खुशखबर! ‘चंद्रयान 2’ मोहिमेतील विक्रम लँडरचा ठावठिकाणा लागला!

चंद्राच्या पृष्ठभागाचे काही फोटो नासाच्या अकाऊण्टवरुन ट्वीट करण्यात आले असून त्यावर हिरव्या आणि निळ्या रंगाचे ठिपके दिसत आहेत.

खुशखबर! 'चंद्रयान 2' मोहिमेतील विक्रम लँडरचा ठावठिकाणा लागला!

बंगळुरु : भारतीयांची सकाळ एका ‘गुड न्यूज’ने होणार आहे. भारताच्या महत्त्वाकांक्षी ‘चंद्रयान 2’ (Chandrayaan-2) मोहिमेतील विक्रम लँडरचा (Vikram Lander Found by NASA) ठावठिकाणा शोधण्यात ‘नासा’च्या उपग्रहाला यश आलं आहे. ‘नासा’च्या ल्युनार रिकॉनिसन्स ऑर्बिटर कॅमेराने (Lunar Reconnaissance Orbiter (LRO) Camera) ‘विक्रम लँडर’च्या खाणाखुणा टिपल्या आहेत.

भारतीय वेळेनुसार रात्री एक वाजून 53 मिनिटांनी ‘नासा’च्या ट्विटर अकाऊण्टवरुन भारतीयांच्या आशा पल्लवित करणारी ही बातमी आलेली आहे. चंद्राच्या पृष्ठभागाचे काही फोटो ट्वीट करण्यात आले असून त्यावर हिरव्या आणि निळ्या रंगाचे ठिपके दिसत आहेत. हिरवे ठिपके म्हणजे ‘डेब्रीज’, तर निळे म्हणजे ‘सॉईल डिस्टर्बन्स’.

सात सप्टेंबर 2019 रोजी ‘इस्रो’कडून ‘चंद्रयान 2’ पाठवण्यात आलं होतं. मात्र चंद्रापासून अवघ्या दोन किमी अंतरावर असताना विक्रम लँडरशी ‘इस्रो’चा संपर्क तुटला. त्यानंतर चंद्राच्या कक्षेत असलेल्या ऑर्बिटरने विक्रमच्या संभाव्य ठावठिकाण्याचे फोटो ‘इस्रो’ला पाठवले होते.

भारताची महत्त्वाकांक्षी मोहीम चंद्रयान 2

चंद्रयान-2 हे पूर्णपणे भारतीय बनावटीचं आहे. भारताची ही दुसरी चंद्रावरील स्वारी आहे. भारताने 2008 मध्ये चांद्रयान 1 चं प्रक्षेपण केलं होतं. 978 कोटी रुपये खर्च करुन केलेलं हे मानवविरहित मिशन (Vikram Lander Found by NASA) आहे.

सात सप्टेंबरला, म्हणजे ‘विक्रम लँडर’ ज्या दिवशी चंद्रावर लँडिंग करणार होतं, तेव्हा चंद्रापासून 30 किलोमीटर ते 7.4 किलोमीटर अंतरापर्यंतचा प्रवास सुरळीत होता. यावेळी विक्रम लँडरचा वेग 1683 मीटर प्रतिसेकंदावरुन 146 मीटर प्रति सेकंदावर आला होता. मात्र तिथून पुढे दुसऱ्या टप्प्यात विक्रम लँडरचा वेग नियोजित वेगापेक्षा जास्त होता. त्यामुळे विक्रम लँडरचं सॉफ्ट लँडिंग होऊ शकल नाही. चंद्रापासून अवघ्या 500 मीटर अंतरावर असताना विक्रम लँडरचं हार्ड लँडिंग झालं होतं.

संबंधित बातम्या

चंद्रयान 2 : यश मिळालं तर आपलं, अपयश आलं तरीही आपलंच, इस्रोच्या 2 रॉकेट वुमनचा देशाला अभिमान!

Mission Chandrayaan-2 : ‘चंद्रयान-2’ चंद्राच्या दक्षिण ध्रुवावरच का उतरणार?    

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI