नागपूर जिल्ह्यातील रुग्णसंख्या लाखाच्या उंबरठ्यावर, मात्र 1300 गावांनी कोरोनाला वेशीवरच रोखलं

नागपूर जिल्ह्यात 1300 गावांना वेशीवरच कोरोनाला रोखण्यात यश आलं आहे

नागपूर जिल्ह्यातील रुग्णसंख्या लाखाच्या उंबरठ्यावर, मात्र 1300 गावांनी कोरोनाला वेशीवरच रोखलं
Follow us
| Updated on: Oct 29, 2020 | 9:53 AM

नागपूर : नागपूर जिल्ह्यात 1300 गावांना वेशीवरच कोरोनाला रोखण्यात यश आलं आहे (Nagpur District 1300 Villages). तर दुसरीकडे, जिल्ह्यातील कोरोना रुग्णसंख्या लाखाच्या उंबरठ्यावर पोहोचली आहे (Nagpur District 1300 Villages).

नागपूर जिल्ह्यात गेल्या 24 तासांत 342 नव्या कोरोना रुग्णांची भर पडली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील रुग्णसंख्या 94 हजार 575 वर पोहोचली आहे. कोरोना रुग्णसंख्या लाखाच्या उंबरठ्यावर असली, तरीही जिल्ह्यातील 1867 गावांपैकी तब्बल 1300 गावांनी कोरोनाला गावाच्या वेशीवरंच रोखलं आहे.

गेल्या सात महिन्यात या 1300 गावांमध्ये कोरोनाने शिरकाव केला नाही. एप्रिल, मे, जून आणि जुलै या काळात नागपूर शहरातील कोरोना रुग्णसंख्या वेगाने वाढत होती. त्यावेळेस खबरदारी म्हणून जिल्ह्यातील बऱ्याच गावांनी आपल्या सीमा सील केल्या होत्या. नवीन व्यक्तीला गावात प्रवेश नव्हता, गावातून शहरात जाण्याचं प्रमाण कमी केलं होतं, त्याचंच यश म्हणून आजपर्यंत तब्बल सात महिने गावकऱ्यांनी जिल्ह्यातील 1300 गावांमध्ये कोरोनाला शिरकाव करु दिला नाही (Nagpur District 1300 Villages).

जिल्हा परिषदेच्या जनजागृतीचा गावांना फायदा या गावांना झाला. त्यामुळे 1300 गावांनी गावामध्या कोरोनाचा शिरकाव होऊ दिला नाही.

नागपूर जिल्ह्यातील 1300 गावांमध्ये आतापर्यंत कोरोनाचा शिरकाव झाला नाही. यात नागपूर जिल्हा प्रशासन आणि जिल्हा परिषदेची महत्त्वाची भूमिका आहे. कोरोनाचा प्रसार वाढत असताना, गावांमध्ये जनजागृती, बाहेरुन आलेल्या व्यक्तीला सक्तीनं 14 दिवस क्वॉरंटाईन करणे आणि गावं सुरक्षित राहिल याची काळजी घेणे. या सर्व बाबींकडे जिल्हा परिषदेनं जातीनं लक्ष दिलं. त्यामुळेच सात महिन्यात जिल्ह्यातील या 1300 गावांनी कोरोनाला वेशीवरंच रोखलं.

Nagpur District 1300 Villages

संबंधित बातम्या :

Corona Vaccine | पहिल्या टप्प्यातील काही किंवा सर्वच लसी अपयशी ठरण्याची शक्यता, युके वॅक्सिन टास्क फोर्स अध्यक्षांचा दावा

आनंदाची बातमी: राज्यात सलग दुसऱ्या दिवशी कोरोना रुग्णांच्या संख्येत लक्षणीय घट

Non Stop LIVE Update
मनसेच्या नेत्यावर 5 कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप, कुणी केली तक्रार?
मनसेच्या नेत्यावर 5 कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप, कुणी केली तक्रार?.
ज्यांनी पत्नीला सोडलं..., शरद पवारांवरील टीकेनंतर मोदींवर कुणाची टीका?
ज्यांनी पत्नीला सोडलं..., शरद पवारांवरील टीकेनंतर मोदींवर कुणाची टीका?.
मोदी महानटसम्राट...काँग्रेसच्या बड्या नेत्याची पतंप्रधानांवर खोचक टीका
मोदी महानटसम्राट...काँग्रेसच्या बड्या नेत्याची पतंप्रधानांवर खोचक टीका.
दादा आवाज येत नाही, अजितदादांकडून कार्यकर्त्यांची फिरकी, काय दिल उत्तर
दादा आवाज येत नाही, अजितदादांकडून कार्यकर्त्यांची फिरकी, काय दिल उत्तर.
ठाकरे गटाच्या 'त्या' जाहिरातीत पॉर्नस्टार? चित्रा वाघ यांचा आक्षेप काय
ठाकरे गटाच्या 'त्या' जाहिरातीत पॉर्नस्टार? चित्रा वाघ यांचा आक्षेप काय.
'तर मोदींनी ते कृत्य केलं नसतं', संजय राऊतांचा पंतप्रधानांवर हल्लाबोल
'तर मोदींनी ते कृत्य केलं नसतं', संजय राऊतांचा पंतप्रधानांवर हल्लाबोल.
अंधारेंना घेण्यासाठी हेलिकॉप्टर आलं अन्...नको ते घडलं, नेमकं काय झालं?
अंधारेंना घेण्यासाठी हेलिकॉप्टर आलं अन्...नको ते घडलं, नेमकं काय झालं?.
संविधान संपवण्याचा भाजपचा गेम? मोदींनी विरोधकांना फटकारलं; म्हणाले...
संविधान संपवण्याचा भाजपचा गेम? मोदींनी विरोधकांना फटकारलं; म्हणाले....
ही गोष्ट तुमच्या तोंडून...,शरद पवारांवरील मोदींच्या टीकेवर प्रत्युत्तर
ही गोष्ट तुमच्या तोंडून...,शरद पवारांवरील मोदींच्या टीकेवर प्रत्युत्तर.
पक्षप्रवेशाविनाच खडसे भाजप कार्यालयात अन्...सर्वांच्या भुवया उंचावल्या
पक्षप्रवेशाविनाच खडसे भाजप कार्यालयात अन्...सर्वांच्या भुवया उंचावल्या.