पावसाळी अधिवेशन दोन दिवसांवर असताना विधानसभा अध्यक्षांना कोरोना, नाना पटोले होम क्वारंटाईन

विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांच्या कोरोना चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे (Nana Patole tests Corona Positive).

पावसाळी अधिवेशन दोन दिवसांवर असताना विधानसभा अध्यक्षांना कोरोना, नाना पटोले होम क्वारंटाईन
चेतन पाटील

|

Sep 04, 2020 | 9:14 PM

मुंबई : विधीमंडळाचे पावसाळी अधिवेशन दोन दिवसांवर असताना काँग्रेस नेते आणि विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांच्या कोरोना चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे (Nana Patole tests Corona Positive). नाना पटोले यांनी स्वत: याबाबत ट्विटरवर माहिती दिली आहे. त्याचबरोबर त्यांनी संपर्कात आलेल्या सर्वांना कोरोना चाचणी करण्याचं आवाहन केलं आहे.

“गेल्या काही दिवसांपासून माझ्या मतदारसंघासह संपूर्ण विदर्भात पूरपरिस्थिती आहे. त्यासोबतच विविध कामांसंबंधी अनेक दौरे करावे लागले. यादरम्यानच मला कोरोनाची लक्षणे जाणवू लागले. त्यामुळे मी माझी कोरोना चाचणी करवून घेतली. या चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. मी सध्या ठणठणीत आहे, आपण काळजी करु नये”, असं नाना पटोले यांनी सांगितलं आहे.

“माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांनी स्वतःची कोरोना चाचणी करुन घ्यावी. मी लवकरच कोरोनावर मात करुन आपल्या सर्वांच्या सेवेत दाखल होईन”, असंदेखील नाना पटोले म्हणाले आहेत (Nana Patole tests Corona Positive).

पावसाळी अधिवेशन येत्या 7 आणि 8 सप्टेंबरला

विधीमंडळाचे पावसाळी अधिवेशन येत्या 7 आणि 8 सप्टेंबरला पार पडणार आहे. दोन दिवसीय अधिवेशनासाठी दोन्ही सभागृहातील आमदारांची अँटिजन चाचणी करण्यात येणार आहे. कोरोना चाचणी पॉझिटिव्ह येणाऱ्या आमदारांना सभागृहात प्रवेश दिला जाणार नाही.

सोशल डिस्टन्सिंगचे निकष पाळून पावसाळी अधिवेशन होणार आहे. शोक प्रस्ताव, अतारांकित प्रश्न, पुरवणी मागण्या, विनियोजन विधेयकावर चर्चा होणार आहे. सात शासकीय विधेयके आणि एक विनियोजन विधेयकाचा यात समावेश आहे.

सुरक्षेविषयी आवश्यक उपाययोजना केल्या जाणार आहेत. अधिवेशनाच्या आदल्या दिवशी म्हणजे 6 सप्टेंबर रोजी सर्व सदस्यांची कोविड-19 साठीची ‘आरटीपीसीआर’ तपासणी करण्यात येईल, असा निर्णय घेण्यात आला. कोरोना चाचणी निगेटिव्ह येणाऱ्या आमदारांनाच सभागृहात प्रवेश दिला जाईल. सहव्याधी (कोमॉर्बिडीटी) असलेल्या आमदारांना काळजी घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

प्रेक्षक आणि विद्यार्थी गॅलरीमध्येही आमदारांची बैठक व्यवस्था होणार आहे. प्रत्येक आमदाराला सुरक्षा किट देण्यात येणार आहे. किटमध्ये फेस शील्ड, मास्क, हॅण्ड ग्लोव्हज, सॅनिटायझर या वस्तूंचा समावेश असेल. आमदारांच्या स्वीय सहायकांना विधानमंडळात प्रवेश दिला जाणार नाही. स्वीय सहायक, वाहनचालकांची बैठक व्यवस्था तंबूत केली जाणार आहे.

हेही वाचा : मुंबई मनपा आयुक्त नागपुरात, कोरोना रोखण्यासाठी इक्बाल चहल यांची खास रणनीती

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें