नागपुरात हिवाळी अधिवेशनादरम्यान विधिमंडळात निगेटिव्ह प्रेशरची सोय, निगेटिव्ह प्रेशर रुम म्हणजे काय?

येत्या सात डिसेंबरपासून नागपुरात हिवाळी अधिवेशन सुरु होणार आहे. (Nagpur winter session Negative pressure facility in the legislature) 

नागपुरात हिवाळी अधिवेशनादरम्यान विधिमंडळात निगेटिव्ह प्रेशरची सोय, निगेटिव्ह प्रेशर रुम म्हणजे काय?
Namrata Patil

|

Oct 07, 2020 | 12:55 PM

नागपूर : येत्या सात डिसेंबरपासून नागपुरात हिवाळी अधिवेशन सुरु होणार आहे. नागपुरात हिवाळी अधिवेशनादरम्यान कोरोनापासून संरक्षण करण्यासाठी विधिमंडळात निगेटिव्ह प्रेशरची सोय करण्यात आली आहे, अशी माहिती विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी दिली. (Nagpur winter session  Negative pressure facility in the legislature)

नागपुरात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. पण नागपुरात कोरोनाचा कहर पाहता हिवाळी अधिवेशन रद्द करावे, अशी मागणी काँग्रेस आमदार विकास ठाकरे यांनी केली आहे. हिवाळी अधिवेशन रद्द करुन हा निधी कोरोनासाठी द्यावा, अशी मागणी विकास ठाकरे यांनी केली आहे.

विकास ठाकरे यांच्या या मागणीवर विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांना विचारले असता, ते म्हणाले, नागपुरात हिवाळी अधिवेशनादरम्यान कोरोनापासून संरक्षण करण्यासाठी विधिमंडळात निगेटिव्ह प्रेशरची सोय करण्यात आली आहे. त्यामुळे विधिमंडळ सदस्यांचा कोरोनापासून बचाव होऊ शकतो.

तसेच या अधिवेशनावर येणाऱ्या मोर्च्यांनाही परवानगी असणार आहे, असंही पटोलेंनी सांगितले.

निगेटिव्ह प्रेशर म्हणजे काय?

निगेटिव्ह प्रेशर ही संसर्ग नियंत्रणाची एक सामान्य पद्धत आहे. गोवर, क्षयरोग तसेच कोरोनासारख्या संसर्गजन्य आजारात रुग्णांना विलगीकरणात ठेवण्यासाठी त्याचा उपयोग केला जातो.

निगेटिव्ह प्रेशर रुमला नकारात्मक दाब खोल्या असे म्हणतात. या खोलीत हवेचा दाब हा बाहेरील हवेच्या दाबापेक्षा कमी असतो. त्यामुळे त्या रुमचा दरवाजा उघडल्यानंतर बाहेरुन येणारी दूषित हवा आणि इतर दूषित कण आत येत नाही.

त्याऐवजी दूषित नसलेली किंवा फिल्टर केलेले हवा त्या रुममध्ये जाते. ही दूषित हवा खोलीच्या बाहेर काढून एक्झॉस्ट सिस्टमसह बाहेर सोडली जाते. ज्यामुळे स्वच्छ हवा रुममध्ये असते. (Nagpur winter session Negative pressure facility in the legislature)

संबंधित बातम्या : 

महाराष्ट्राची बदनामी करणाऱ्या गुप्तेश्वर पांडेंच्या प्रचाराला फडणवीस जाणार का? : अनिल देशमुख

सुशांतची पवना, मुंबईतील प्रॉपर्टी हडपण्याचा कुटुंबाचा डाव होता का?; शिवसेनेकडून चौकशीची मागणी

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें