एमपी गजब है, लेडीज स्पेशल वाईन शॉप उघडणार, चार शहरात ‘ओ वुमनियाचा’ प्रयोग, वाईन फेस्टिव्हलही घेणार

राज्याच्या तिजोरीवरचा भार हलका करण्यासाठी मध्य प्रदेश सरकार आता मद्यविक्रीतून अधिक महसूल उभारण्याच्या तयारीत आहे. यासाठी आता राज्यातील चार शहरांमध्ये महिलांसाठी खास वाइन शॉप उभारले जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. एप्रिल 2022 पर्यंत ही वुमन वाइन शॉप सुरु होतील, असा अंदाज आहे.

एमपी गजब है, लेडीज स्पेशल वाईन शॉप उघडणार, चार शहरात 'ओ वुमनियाचा' प्रयोग, वाईन फेस्टिव्हलही घेणार
मध्य प्रदेश सरकार खास महिलांसाठीचे वाइन शॉप उघडण्याच्या तयारीत


भोपाळः मद्यविक्री वाढवण्यासाठी मध्य प्रदेश सरकारनं अफलातून फंडा काढला आहे. राज्यातील चार प्रमुख शहरांमध्ये प्रथमच वुमन वाइन शॉप (Woman Wine Shop) उघडले जाणार आहेत. वाचायला थोडं कठीण जात असेल मात्र येत्या एप्रिल 2022 पर्यंत मध्यप्रदेशात अशी खास महिलांसाठीची दुकानं थाटलेली तुम्हाला आम्हाला पाहता येतील. राज्यात उमा भारतीसारख्या (Uma Bharati) फायरब्रँड महिला नेत्या दारूविक्रीविरोधात आक्रमक भूमिका घेत असल्या तरीही महसूल मिळवण्यासाठी मध्य प्रदेश सरकारदेखील (Madhya Pradesh) तितकेच आग्रही आहे. त्यामुळे सरकारी तिजोरी भरण्यासाठी सरकार महिलांसाठीचे वाइन शॉप (Wine Shop) उघडण्याच्या तयारीला लागल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

भोपाळ, जबलपूर, इंदौर, ग्वाल्हेरमध्ये थाटणार!

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मध्य प्रदेश सरकार सुरुवातीला राज्यातील चार महानगरांमध्ये महिलांसाठीचे खास वाईन शॉप उघडणार आहेत. दिल्ली-मुंबई अशा मेट्रो सिटीच्या धर्तीवर मध्य प्रदेश सरकारने हा निर्णय घेतला असून या दुकानांमध्ये महिलांसाठीच्या सर्व ब्रँडची वाईन मिळेल. या चार शहरांमध्ये भोपाळ, जबलपूर, इंदौर आणि ग्वाल्हेर अशा चार शहरांचा समावेश आहे. इथे फक्त महिलांसाठी, महिलांना आवडणारी मद्यविक्री केली जाईल.

महिलांच्या सुरक्षेचीही काळजी घेणार!

महिलांना अगदी बिनधास्तपणे या वाइन शॉपचा आनंद घेता यावा, यासाठी मध्य प्रदेश सरकारतर्फे विशेष काळजीदेखील घेतली जाणार आहे. आगामी एप्रिल महिन्यापर्यंत ही दुकाने सुरु होणार असली तरही आठवड्यातील काही दिवसच ती सुरु राहती. तसेच महिलांसाठीचे हे वाइन शॉप मॉल्ससारख्या सुरक्षित ठिकाणी घडली जातील. जेणेकरून तेथे महिला सहजपणे पोहोचू शकतील आणि त्यांच्या सुरक्षेची काळजीही घेतली जाईल.

महिलांसाठी वाइन फेस्टिवलदेखील!

महिलांसाठी सुरु करण्यात येणाऱ्या या वाइन शॉपला किती प्रतिसाद मिळतोय, याची चाचपणीदेखील मध्यप्रदेश सरकारतर्फे केली जाईल. त्यानंतर वाइन शॉपमध्ये येण्यासाठी तसेच वाइन खरेदीसाठी महिलांना प्रोत्साहन दिले जाईल. याकरिता वाइन फेस्टिवलचेही आयोजन केले जाऊ शकते. दरम्यान, सध्या तरी महसूल विभागाकडे यासंदर्भातील ठोस आदेश आलेले नसले तरीही येत्या काळात मध्य प्रदेशात वुमन वाइन शॉपचे चकाचक दृश्य दृष्टीस पडू शकते.

फायरब्रँड उमा भारती मात्र दारुबंदीसाठी आक्रमक

मद्यविक्रीला प्रोत्साहन देण्यासाठी आणि त्यातून मिळणाऱ्या महसूलावर मध्य प्रदेश सरकारचा डोळा असला तरी सरकारमधीलच एक मंत्री दारुबंदीसाठी अत्यंत आक्रमक झालेल्या आहेत. भाजपच्या फायरब्रँड म्हणवल्या जाणाऱ्या उमा भारती यांनी काही दिवसांपूर्वीच सरकारला दारुबंदीवरून घेरलं आहे. 15 जानेवारी 2022 पर्यंत सरकारनं दारुबंदी केली नाही तर सरकारविरोधात आंदोलन करणार, असा इशाराही त्यांनी दिला आहे. त्यामुळे उमा भारतींच्या या विरोधासमोर सरकारची योजना कितपत तग धरते, हेही पाहणे औत्सुक्याचे ठरेल.

इतर बातम्या-

Nashik: व्हिस्की, रम अन् बरंच काही…बंदी असलेले 10 लाखांचे विदेशी मद्य, 105 बॉक्स जप्त

औरंगाबादेत लस नाही तर दारूही नाही, दुकानांवर प्रमाणपत्र आवश्यक, टक्का वाढवण्यासाठी जिल्हाधिकारी आक्रमक

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI