Nashik: व्हिस्की, रम अन् बरंच काही…बंदी असलेले 10 लाखांचे विदेशी मद्य, 105 बॉक्स जप्त

कोरोना काळात मद्याची दुकाने बंद होती. तेव्हापासून मद्य तस्करीच्या प्रमाणात वाढ झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

Nashik: व्हिस्की, रम अन् बरंच काही...बंदी असलेले 10 लाखांचे विदेशी मद्य, 105 बॉक्स जप्त
संग्रहित छायाचित्र.
Follow us
| Updated on: Nov 17, 2021 | 3:55 PM

नाशिकः महाराष्ट्रात बंदी असलेला तब्बल 10 लाख 4 हजार रुपयांचा विदेशी मद्यसाठा नाशिक पोलिसांनी जप्त केला आहे. मुंबई आग्रा रोडवरील शिवाजी पुतळ्याच्या समोर पाथर्डी फाटा या ठिकाणी ही कारवाई करण्यात आली. पोलिसांनी एकूण 105 बॉक्स जप्त केलेत. त्यात व्हिस्की, रम पासून अनेक प्रकारचे मद्य आढळले.

डोळ्यात तेल घालून पहारा…

नाशिकमध्ये सध्या राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून कारवाई सुरू आहे. त्यात मद्याची अवैध विक्री, निर्मिती विरोधात धडक मोहीम राबवण्यात येत आहे. त्यासाठी पथके डोळ्यात तेल घालून रात्रीचा दिवस करत आहेत. मुंबई आग्रा रोडवरील शिवाजी पुतळ्यासमोरही पथकाची गस्त सुरू होती. येणाऱ्या आणि जाणाऱ्या प्रत्येक वाहनाची कसून झडती आणि वाहन चालकाची चौकशी सुरू होती. यावेळी एका वाहनात पथकाला महाराष्ट्रात बंदी आणि गोव्यात विक्रीसाठी परवानगी असलेला मोठा मद्यसाठा आढळून आला.

या प्रकारचे मद्य…

पथकाने एकूण एकशे पाच मद्याचे बॉक्स जप्त केले. त्याची किंमत अंदाजे दहा लाख चार हजारांच्या घरात आहे. यामध्ये बॉम्बे व्हिस्की 750 मिली क्षमतेच्या 420 सीलबंद बॉक्स, गोल्डन एस. व्हिस्कीच्या 750 मिली क्षमतेचे 35 बॉक्स, ब्लॅक रमच्या 750 मिली क्षमतेच्या 420 सीलबंद बाटल्याचे 35 बॉक्स असे एकूण 105 बॉक्स सापडले. यावेळी पोलिसांनी आरोपींनाही बेड्या ठोकल्या.

आरोपी कोल्हापूरचे

पोलिसांनी संशयित आरोपी अतुल तानाजी कांबळे (वय 32, रा. गडमुडशिंगी, ता. करवीर, जिल्हा कोल्हापूर) तसेच दुसरा आरोपी सचिन सदाशिव कांबळे (वय 19, रा. गांधीनगर, ता. करवीर, जि. कोल्हापूर) यांना ताब्यात घेतले आहे. सोबतच आरोपींनी मद्य साठ्याच्या वाहतुकीसाठी वापरलेले चारचाकी वाहनही पोलिसांनी जप्त केले आहे.

इतर आरोपींचा शोध सुरू

पोलिसांनी या प्रकरणात इतर आरोपी आहेत का, याचा शोध सुरू केला आहे. गोव्यामध्ये परवानगी आणि महाराष्ट्रात बंदी असलेले मद्य विकण्याची एक साखळी असेल. हे मद्य विशिष्ट दुकानापर्यंत पोहचवले जात असेल किंवा हे मद्य खरेदी करणारे काही व्यावसायिक असतील. त्यांची साखळी समोर आणण्याचे मोठे आव्हान आता पोलिसांसमोर आहे. दरम्यान, कोरोना काळात मद्याची दुकाने बंद होती. तेव्हापासून मद्य तस्करीच्या प्रमाणात वाढ झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

इतर बातम्याः

अशोक चव्हाण यांच्या कुटुंबाला 300 कोटींचे कर्ज दिले, आता नांदेड, धर्माबादला जाणार; किरीट सोमय्यांचा इशारा

इतिहास बदलण्याचा प्रयत्न करू नये, महागाईचा मुद्दा बाजूला अन् केवळ हिंदू-मुस्लीमवर चर्चा, भुजबळांचे वर्मावर बोट

Osmanabad: खासदार ओमराजेंनी काढली SBI अधिकाऱ्याची खरडपट्टी; शेतकरी कर्जासाठी गेले की, तोंडावर कागदं फेकायचे!

Non Stop LIVE Update
भरसभेत पवारांनी लावला मोदींचा व्हिडीओ, तर शिंदे-फडणवीसांकडून पलटवार
भरसभेत पवारांनी लावला मोदींचा व्हिडीओ, तर शिंदे-फडणवीसांकडून पलटवार.
बीडमध्ये जातीचं कार्ड कोण खेळतंय? कुणबीपत्रावरून धनंजय मुंडेंचं विधान
बीडमध्ये जातीचं कार्ड कोण खेळतंय? कुणबीपत्रावरून धनंजय मुंडेंचं विधान.
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.