Marathi News » Latest news » National farmer protest strike in maharashtra against farm bill 2020
Photos : राज्यभरात कृषी कायद्यांविरोधात शेतकऱ्यांचा एल्गार, कुठे निवेदन तर कुठे कायद्याची प्रत जाळून निषेध
प्रविण शिंदे, टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम |
Updated on: Sep 25, 2020 | 6:28 PM
Photos : राज्यभरात कृषी कायद्यांविरोधात शेतकऱ्यांचा एल्गार, कुठे निवेदन तर कुठे कायद्याची प्रत जाळून निषेध
अखिल भारतीय किसान सभेतर्फे आज महाराष्ट्रातील 21 जिल्ह्यांत 50 हजार शेतकऱ्यांसह केंद्र सरकारच्या कृषी कायद्यांच्या निषेधार्थ रस्ता रोको आंदोलन, कायद्यांची होळी करण्यात आली.
आज (25 सप्टेंबर) देशव्यापी आंदोलनाचा भाग म्हणून अखिल भारतीय किसान सभेच्या नेतृत्वाखाली हजारो शेतकऱ्यांनी रस्ता रोको आंदोलने केलं.
अनेक ठिकाणी उग्र निदर्शने करुन भाजपशासित केंद्र सरकारच्या तिन्ही शेतकरी कायद्यांची होळी करण्यात आली.
ठाणे, पालघर, नाशिक आणि अहमदनगर जिल्ह्यांत अनेक ठिकाणी जोरदार रस्ता रोकोचे आंदोलन झाले.
या चारही जिल्ह्यांतील आंदोलकांचीच संख्या 30 हजारांहून अधिक होती.
पालघर जिल्ह्यात चारोटी (ता. डहाणू) आणि बोईसर फाटा (ता. पालघर) या दोन्ही ठिकाणी मुंबई-बडोदा-जयपूर-दिल्लीचा राष्ट्रीय महामार्ग 10 हजार शेतकऱ्यांनी रोखून धरला.
पश्चिम महाराष्ट्रात सोलापूर, कोल्हापूर, सांगली, सातारा व पुणे येथील अनेक तालुक्यांमध्ये शेतकऱ्यांची जोरदार आंदोलने झाली.
उत्तर महाराष्ट्रात नंदुरबार, धुळे, विदर्भात बुलडाणा, अमरावती, यवतमाळ, वर्धा, नागपूर येथील अनेक तालुक्यांमध्ये शेतकऱ्यांची जोरदार आंदोलने झाली.
मराठवाड्यात नांदेड, परभणी, बीड, जालना, उस्मानाबाद येथील अनेक तालुक्यांमध्ये शेतकऱ्यांची जोरदार आंदोलने झाली.
ठिकठिकाणच्या आंदोलनांचे नेतृत्व अखिल भारतीय किसान सभेच्या नेत्यांनी केले.
यात राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. अशोक ढवळे, माजी राज्य अध्यक्ष आणि माजी आमदार जे. पी. गावीत, आमदार विनोद निकोले, राज्य अध्यक्ष किसन गुजर, राज्य महासचिव डॉ. अजित नवले, कार्याध्यक्ष अर्जुन आडे, कोषाध्यक्ष उमेश देशमुख आणि राज्य पदाधिकारी बारक्या मांगात यांचा समावेश आहे.
रतन बुधर, रडका कलांगडा, सुनील मालुसरे, शंकर सिडाम, सिद्धप्पा कलशेट्टी, दादा रायपुरे, यशवंत झाडे, नामदेव भांगरे, सदाशिव साबळे यांनी देखील ठिकठिकाणी शेतकरी आंदोलनाचे नेतृत्व केले.
National Farmer Protest Strike in Maharashtra against Farm Bill 2020