Drug Connection | अर्जुन रामपालचा मेहुणा एनसीबीच्या ताब्यात, ड्रग्ज प्रकरणी चौकशी होणार!

दक्षिण अफिकेचा नागरिक असलेला अ‍ॅगिसिलोस एनसीबी अधिकाऱ्यांनी अटक केलेल्या ड्रग्ज तस्काराच्या संपर्कात होता.

Drug Connection | अर्जुन रामपालचा मेहुणा एनसीबीच्या ताब्यात, ड्रग्ज प्रकरणी चौकशी होणार!

मुंबई : बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्येशी संबंधित ड्रग्ज प्रकरण (Bollywood Drugs Connection) समोर आल्यानंतर नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने (NCB) धडक कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. आतापर्यंत या प्रकरणात अनेकांना ताब्यात घेतले गेले आहे. आता एनसीबीने अभिनेता अर्जुन रामपालची गर्लफ्रेंड गॅब्रिएला डेमेट्रियड्सच्या भावाला ताब्यात घेतले आहे. तपासादरम्यान त्याचे नाव समोर आल्याने अ‍ॅगिसिलोस डेमेट्रियड्सला अटक करण्यात आली असल्याचे एनसीबी अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. (Bollywood Drugs Connection Arjun Rampal’s Partner Gabriella’s Brother Arrested by NCB)

दक्षिण अफिकेचा नागरिक असलेला अ‍ॅगिसिलोस एनसीबी अधिकाऱ्यांनी अटक केलेल्या ड्रग्ज तस्काराच्या संपर्कात होता. त्याचे नाव समोर आल्याने त्याला स्थानिक न्यायालयासमोर हजार करण्यात आले होते. त्यानंतर त्याला पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

मुंबईतून आणखी एका ड्रग तस्कराला अटक

सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाशी संबंधित ड्रग्ज प्रकरणात नार्कोटिक्स कंट्रोल ब्यूरोने (एनसीबी) प्रतिबंधित अंमली पदार्थांचे सेवन आणि विक्री करणाऱ्या एकाला अटक केली. एनसीबीच्या अधिकाऱ्यांनी केस नंबर 16/20 मध्ये गुरुवारी सायंकाळी सांताक्रूझमधील रहिवासी जय मधोक याला अटक केली. याच केसमध्ये अभिनेत्री रिया चक्रवर्ती, तिचा भाऊ शौविक आणि अन्य 19 जणांना अटक केली आहे. याप्रकरणी एनसीबीने अटक केलेल्या आरोपींची संख्या आता 23 झाली आहे. (Bollywood Drugs Connection Arjun Rampal’s Partner Gabriella’s Brother Arrested by NCB)

‘मधोक अंमली पदार्थांचे सेवन करत होता, तसेच तो त्याची विक्रीदेखील करत होता. तो एक ड्रग पेडलर असल्याचे समोर आले आहे. मधोक कोकोनसह हॅशची विक्री करतो. या केसमधील अन्य आरोपींनी चौकशीदरम्यान त्याचे नाव घेतल्याचे’, एनसीबीचे झोनल संचालक समीर वानखेडे यांनी सांगितले.

22 जणांना अटक

ड्रग्सप्ररणी (Bollywood Drugs Connection) एनसीबीने आतापर्यंत तब्बल 23 आरोपींना अटक केली आहे. यामध्ये अभिनेत्री रिया चक्रवर्ती, तिचा भाऊ शौविक चक्रवर्ती, सुशांत सिंह राजपूतच्या घराचा मॅनेजर सॅम्युअल मिरांडा, दीपेश सावंत यांचा समावेश आहे. यांच्यासह ड्रग पेडलर जैद, बासित परिहार आणि अन्य काही जणांचा समावेश आहे.

याप्रकरणी रिया चक्रवर्तीला (Rhea Chakraborty) 7 ऑक्टोबर रोजी जामीन मिळाला आहे. तब्बल 28 दिवसानंतर रिया भायखळा तुरुंगातून बाहेर पडली. याआधी 3 वेळा तिचा जामीन अर्ज फेटाळण्यात आला होता. मात्र, तिचा भाऊ शौविक चक्रवर्ती याला जामीन देण्यास न्यायालयाने नकार दिला आहे.

जामिनानंतर रियासमोर कोर्टाच्या तीन अटी

मुंबई हायकोर्टाने रियाला दिलासा असला तरी तिला काही अटी घालण्यात आल्या आहेत. या अटींनुसार रियाला तिचा पासपोर्ट जमा करण्याचा आदेश देण्यात आला आहे. याशिवाय तिला मुंबईबाहेर जायचे असल्यास परवानगी घेणे आवश्यक असणार आहे. चौकशीदरम्यान पोलिस स्टेशनला हजेरी लावणे बंधनकारक असणार आहे.

(Bollywood Drugs Connection Arjun Rampal’s Partner Gabriella’s Brother Arrested by NCB)

 

संबंधित बातम्या

Bollywood Drugs Connection | एनसीबी अधिकाऱ्यांनी अडकवल्याचा दावा, क्षितीज प्रसादचा पुन्हा जामिनासाठी अर्ज

Bollywood Drug Case | अभिनेत्रींनंतर आता तीन बडे अभिनेते एनसीबीच्या रडारवर

सेलिब्रिटींची नावे घेण्यासाठी एनसीबीकडून क्षितीजचा छळ, वकील सतिश मानेशिंदेचा दावा

दीपिका चौकशी दरम्यान तीन वेळा रडली, एनसीबी अधिकाऱ्यांनी खडसावले

Drugs Case : एनसीबीकडून दीपिका, सारा, श्रद्धासह 7 जणांचे फोन जप्त, मोठे गौप्यस्फोट होण्याची शक्यता

 

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *