नाशिक पोलीस आयुक्तांचा नवा उपक्रम, गुन्हेगारी रोखण्यासाठी अ‍ॅक्शन मोडमध्ये

नाशिक पोलीस आयुक्त दीपक कुमार पांडे यांनी गुन्हेगारीला चाप बसवण्यासाठी अनेक उपक्रम हाती घेतले आहेत. (Nashik Police Commissioner on action mode) 

नाशिक पोलीस आयुक्तांचा नवा उपक्रम, गुन्हेगारी रोखण्यासाठी अ‍ॅक्शन मोडमध्ये

नाशिक : गेल्या काही दिवसांपासून नाशिकमध्ये खून, दरोडा, सोनसाखळी खेचून नेणे, वाहन चोरी, घरफोडी यासारख्या गुन्ह्यांमध्ये वाढ होत आहे. यापार्श्वभूमीवर नाशिक पोलीस आयुक्त दीपक कुमार पांडे यांनी गुन्हेगारीला चाप बसवण्यासाठी अनेक उपक्रम हाती घेतले आहेत. जनतेच्या सुरक्षेच्या दृष्टीने केलेल्या आवाहनाला नाशिककरांनी प्रतिसाद देण गरजेचं आहे. (Nashik Police Commissioner on action mode)

अवघ्या दोन दिवसांपूर्वी नाशिक शहरात पकडलेल्या चैन स्नॅचिंग करणाऱ्या आरोपीकडे धारदार शस्त्र आढळून आले होते. त्या पार्श्वभूमीवर नाशिक शहर पोलिसांनी धारदार शस्त्र बाळगणाऱ्या गुन्हेगारांविरुद्ध धडक कारवाई सुरु केली आहे. यानुसार पुढील काही दिवस नाशिकमधील दुचाकी आणि चारचाकी वाहनांची तपासणी केली जाणार आहे. या कारवाईदरम्यान नागरिकांनी पोलिसांना सहकार्य करण्याचं आवाहन पोलीस आयुक्तांनी केलं आहे.

नाशिक शहर आणि जिल्ह्यात घडलेल्या दोन हेरगिरी प्रकरणातील आरोपींचं पाकिस्तान कनेक्शनसमोर आलं होतं. त्यानंतर या प्रकरणांना आळा घालण्यासाठी पोलिसांनीही नाशिककरांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. तसेच कोणीही अनोळखी व्यक्तीशी सोशल मीडियावर चॅटिंग करु नये. तसेच परदेशातील अनोळखी क्रमांकाना ग्रुपमध्ये देखील अॅड करु नये असंही आवाहन शहराच्या पोलीस आयुक्तांनी केलं आहे.

नाशिक शहर पोलीस आयुक्त पदाचा पदभार स्वीकारल्यानंतर शहराचे पोलीस आयुक्त दीपक कुमार पांडे हे अॅक्शन मोडमध्ये पाहायला मिळत आहे. त्यांनी शहरातील गुन्हेगारी रोखण्यासाठी आणि पोलिसांचं मनोबल वाढण्यासठी अनेक उपक्रम हाती घेतले आहेत. त्यामुळे आता पोलिसांनी नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देणं गरजेचं आहे. (Nashik Police Commissioner on action mode)

संबंधित बातम्या : 

ठाण्यात एसटीचा भीषण अपघात, महिलेनं गमावले दोन्ही पाय

सोनसाखळी चोरांचा सिनेस्टाईल पाठलाग, नाशकात सुट्टीवरील पोलिसाची पत्नीसह धडाकेबाज कामगिरी

Published On - 11:52 am, Fri, 16 October 20

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI