विधीमंडळातील सदस्यांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा; गृहमंत्र्यांनी चौकशी करावी: जयंत पाटील

अलीकडच्या काळात वर्तमानपत्रात आणि विरोधी पक्षातील लोकांकडून 'याला ईडी लावतो, त्याला सीबीआय लावतो' अशी विविध विधाने ऐकायला मिळतात. | NCP Jayant Patil

विधीमंडळातील सदस्यांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा; गृहमंत्र्यांनी चौकशी करावी: जयंत पाटील
जयंत पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस

मुंबई: केंद्रीय संस्था जर सदस्यांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आणण्याचं काम करत असतील तर त्याचाही परामर्श व त्याचीही काळजी व त्याबाबतीतील चौकशी गृहमंत्र्यांच्या माध्यमातून व्हावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी अध्यक्षांकडे केली. (NCP leader Jayant Patil demands probe for phone tapping of Mahavikas Aghadi MLA’s)

अलीकडच्या काळात वर्तमानपत्रात आणि विरोधी पक्षातील लोकांकडून ‘याला ईडी लावतो, त्याला सीबीआय लावतो’ अशी विविध विधाने ऐकायला मिळतात. त्यामुळे विधानमंडळाचा सदस्य या नात्याने मंत्री म्हणून नव्हे या सभागृहातील अनेक सदस्यांना जर महाराष्ट्रापेक्षा वेगळी केंद्रीय एजन्सी फोन टॅपिंगवर ठेवत असेल तर अशाच आमच्या सभागृहातील सदस्यांचे संरक्षण करणे ही आपली जबाबदारी आहे असेही जयंत पाटील यांनी स्पष्ट केले.

गृहमंत्र्यांना विनंती आहे की, केंद्रीय एजन्सीकडून राज्यातील सभागृहातील किती सदस्यांचे फोन टॅपिंगला ठेवले आहेत याची माहिती सभागृहात ठेवावी. या परिस्थितीत सर्व सन्माननीय सदस्यांच्या संरक्षणाची जबाबदारी सभागृहाच्या सन्माननीय अध्यक्षांची आहे असेही जयंत पाटील यांनी सांगितले.

भाजपच्या प्रति विधानसभेला भास्कर जाधवांचा आक्षेप, नियम दाखवत म्हणाले, ‘त्यांचा स्पीकर जप्त करा’

महाराष्ट्र विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाचा आज दुसरा आणि अंतिम दिवस आहे. पहिल्या दिवशी झालेल्या ऐतिहासिक गदारोळानंतर आणि त्यानंतर भाजपच्या 12 आमदारांच्या निलंबनानंतर भाजप आज आक्रमक झालेला आहे. राज्यभर भाजपचं आंदोलन सुरु आहे तर विधिमंडळाच्या आतमध्ये पायऱ्यांवरच भाजपने प्रति विधानसभा भरवलीय. या प्रतिविधानसभेवर शिवसेना आमदार भास्कर जाधव यांनी आक्षेप नोंदवत अध्यक्षांची परवानगी नसताना अशी सभा घेतलीच कशी जाऊ शकते, असा प्रश्न विचारला. तसंच त्यांचे माईक जप्त करण्याचे आदेश द्या, अशी मागणी विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांच्याकडे केली.

विधानसभेच्या पायरीवर बसण्याचा निश्चित अधिकार आहे, तिथे घोषणाबाजी करण्याच देखील अधिकार आहे परंतु संसदीय कामकाज चालू असताना स्पीकर लावून मोठमोठ्याने घोषणा देणे आणि तश्या प्रकारचा आंदोलन करणं यासाठी अध्यक्षांची परवानगी घ्यावी लागते ती परवानगी भाजपने घेतली आहे का? जर घेतली नसेल तर असं आंदोलन करुच कसं शकतात. त्यांचा स्पीकर ताबडतोब जप्त करण्याचे आदेश अध्यक्ष महोदय आपण द्यावेत, अशी मागणी भास्कर जाधव यांनी नरहरी झिरवळ यांनी केली.

संबंधित बातम्या:

महाराष्ट्रातही राबवला जातोय सत्ताबदलाचा ‘बिहारी पॅटर्न’? सेना-भाजपचं सरकार निश्चित? काय घडतंय? वाचा सविस्तर

माझ्यावर आरोप म्हणजे सरकारवर आरोप, गुन्हा केला असेल तर शिक्षेला तयार, केला नसेल तर सरकारने क्लीनचिट द्यावी : सरनाईक

VIDEO: भास्कर जाधव हे नरकासुर आणि सोंगाड्या; नितेश राणेंचा हल्लाबोल

(NCP leader Jayant Patil demands probe for phone tapping of Mahavikas Aghadi MLA’s)

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI