नागपुरात कोरोनाबाधितांचा आकडा वाढताच, 24 तासात 63 जणांना कोरोनाची लागण

नागपुरात गेल्या 24 तासात 63 कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली आहे. त्यामुळे कोरोनाबाधितांचा आकडा 225 वर पोहोचला (Nagpur Corona Positive Patient) आहे.

नागपुरात कोरोनाबाधितांचा आकडा वाढताच, 24 तासात 63 जणांना कोरोनाची लागण

नागपूर : राज्यातील कोरोनाबाधितांचा आकडा 16 हजार 758 वर पोहोचला (Nagpur Corona Positive Patient) आहे. नागपुरात गेल्या 24 तासात 63 कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली आहे. आज जवळपास 19 जणांचे रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे नागपुरातील कोरोनाबाधितांचा आकडा 225 वर पोहोचला आहे.

नागपुरातील सतरंजीपुरा परिसर कोरोनाचे हॉटस्पॉट बनला आहे. या ठिकाणी (Nagpur Corona Positive Patient) कोरोना रुग्णांची संख्या आणखी वाढली आहे. नागपूरमध्ये आज आणखी 19 जणांचे कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. तर काल (6 एप्रिल) आणि आज एकूण 63 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे 24 तासाचा कोरोनाबाधितांचा आकडा 63 वर पोहोचला आहे.

नागपूरातील सतरंजीपूरा परिसर कोरोना साखळीचं सर्वात मोठं केंद्र आहे. या परिसरात एका व्यक्तीपासून सुरु झालेला कोरोना संसर्ग अद्यापही थांबण्याचं नाव घेत नाही. या परिसरातील कोरोना रुग्णांची संख्या शंभरीच्या पुढे गेली आहे. शिवाय या भागातून क्वारंटाईन केलेल्या नागरिकांचे नमुने पॉझिटिव्ह येण्याचं सत्र सुरुच आहे.

नागपुरातील सतरंजीपुरा परिसरातील कोरोना रुग्णांची संख्या शंभरीवर पोहोचली आहे. या ठिकाणी एका रुग्णापासून 65 पेक्षा जास्त जणांना संसर्ग झाला आहे. सतरंजीपुऱ्यातील 1700 पेक्षा जास्त जणांना क्वारंटाईन करण्यात आले आहे.

नागपुरातील सतरंजीपुरा परिसरात कोरोनाची साखळी खंडीत करण्यासाठी मनपाचे युद्ध पातळीवर प्रयत्न सुरु आहे. या परिसरातील रस्ते सील करण्यात आले आहे. तसेच छोट्या छोट्या गल्ल्याही सील करण्यात आल्या आहेत. या ठिकाणी पोलीस आणि सीआरपीएफ तैनात करण्यात आले आहेत. तसेच परिसरात ड्रोननेही नजर ठेवली जात (Nagpur Corona Positive Patient) आहे.

संबंधित बातम्या : 

नागपुरात एका दिवसातील सर्वाधिक रुग्ण, 11 दिवसांत कोरोना रुग्णांची संख्या दुप्पट

औरंगाबादमध्ये रुग्णांचा आकडा वाढताच, सकाळी आणखी 17 नवे कोरोना रुग्ण

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI