SSR Case : ड्रग्ज कनेक्शन प्रकरणी NCB कडून ‘सावधान इंडिया’च्या दिग्दर्शकाची सहा तास चौकशी

एनसीबीने सोमवारी (19 ऑक्टोबर) 'सावधान इंडिया'चा दिग्दर्शक सोहेल कोहली याची सहा तास चौकशी केली (Bollywood drugs connection).

SSR Case : ड्रग्ज कनेक्शन प्रकरणी NCB कडून 'सावधान इंडिया'च्या दिग्दर्शकाची सहा तास चौकशी
Follow us
| Updated on: Oct 20, 2020 | 8:22 AM

मुबंई : अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणात ड्रग्ज कनेक्शन समोर आल्यापासून नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोकडून (एनसीबी) धडक कारवाई सुरु आहे. या प्रकरणी एनसीबीने सोमवारी (19 ऑक्टोबर) ‘सावधान इंडिया’चा दिग्दर्शक सोहेल कोहली याची चौकशी केली (Bollywood drugs connection).

सोहेल कोहली हा चित्रपट निर्माता आहे. त्याने अनेक चित्रपट आणि मालिकांची निर्मिती केली आहे. दोन दिवसांपूर्वी दक्षिण भारतीय नागरिक असलेला अ‍ॅगिसिलोस डेमेट्रियड्सकडून याला अटक करण्यात आली होती. अ‍ॅगिसिलोस याच्या चौकशीत सोहेल कोहलीचं नाव समोर आलं. त्यामुळे एनसीबीने सोहेल याला चौकशीसाठी बोलावलं.

सोहेलची एनसीबीकडून काल जवळपास सहा तास चौकशी झाली. याशिवाय त्याची आजदेखील चौकशी होणार आहे. सोहेल याच्यावर ड्रग्जचं वितरण करणं आणि सेवन करणं याबाबत गंभीर आरोप आहेत. त्याच अनुषंगाने एनसीबीकडून चौकशी करण्यात आली (Bollywood drugs connection).

बॉलिवूडमधील ड्रग्ज कनेक्शन प्रकरणात एनसीबीकडून कसून तपास सुरु आहे. याप्रकरणात एनसीबीने आतापर्यंत 23 जणांना अटक केली आहे. विशेष म्हणजे एनसीबीकडून आता बड्या दिग्दर्शकांनादेखील समन्स बजावण्यात आले आहेत. या दिग्दर्शकांची नावे अद्याप समोर आलेली नाहीत.

अ‍ॅगिसिलोस डेमेट्रियड्स हा अर्जुन रामपालचा मेहुणा

अ‍ॅगिसिलोस डेमेट्रियड्स हा अभिनेता अर्जुन रामपालची गर्लफ्रेंड गॅब्रिएला डेमेट्रियड्सचा भाऊ आहे. अ‍ॅगिसिलोस याच्या चौकशीत अनेक बड्या दिग्दर्शकांची नावे समोर आली आहेत. एनसीबीने सर्व दिग्दर्शकांना समन्स बजावले आहेत. त्याचबरोबर अ‍ॅगिसिलोस याला अटक केली आहे.

आतापर्यंत 23 जणांना अटक

ड्रग्सप्ररणी (Bollywood Drugs Connection) एनसीबीने आतापर्यंत तब्बल 23 आरोपींना अटक केली आहे. यामध्ये अभिनेत्री रिया चक्रवर्ती, तिचा भाऊ शौविक चक्रवर्ती, सुशांत सिंह राजपूतच्या घराचा मॅनेजर सॅम्युअल मिरांडा, दीपेश सावंत यांचा समावेश आहे. यांच्यासह ड्रग पेडलर जैद, बासित परिहार आणि अन्य काही जणांचा समावेश आहे.

याप्रकरणी रिया चक्रवर्तीला (Rhea Chakraborty) 7 ऑक्टोबर रोजी जामीन मिळाला आहे. तब्बल 28 दिवसानंतर रिया भायखळा तुरुंगातून बाहेर पडली. याआधी 3 वेळा तिचा जामीन अर्ज फेटाळण्यात आला होता. मात्र, तिचा भाऊ शौविक चक्रवर्ती याला जामीन देण्यास न्यायालयाने नकार दिला आहे.

संबंधित बातम्या :

अर्जुन रामपालचा मेहुणा एनसीबीच्या ताब्यात, ड्रग्ज प्रकरणी चौकशी होणार!

अ‍ॅगिसिलोस डेमेट्रियड्सच्या अटकेनंतर बॉलिवूडच्या ‘बड्या’ दिग्दर्शकांना एनसीबीचे समन्स!

Non Stop LIVE Update
सोलापुरातील अपक्ष उमेदवाराच्या घरावर दरोडा, नेमकं काय घडलं?
सोलापुरातील अपक्ष उमेदवाराच्या घरावर दरोडा, नेमकं काय घडलं?.
आता ही तुतारी तुमची चांगलीच..., संजय राऊतांचा महायुतीवर हल्लबोल
आता ही तुतारी तुमची चांगलीच..., संजय राऊतांचा महायुतीवर हल्लबोल.
एक-दोन दिवस थांबा मग संदीपान भूमरेंवर...,ठाकरे गटाच्या नेत्यांचा इशारा
एक-दोन दिवस थांबा मग संदीपान भूमरेंवर...,ठाकरे गटाच्या नेत्यांचा इशारा.
ईडीच्या 'त्या' वक्तव्यावरून अमोल कोल्हेंनी घेतला सदाभाऊ खोतांचा समाचार
ईडीच्या 'त्या' वक्तव्यावरून अमोल कोल्हेंनी घेतला सदाभाऊ खोतांचा समाचार.
शेंडगेंच्या गाडीवरील हल्ल्यावर भुजबळ म्हणाले, पण मी कुणाच्या बापाला...
शेंडगेंच्या गाडीवरील हल्ल्यावर भुजबळ म्हणाले, पण मी कुणाच्या बापाला....
मराठा समाज गप्प बसणार नाही, ओबीसी नेत्याला धमकी अन् गाडीवर शाईफेक
मराठा समाज गप्प बसणार नाही, ओबीसी नेत्याला धमकी अन् गाडीवर शाईफेक.
जाहीरपणे धमक्या? ही भाषा तुम्हाला शोभते का? राऊतांचा दादांवर घणाघात
जाहीरपणे धमक्या? ही भाषा तुम्हाला शोभते का? राऊतांचा दादांवर घणाघात.
48 तासात उत्तर द्या, अन्यथा... निवडणूक अधिकाऱ्याकडून पुन्हा नोटीस
48 तासात उत्तर द्या, अन्यथा... निवडणूक अधिकाऱ्याकडून पुन्हा नोटीस.
भांडूपमध्ये मध्यरात्री कोट्यवधींची रोकड सापडली, भरारी पथकाची कारवाई
भांडूपमध्ये मध्यरात्री कोट्यवधींची रोकड सापडली, भरारी पथकाची कारवाई.
मला शरम वाटली असती, असे म्हणत अजितदादांकडून सुप्रिया सुळेंची मिमिक्री
मला शरम वाटली असती, असे म्हणत अजितदादांकडून सुप्रिया सुळेंची मिमिक्री.