाटपावरून आता राष्ट्रवादीत धुसफूस, दादांचे मंत्री नाराज.
गुलाबी शाल, बुके अन्..दादांकडे बीडच पालकमंत्रीपद, पंकजाताईकडून अभिनंदन
गुलाबी शाल, बुके अन्..दादांकडे बीडच पालकमंत्रीपद, पंकजाताईकडून अभिनंदन.
सैफ आता सेफ! चाकू हल्ल्यानंतर अभिनेत्याला 6 दिवस उपचारानंतर डिस्चार्ज
सैफ आता सेफ! चाकू हल्ल्यानंतर अभिनेत्याला 6 दिवस उपचारानंतर डिस्चार्ज.
BEED : खंडणीची मागणी, तो CCTVपाहिला? कराडसह सर्व आरोपी एका फ्रेममध्ये
BEED : खंडणीची मागणी, तो CCTVपाहिला? कराडसह सर्व आरोपी एका फ्रेममध्ये.
बीडमध्ये चालंलय काय? मुलीचा HIV ने मृत्यू झाल्याची अफवा अन्...
बीडमध्ये चालंलय काय? मुलीचा HIV ने मृत्यू झाल्याची अफवा अन्....
दावोस दौऱ्यात चिमुकल्याकडून देवाभाऊंचं कौतुक, पुन्हा येईन म्हटलं होत..
दावोस दौऱ्यात चिमुकल्याकडून देवाभाऊंचं कौतुक, पुन्हा येईन म्हटलं होत...
पुण्यात दुर्मीळ आजार; दरवर्षी १ लाखांत एक बाधित, 'ही' लक्षणं दिसताच...
पुण्यात दुर्मीळ आजार; दरवर्षी १ लाखांत एक बाधित, 'ही' लक्षणं दिसताच....
बीडच्या 13 सरपंच, 418 सदस्यांना जिल्हाधिकाऱ्यांचा दणका, कारण नेमक काय?
बीडच्या 13 सरपंच, 418 सदस्यांना जिल्हाधिकाऱ्यांचा दणका, कारण नेमक काय?.
एकनाथ शिंदे पुन्हा का नाराज? दरे गावाला का गेले?; मोठं कारण आलं समोर
एकनाथ शिंदे पुन्हा का नाराज? दरे गावाला का गेले?; मोठं कारण आलं समोर.