Bollywood Drug Connection | अ‍ॅगिसिलोस डेमेट्रियड्सच्या अटकेनंतर बॉलिवूडच्या ‘बड्या’ दिग्दर्शकांना एनसीबीचे समन्स!

दक्षिण अफिकेचा नागरिक असलेला अ‍ॅगिसिलोस एनसीबी अधिकाऱ्यांनी अटक केलेल्या ड्रग्ज तस्काराच्या संपर्कात होता.

Bollywood Drug Connection | अ‍ॅगिसिलोस डेमेट्रियड्सच्या अटकेनंतर बॉलिवूडच्या ‘बड्या’ दिग्दर्शकांना एनसीबीचे समन्स!

मुंबई : बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्येशी संबंधित ड्रग्ज प्रकरण (Bollywood Drugs Connection) समोर आल्यानंतर नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने (NCB) धडक कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. आतापर्यंत या प्रकरणात अनेकांना ताब्यात घेतले गेले आहे. आता एनसीबीने अभिनेता अर्जुन रामपालची गर्लफ्रेंड गॅब्रिएला डेमेट्रियड्सच्या भावाला ताब्यात घेतले. या धडक कारवाईनंतर आता एनसीबीने अनेक ‘बड्या’ बॉलिवूड दिग्दर्शकांनादेखील समन्स बजावल्याचे कळते आहे.( NCB summoned film directors and officials from production house Bollywood drug connection)

ड्रग्ज कनेक्शन तपासादरम्यान नाव समोर आल्याने अ‍ॅगिसिलोस डेमेट्रियड्सला अटक करण्यात आली असल्याचे एनसीबी अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. अ‍ॅगिसिलोस डेमेट्रियड्सच्या चौकशी दरम्यान ही नावे समोर आल्याचे समजते आहे. एनसीबीने या दिग्दर्शक आणि निर्मात्यांना समन्स बजावले असले, तरी याची नावे अद्याप समोर आलेली नाहीत. परंतु, एनसीबी अधिकारी यांची देखील कसून चौकशी करतील, असे सांगितले जात आहे.

अ‍ॅगिसिलोस डेमेट्रियड्सकडून ड्रग्ज जप्त

दक्षिण अफिकेचा नागरिक असलेला अ‍ॅगिसिलोस एनसीबी अधिकाऱ्यांनी अटक केलेल्या ड्रग्ज तस्काराच्या संपर्कात होता. शिवाय त्याचाकडून ‘हॅश’ आणि ‘अल्प्राझोलम’ हे ड्रग्जदेखील जप्त करण्यात आले आहेत. त्याचे नाव समोर आल्याने त्याला स्थानिक न्यायालयासमोर हजार करण्यात आले होते. त्यानंतर त्याला पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. अद्याप अर्जुन किंवा गॅब्रिएला या दोघांपैकी कोणीही प्रतिक्रिया दिलेली नाही. (NCB summoned film directors and officials from production house Bollywood drug connection)

मुंबईतून आणखी एका ड्रग तस्कराला अटक

सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाशी संबंधित ड्रग्ज प्रकरणात नार्कोटिक्स कंट्रोल ब्यूरोने (एनसीबी) प्रतिबंधित अंमली पदार्थांचे सेवन आणि विक्री करणाऱ्या एकाला अटक केली. एनसीबीच्या अधिकाऱ्यांनी केस नंबर 16/20 मध्ये गुरुवारी सायंकाळी सांताक्रूझमधील रहिवासी जय मधोक याला अटक केली. याच केसमध्ये अभिनेत्री रिया चक्रवर्ती, तिचा भाऊ शौविक आणि अन्य 19 जणांना अटक केली आहे. याप्रकरणी एनसीबीने अटक केलेल्या आरोपींची संख्या आता 23 झाली आहे.

‘मधोक अंमली पदार्थांचे सेवन करत होता, तसेच तो त्याची विक्रीदेखील करत होता. तो एक ड्रग पेडलर असल्याचे समोर आले आहे. मधोक कोकोनसह हॅशची विक्री करतो. या केसमधील अन्य आरोपींनी चौकशीदरम्यान त्याचे नाव घेतल्याचे’, एनसीबीचे झोनल संचालक समीर वानखेडे यांनी सांगितले.( NCB summoned film directors and officials from production house Bollywood drug connection)

आतापर्यंत 23 जणांना अटक

ड्रग्सप्ररणी (Bollywood Drugs Connection) एनसीबीने आतापर्यंत तब्बल 23 आरोपींना अटक केली आहे. यामध्ये अभिनेत्री रिया चक्रवर्ती, तिचा भाऊ शौविक चक्रवर्ती, सुशांत सिंह राजपूतच्या घराचा मॅनेजर सॅम्युअल मिरांडा, दीपेश सावंत यांचा समावेश आहे. यांच्यासह ड्रग पेडलर जैद, बासित परिहार आणि अन्य काही जणांचा समावेश आहे.

याप्रकरणी रिया चक्रवर्तीला (Rhea Chakraborty) 7 ऑक्टोबर रोजी जामीन मिळाला आहे. तब्बल 28 दिवसानंतर रिया भायखळा तुरुंगातून बाहेर पडली. याआधी 3 वेळा तिचा जामीन अर्ज फेटाळण्यात आला होता. मात्र, तिचा भाऊ शौविक चक्रवर्ती याला जामीन देण्यास न्यायालयाने नकार दिला आहे.

(NCB summoned film directors and officials from production house Bollywood drug connection)

Published On - 3:38 pm, Mon, 19 October 20

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI