AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ड्रग्ज कनेक्शनमध्ये बॉलिवूडच्या आणखी दोन अभिनेत्रींची नावं समोर, NCB कडून दीपिका आणि दियाला समन्स

बॉलिवूडमधलं ड्रग्ज कनेक्शन आता बड्या बड्या अभिनेत्रीपर्यंत येऊन पोहोचलं आहे आणि यात दीपिका पादुकोणसह दिया मिर्झाचंही नाव समोर आलं आहे (Deepika Padukone and Dia Mirza).

ड्रग्ज कनेक्शनमध्ये बॉलिवूडच्या आणखी दोन अभिनेत्रींची नावं समोर, NCB कडून दीपिका आणि दियाला समन्स
| Edited By: | Updated on: Sep 22, 2020 | 11:55 PM
Share

मुंबई : बॉलिवूडमधलं ड्रग्ज कनेक्शन आता बड्या बड्या अभिनेत्रीपर्यंत येऊन पोहोचलं आहे आणि यात दीपिका पादुकोणसह दिया मिर्झाचंही नाव समोर आलं आहे (Deepika Padukone and Dia Mirza). त्यामुळं NCB समोर दीपिका आणि दियाची हजेरी लागणार आहे. कारण दोघींनाही लवकरच समन्स बजावलं जाणार आहे (Deepika Padukone and Dia Mirza).

NCB च्या हाती ड्रग्ससंदर्भातील काही चॅट समोर आलेत. ज्यात D, N, S आणि K नावानं चॅटिंग होतेय. यातील D म्हणजे दीपिका पादुकोण, N म्हणजे नम्रता शिरोडकर, S म्हणजे श्रद्धा कपूर आणि K म्हणजे करिश्मा प्रकाश असल्याचं समजतंय.

करिश्मा प्रकाश ही दीपिकाची मॅनेजर आहे आणि दोघींमधलं चॅटिंग समोर आलंय

दीपिका करिश्माला विचारते, ‘तुझ्याकडे माल आहे का’ ?

करिश्मा यावर रिप्लाय देते की, ‘हो… पण घरी आहे. मी आता वांद्र्याला आहे. जर म्हणशील तर अमितला विचारते.

परत दीपिका मेसेज करते. हो प्लीज

काही वेळानं करिश्मा उत्तर देते, अमित घेऊन येत आहे.

यावर दीपिका विचारते, हॅश आहे का?

त्यावर करिश्मा म्हणते की, हॅश नाही गांजा आहे.

म्हणजे चॅटिंगवरुन एक बाब स्पष्ट झाली की दीपिका पादुकोणनं ड्रग्जची मागणी केली. त्यामुळंच दीपिकाचा सामना लवकरच NCB शी होईल. तर NCB च्या सूत्रांनुसार दियाची मॅनेजर दियापर्यंत ड्रग्ज पोहोचवत होती. 2019 मध्ये दियानं ड्रग्ज खरेदी केल्याचं कळतंय. त्यासाठी दियाच्या मॅनेजरनं ड्रग्ज पेडलरसोबत 2 वेळा बैठकही केली आहे.

एकीकडे ड्रग्ज कनेक्शनमध्ये दीपिकाचं नाव समोर आलं आणि इकडे सोशल मीडियावर जोरदार ट्रोलिंग सुरु झाली आहे.

याच वर्षी जानेवारी महिन्यात दिल्लीतल्या जेएनयू विद्यापीठात हिंसा झाल्यानंतर, सुरु असलेल्या आंदोलनावेळी दीपिका समर्थन देण्यासाठी पोहोचली. कन्हैया कुमार भाषण देत असताना दीपिका तिथं 10 मिनिटं थांबली होती. मात्र ड्रग्ज प्रकरणात दीपिकाचं नाव आल्यानं याचाच राग आता सोशल मीडियावर उमटू लागला आहे.

मला माहिती आहे की दीपिका जेएनयूमध्ये का पोहोचली. जेएनयूत जाण्याऐवजी नशामुक्ती केंद्रात जायला हवं होतं, अशा शब्दात ट्रोलर्सनी दीपिकावर शाब्दिक हल्ला केला आहे.

चित्रपटांच्या पोस्टर्सचे मिम्स करुनही दीपिकावर तिच्या चाहत्यांचा आणि विरोधकांचा संताप सोशल मीडियावर दिसत आहे.

NCB जसजशी खोलवर तपास करतेय. तसतसे बडे मासे हाती लागताना दिसत आहेत. क्वीनचा निर्माता मधु मांटनेलाही NCB नं चौकशीसाठी समन्स बजावलंय. सुशांत सिंहची टॅलेंट मॅनेजर जया शाहनं NCB च्या चौकशीत मधु मांटेनाचं नाव घेतलंय.

NCB च्या ताज्या चौकशीबद्दल जर बोलायचं झालं. तर जया शाह, दीपिकाची मॅनेजर करिश्मा प्रकाश, क्वॉन कंपनीचा CEO ध्रुव चितगोपेकर, श्रुती मोदी यांची समोरासमोर बसवून चौकशी करण्यात आलीय. जया शाहची सोमवारीही 5 तास कसून चौकशी झाली आहे.

इकडे रिया चक्रवर्तीसह तिचा भाऊ शौविकच्या न्यायालयीनं कोठडीत वाढ करण्यात आलीय. त्यामुळं 6 ऑक्टोबरपर्यंत NCB ला ड्रग्ज कनेक्शनमध्ये आणखी काही नवीन आणि बडी नावं मिळण्याची दाट शक्यता आहे.

संबंधित बातम्या :

Sushant Singh Case | NCB चौकशीत आणखी एका निर्मात्याचे नाव उघड

ड्रग्ज प्रकरणी व्हॉट्सअ‍ॅप चॅट उघड, बॉलिवूडच्या चार बड्या अभिनेत्रींना NCB समन्स बजावणार

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.