खेड्यात ऑनलाईन शिक्षणाचा खेळखंडोबा, मोबाईलसाठी विद्यार्थी मजुरीला

शाळा बंद असल्याने विदर्भातल्या खेड्यांमधील 80 टक्के विद्यार्थी सध्या शेतात राबत आहेत. (Nagpur Student working in farm for buying smartphone online study)

खेड्यात ऑनलाईन शिक्षणाचा खेळखंडोबा, मोबाईलसाठी विद्यार्थी मजुरीला

नागपूर : कोरोनामुळे शाळा बंद असल्याने शहरांमध्ये ऑनलाईन शिक्षण सुरु आहे. पण गावांमध्ये विद्यार्थ्यांची शाळा थेट शेतात भरते आहे. आधीच आभाळभर संकट, त्यात यंदा सोयाबीनचं पीक हातचं गेलं. पोट भरण्याचाच प्रश्न, तिथं ऑनलाईन शिक्षणासाठी मोबाईल कसा घेणार? त्यामुळे शेतकरी आणि शेतमजुरांची मुलं 150 रुपये मजुरीने 8 ते 10 तास काबाडकष्ट करतायत. शाळा बंद असल्याने विदर्भातल्या खेड्यांमधील 80 टक्के विद्यार्थी सध्या शेतात राबत आहेत. (Nagpur Student working in farm for buying smartphone online study)

सुहाळ महाकळकर ही विद्यार्थिनी इयत्ता आठवीत शिकते. कोरोनामुळे शाळा बंद आहे, ऑनलाईन शिक्षणासाठी मोबाईल नाही, वडिलांचं सोयाबीनचं पीक गेल्यानं परिस्थिती अजूनच बिटक असल्याने मोबाईल घेण्यासाठी ती 150 रुपये रोजंदारीवर शेतात कापूस वेचणीच्या कामाला लागली आहे. दिवसभर 8 ते 10 तास काबाडकष्ट केल्यानंतर तिला 150 रुपये मिळणार आहे. हेच पैसे गोळा करुन ती मोबाईल घेण्याचा विचार करत आहे.

तर दुसरीकडे अनू बदखल आणि तिच्या मैत्रिणींची कहाणीही काही वेगळी नाही. ऑनलाईन शिक्षण घ्यायचं तर मोबाईल हवा, त्याला इंटरनेटची सोय हवी. जिथं गावांमध्ये मजूर आणि गरीब शेतकऱ्यांना जगण्याचाही प्रश्न आहे, तिथे हे ऑनलाईन शिक्षणाचं सोंग कसं साजरं करायचं? हाच मोठा प्रश्न आहे. त्यामुळेच या विद्यार्थिनी उन्हातान्हात शेतात राबतात.

आपल्या डोळ्यादेखत मुलांचं नुकसान होत असल्यानं विद्यार्थिनीच्या पालकांनाही पाहवंत नाही. पण गरिबीला गत नाही आणि शेतीत राबल्याशिवाय होत नाही…अशीच पालकांचीही परिस्थिती आहे.

कोरोनामुळे शाळा बंद असल्याने, सरकार आणि शाळांनी ऑलाईन शिक्षणाचा पर्याय निवडला. पण या ऑनलाईन शिक्षणाचा गावांमध्ये काहीही फायदा होत नाही. खेड्य़ांमध्ये सुविधा नाही. याचा विचार होणं गरजेचं होतं. पण तसं झालं नाही. आता विदर्भातील खेड्यातल्या 80 टक्के मुलांना या ऑनलाईन शाळेचा फायदाच झाला नाही, त्यांची शाळा भरली ती शेतात. मग हे विद्यार्थी परिक्षेत कशे तग धरणार? हाच मोठा प्रश्न आहे. (Nagpur Student working in farm for buying smartphone online study)

संबंधित बातम्या : 

उल्हासनगर मच्छी मार्केटवर पालिकेची धडक कारवाई, गळ्यावर सुरा ठेवून विक्रेत्याचा विरोध

राज्यभरात मुसळधार पाऊस; कोकण, मराठवाड्यासह विदर्भात कोसळधार

Published On - 9:38 am, Thu, 15 October 20

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI