नागपुरात पोलिसांकडून अल्पवयीन आरोपींची अर्धनग्न अवस्थेत धिंड, आयुक्तांचे चौकशीचे आदेश

या आरोपींच्या हाताला दोरखंड बांधून त्यांना धडा शिकविण्यासाठी अर्धनग्न अवस्थेत त्यांना रस्त्यावर फिरवत त्यांची धिंड काढण्यात आली

नागपुरात पोलिसांकडून अल्पवयीन आरोपींची अर्धनग्न अवस्थेत धिंड, आयुक्तांचे चौकशीचे आदेश

नागपूर : नागपूरच्या जरिपटका भागातील रॉयल बारमध्ये तलवारीच्या धाकावर तोडफोड (Nagpur Police Minor Accused) करणाऱ्या आरोपींना पोलिसांनी अर्धनग्न अवस्थेत रस्त्यावर फिरवल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. या आरोपींच्या हाताला दोरखंड बांधून त्यांना धडा शिकविण्यासाठी अर्धनग्न अवस्थेत त्यांना रस्त्यावर फिरवत त्यांची धिंड काढण्यात आली (Nagpur Police Minor Accused).

या आरोपींना अर्धनग्न रस्त्यावर फिरवल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला. मात्र, आरोपी अल्पवयीन असल्याने नागपूरच्या पोलीस आयुक्तांकडून या घटनेची गंभीर दखल घेत या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. सहाय्यक पोलीस आयुक्तांकडून या प्रकरणाची चौकशी केली जाणार आहे.

रॉयल बारमध्ये तलवारीच्या धाकावर या अल्पवयीन आरोपींनी तोडफोड करत रोख रक्कम आणि दारुच्या बॉटल्स चोरल्या होत्या. तसेच आरोपींचा बार मॅनेजरच्या हत्येचा प्लान असल्याची माहिती पुढे येते आहे.

Nagpur Police Minor Accused

संबंधित बातम्या :

शिर्डीत तपासणीसाठी आलेल्या अल्पवयीन मुलीला ‘बॅड टच’, डॉक्टरला बेड्या

गर्भाचं लिंग तपासण्यासाठी बायकोचं पोट फाडलं, उत्तर प्रदेशमधील पाच मुलींच्या बापाचं कृत्य

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI