सेलिब्रिटींची नावे घेण्यासाठी एनसीबीकडून क्षितीजचा छळ, वकील सतिश मानेशिंदेचा दावा

एनसीबी कोठडीत क्षितीजचा छळ होत असून, धर्मा प्रोडक्शनशी (Dharma Production) संबधितांची आणि इतर बड्या कलाकारांची नावे घेण्यासाठी त्याच्यावर दबाव टाकला जात असल्याचा दावा सतिश मानेशिंदे (Satish Maneshinde) यांनी केला आहे.

सेलिब्रिटींची नावे घेण्यासाठी एनसीबीकडून क्षितीजचा छळ, वकील सतिश मानेशिंदेचा दावा

मुंबई : सुशांत सिंह राजपूत आत्महत्येनंतर समोर आलेल्या ड्रग्ज कनेक्शनमुळे (Drugs Connection) या प्रकरणातील सगळी समीकरणेच बदलून गेली. बॉलिवूड ड्रग्ज प्रकरणात अभिनेत्री रकुलप्रीत सिंहने, धर्मा प्रोडक्शनचा संचालक निर्माता क्षितीज प्रसादचे (Drugs Prasad) नाव घेतल्याने एनसीबीकडून (NCB) त्याला अटक करण्यात आली आहे. रविवारी त्याला व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे न्यायालयासमोर हजर करण्यात आले. या सुनावणी दरम्यान त्याच्या कोठडीत 3 ऑक्टोबरपर्यंत वाढ करण्यात आली. वकील सतिश मानेशिंदे (Satish Maneshinde) यांनी क्षितीजच्या एनसीबी चौकशीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत (NCB torcher Kshitij Prasad during Interrogation claims Adv Satish Maneshinde).

एनसीबी कोठडीत क्षितीजचा छळ होत असून, धर्मा प्रोडक्शनशी (Dharma Production) संबधितांची आणि इतर बड्या कलाकारांची नावे घेण्यासाठी त्याच्यावर दबाव टाकला जात असल्याचा दावा सतिश मानेशिंदे (Satish Maneshinde) यांनी केला आहे. न्यायाधिशांसमोर क्षितीजचा जबाब नोंदवण्यात आला. एनसीबी कोठडीत क्षितीजला थर्ड डिग्री टॉर्चर करण्यात आले आहे. क्षितीजच्या घरातून सिगारेटची थोटके मिळाली होती. पण, एनसीबीने जबरदस्तीने त्याला गांजचे नाव दिले. ईशा आणि अनुभवला क्षितीजविरोधात जबाब द्यायला लावला असल्याचा दावा वकील सतिश मानेशिंदे यांनी केला आहे.

…तर तुला सोडून देऊ!

पहिल्या दिवशी एनसीबी कोठडीत क्षितीजला चांगली वागणूक दिली गेली. मात्र, दुसऱ्या दिवशी सकाळी क्षितीजचा जबाब नोंदवण्यास सुरुवात झाली तेव्हा, समीर वानखेडेंसह इतर अधिकारी तिथे उपस्थित होते. क्षितीज प्रसाद धर्मा प्रोडक्शनशी संबंधित असल्याने त्याने करण जोहर, सोमल मिश्रा, राखी, अपूर्व, नीरज यांनीही ड्रग्ज घेतले असे कबूल करावे, तर त्याला सोडून देण्यात येईल, असे क्षितीजला सांगण्यात आले. त्याने या गोष्टीस नकार दिल्यावर त्याच्याकडून जबरदस्तीने वदवून घेण्यासाठी दबाव टाकण्यात आल्याचे सतिश मानेशिंदे यांनी म्हटले आहे. (NCB torcher Kshitij Prasad during Interrogation claims Adv Satish Maneshinde)

दोन दिवस क्षितीजला त्याच्या कुटुंबियांशी, तसेच वकिलांशी बोलू दिले गेले नाही. त्यांच्याशी संपर्क साधायचा असल्यास त्याला स्टेटमेंटवर सही करावी लागेल, असे सांगण्यात आल्याने त्याने त्यावर सही केली, असे सतिश मानेशिंदे यांनी सांगितले.

क्षितीजच्या ड्रग्ज चॅटमध्ये समोर आली अनेक नावे

क्षितीज प्रसादची ड्रग्ज चॅट (Drug Chat) एनसीबीच्या हाती लागली असून, यातून अंकुश अर्नेजा, अनुज केसवानी, करमजीत यांची नावे समोर आली आहेत. या संभाषणात त्यांनी हॅश आणि एमडीएमए या ड्रग्जची मागणी केली होती. या प्रकरणी अंकुश अर्नेजालाही एनसीबीकडून अटक करण्यात आली आहे. चौकशी दरम्यान त्याने कधी कधी गांजा सेवन करत असल्याची कबुली दिली आहे. मात्र, या व्यतिरिक्त कुठलेही ड्रग्ज घेतले नसल्याचे त्याने म्हटले आहे.

करण जोहरकडून खुलासा

या सर्व प्रकरणानंतर चित्रपट दिग्दर्शक करण जोहर (Karan Johar) याने एक पत्रक जारी केले आहे. ‘माझ्या घरात ड्रग्स पार्टी झाली नाही. माझ्यावर होत असलेले आरोप खोटे आहेत. क्षितीज रवी प्रसाद आणि अनुभव चोप्रा यांचा धर्मा प्रॉडक्शनशी काहीही संबंध नाही’, असे करण जोहर स्पष्ट केले आहे.

(NCB torcher Kshitij Prasad during Interrogation claims Adv Satish Maneshinde)

संबंधित बातम्या :

ड्रग्ज प्रकरणात अडकवलं, क्षितीज प्रसादचा दावा, चार बड्या सेलिब्रिटींवर आरोप

‘धर्मा प्रोडक्‍शन’चे निर्माता क्षितीज प्रसादची 27 तास चौकशी, समाधानकारक उत्तर न दिल्याने अटक

ड्रग्ज प्रकरणात ‘धर्मा प्रोडक्‍शन’चे नाव, निर्माता क्षितीज प्रसादला एनसीबीचा समन्स

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *