आकर्षक व्याज आणि बोनसचं आमिष, गुंतवणूकदारांचे 35 कोटी घेऊन संचालक फरार; नागपूर पोलिसांकडून शोध सुरु

Nupur Chilkulwar

|

Updated on: Nov 09, 2020 | 12:37 PM

व्याजाचे आमिष दाखवून नागपुरात तब्बल 35 कोटी रुपयांची फसवणूक झाल्याचं उघडकीस आलं आहे.

आकर्षक व्याज आणि बोनसचं आमिष, गुंतवणूकदारांचे 35 कोटी घेऊन संचालक फरार; नागपूर पोलिसांकडून शोध सुरु

नागपूर : व्याजाचे आमिष दाखवून नागपुरात तब्बल 35 कोटी रुपयांची फसवणूक झाल्याचं उघडकीस (Nagpur Fraud Case) आलं आहे. गुंतवणूकदारांचे 35 कोटी रुपये लुटून एका कंपनीचे संचालक पसार झाले आहेत. एजीएम कॅार्पोरेशन डिजीटल ॲडव्हटाईजमेंट असं या गंडा घालणाऱ्या कंपनीचं नाव आहे. या प्रकरणी कंपनीच्या तीन संचालकांविरोधात सीताबर्डी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे (Nagpur Fraud Case).

एजीएम कॅार्पोरेशन डिजीटल ॲडव्हटाईजमेंट या कंपनीने व्याजाचे आमिष दाखवून गुंतवणूकदारांची फसवणूक केल्याचा आरोप आहे. या कंपनीने गुंतवणूकदारांना व्याजाचं आमिष दाखवून त्यांची तब्बल 35 कोटींची फसवणूक करण्यात आली आहे. सध्या या कंपनीचे संचालक फरार आहे. या कंपनीने अनेकांना गंडा घातला आहे.

सुनील कोल्हे, पंकज कोल्हे आणि भरत शाहू असं आरोपी संचालकांची नावं आहेत. या तीन संचालकांनी गुंतवणूकदारांना आकर्षक व्याज आणि बोनसचे आमिष दाखवून आकर्षित केले. त्यामुळे मोठे व्यापारी, उद्योजक आणि नोकरदारांनी या  कंपनीत मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केली.

मात्र, गुंतवणूकदारांना पैसे परत न करता या संचालकांनी पळ काढला. ही बाब गुतंवणूकदारांच्या लक्षात येताच त्यांनी पोलिसांत धाव घेतली. या विरोधात सीताबर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस सध्या या प्रकरणातील आरोपींचा शोध घेत आहेत.

Nagpur Fraud Case

संबंधित बातम्या :

वृद्धाच्या भोळेपणाचा फायदा घेत एटीएमचा पिन मिळवला, खात्यातून 80 हजार लंपास

प्रेयसीला गाडीवर फिरवायचं आहे, भाच्याकडून मावशीचे दागिने लंपास

Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI