नंदुरबार ZP निकाल : काँग्रेस-भाजपला समान जागा, मात्र भाजप सत्तेपासून दूर

नंदुरबार जिल्हा परिषदेच्या निवडणुकांचे निकाल जाहीर झाले आहेत. यात कोणत्याही राजकीय पक्षाला स्पष्ट बहुमत मिळालेले (Nandurbar zp election result) नाही.

नंदुरबार ZP निकाल : काँग्रेस-भाजपला समान जागा, मात्र भाजप सत्तेपासून दूर

नंदुरबार : नंदुरबार जिल्हा परिषदेच्या निवडणुकांचे निकाल जाहीर झाले आहेत. यात कोणत्याही राजकीय पक्षाला स्पष्ट बहुमत मिळालेले (Nandurbar zp election result) नाही. त्यामुळे त्रिशंकू परिस्थिती निर्माण झाली आहे. शिवसेना ज्या राजकीय पक्षासोबत जाईल त्या पक्षाचे जिल्हा परिषदेत सत्ता राहणार आहे. राज्याचे आदिवासी विकास मंत्री के. सी. पाडवी यांच्या पत्नी हेमलताताई पाडवी यांचा तोरणमाळ गटातून निसटता पराभव झाला (Nandurbar zp election result) आहे.

नंदुरबार जिल्हा परिषदेच्या 56 गटांसाठी झालेल्या निवडणुकीत काँग्रेसला 23 जागांवर विजय मिळवता आला आहे. तर भाजपही 23 जागांवर विजयी झाली आहे. त्यामुळे यात शिवसेनेला 7 जागा मिळाल्या आहेत. तसेच राष्ट्रवादी तीन जागांवर विजयी झाले आहेत.

जिल्हा परिषद निवडणुकांपूर्वी नवापूर तालुक्यात भाजप आणि राष्ट्रवादीमध्ये आघाडी झाली होती. त्यामुळे नंदुरबार जिल्हा परिषदेच्या सत्तास्थापनेत या नाट्यात राष्ट्रवादी भाजपा सोबतच राहील असे संकेत दिले जात आहेत. मात्र शिवसेना आपल्याला हवी असलेली पदे जो राजकीय पक्ष देईल त्यासोबत जाईल असे चित्र दिसून येत (Nandurbar zp election result) आहे.

राज्यातील सत्तास्थापनेच्या नाट्यात के. सी. पाडवी हे व्यस्त आहे. त्यामुळे त्यांना पक्षाच्या प्रचारासाठी जिल्ह्यात योग्य वेळ मिळालेला नाही. या कारणामुळे काँग्रेसला बहुमत आतापर्यंत पोहोचता आलं नाही अशी शक्यता वर्तवली जात आहे.

नंदुरबार जिल्हा परिषद निवडणुकीच्या सर्वच राजकीय पक्षातील घराणेशाही दिसून आली. त्यात भाजपा नेते विजयकुमार गावित यांच्या परिवारातील चार सदस्य जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत विजय झाले. तर नवापूरमध्ये काँग्रेसचे आमदार शिरीष कुमार नाईक यांचे दोन्ही बंधू जिल्हा परिषद निवडणुकीत विजयी झाले आहेत. तर माजी मंत्री पद्माकर वळवी यांची कन्या सीमा वळवी या ही विजयी झाल्या (Nandurbar zp election result) आहेत.

जिल्हा परिषदेतील विजयी जागा

  • काँग्रेस : 23
  • भाजपा : 23
  • शिवसेना : 7
  • राष्ट्रवादी : 3

नंदुरबार जिल्ह्यातील 6 पंचायत समितीचे निकाल

  • काँग्रेस – नवापूर(सत्ता कायम), अक्कलकुवा (सत्ता कायम)
  • भाजप – नंदुरबार, शहादा
  • शिवसेना – धडगाव
  • राष्ट्रवादी – 00
  • तळोदा पंचायत समितीच्या काँग्रेस – भाजपला प्रत्येकी पाच जागा

Published On - 5:40 pm, Wed, 8 January 20

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI