AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Neha Kakkar | लग्न की फक्त लग्नाचा ‘ड्रामा’?, नव्या गाण्यानंतर नेहा कक्करचे चाहते बुचकळ्यात!

गाण्यात नेहाचे लग्न दाखवल्याने ती खरेच लग्न करतेय की केवळ गाण्यासाठी हा सगळा ड्रामा होता, असा प्रश्न तिच्या चाहत्यांना पडला आहे.

Neha Kakkar | लग्न की फक्त लग्नाचा ‘ड्रामा’?, नव्या गाण्यानंतर नेहा कक्करचे चाहते बुचकळ्यात!
| Updated on: Oct 21, 2020 | 3:29 PM
Share

मुंबई : गायिका नेहा कक्कर (Neha Kakkar) सध्या तिच्या लग्नाच्या वृत्तामुळे चर्चेत आहे. पंजाबी गायक रोहनप्रीत सिंहसह ती लग्न बेडीत अडकणार असल्याचे म्हटले जाते आहे. लग्नाच्या चर्चांना उधाण आलेले असतानाच नेहाचे नवे गाणे (New Song) प्रदर्शित झाले आहे. ‘नेहू दा व्याह’ असे या गाण्याचे नाव आहे. या गाण्यात नेहासोबत गायक रोहनप्रीतही झळकला आहे. ‘नेहू दा व्याह’ या गाण्यात नेहा आणि रोहनप्रीतचे लग्न दाखवण्यात आले आहे. त्यामुळे तिचे चाहते आता पुन्हा एकदा बुचकळ्यात पडले आहेत. (Neha kakkars new song Nehu da vyah release today)

गाण्यात नेहाचे लग्न दाखवल्याने ती खरेच लग्न करतेय की केवळ गाण्यासाठी हा सगळा ड्रामा होता, असा प्रश्न तिच्या चाहत्यांना पडला आहे. या गाण्याला तिच्या चाहत्यांकडून उत्तम प्रतिसाद मिळत आहे. नेहा आणि रोहनप्रीतची जोडीदेखील प्रेक्षकांना प्रचंड आवडली आहे.

नेहाने शेअर केला रोका सेरेमनीचा व्हिडीओ

काही दिवसांपूर्वी नेहा आणि रोहनप्रीतने त्यांच्या ‘रोका’ सेरेमनीचा व्हिडीओ शेअर केला होता. यात दोघेही आनंदात नृत्य करताना दिसले होते. हा व्हिडीओ शेअर करत नेहाने तिचे आगामी गाणे लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याचे म्हटले होते. (Neha kakkars new song Nehu da vyah release today)

नेहा-आदित्यच्या लग्नाची चर्चा

‘इंडियन आयडॉल’ या रिअ‍ॅलिटी शोमध्ये नेहा आणि आदित्य नारायण हे दोघे एकमेकांच्या प्रेमात असून ते लग्न करणार असल्याची अफवा पसरली होती. पण त्यांची ही लव्ह केमेस्ट्री फक्त कार्यक्रमापुरतीच मर्यादित होती.

कार्यक्रमाच्या प्रसिद्धीसाठी हा लव्ह अँगल तयार करण्यात आला होता. आदित्य नारायणच्या आधीही हिमांश कोहली हे नाव नेहासोबत जोडले गेले होते. नेहा आणि हिमांश अनेक दिवस एकमेकांसोबत रिलेशनमध्ये होते. पण नंतर त्यांचा ब्रेकअप झाला. प्रेमात धोका मिळाल्यानंतर दोघेही सोशल मीडियावर एकमेकांच्या विरोधात लिहित असल्याचेही चाहत्यांनी पाहिले आहे. पण या सगळ्या चर्चेनंतर अखेर नेहाने लग्नाचा निर्णय घेतला असल्याचे सांगण्यात येत आहे.(Neha kakkars new song Nehu da vyah release today)

‘या’ महिन्यात लग्नाची शक्यता

मीडिया रिपोर्टनुसार, रोहनप्रीत सिंह आणि नेहा कक्कर या महिन्याच्या शेवटच्या तारखेला विवाह करणार असल्याचे सांगण्यात येत आहे. ‘रोका’नंतर दोघांमध्येही लग्नाविषयी फायनल चर्चा झाली असल्याची म्हटले जात आहे.

View this post on Instagram

Jab we met! ♥️? @rohanpreetsingh ? #LoveAtFirstSight ?? #NehuDaVyah #NehuPreet

A post shared by Neha Kakkar (@nehakakkar) on

कोण आहे रोहनप्रीत सिंग?

रोहनप्रीत सिंग ‘रायझिंग स्टार’ या गायन रियलिटी शोमध्ये पहिला रनरअप होता. तो बिग बॉस फेम शहनाज गिल या टीव्ही रिअ‍ॅलिटी शो ‘मुझसे शादी करोगे’ मध्येही चाहत्यांच्या पसंतीस उतरला होता. रोहनच्या आवाजाने त्याने अनेकांच्या मनात जागा मिळवली आहे. खरंतर, शहनाजसुद्धा रोहनला आवडत होती. पण रोहनने नेहासोबत लग्नगाठ बांधण्याचा निर्णय घेतला आहे. सध्या हे दोघेही इंस्टाग्रामवर प्रेमाची कबूली देत अनेक पोस्ट शेअर करत आहेत.

(Neha kakkars new song Nehu da vyah release today)

Follow Us
सांगली जिल्हा परिषदेत मविआची सत्ता, अध्यक्षपदी पवार गटाची महिला
सांगली जिल्हा परिषदेत मविआची सत्ता, अध्यक्षपदी पवार गटाची महिला.
उद्या गुढीपाडवा... पण नववर्ष कधी सुरू होणार?
उद्या गुढीपाडवा... पण नववर्ष कधी सुरू होणार?.
ठाकरे युतीनंतर पहिलाच गुढीपाडवा मेळावा, राज ठाकरे काय बोलणार?
ठाकरे युतीनंतर पहिलाच गुढीपाडवा मेळावा, राज ठाकरे काय बोलणार?.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात गॅस तुटवड्यानंतर आणखी एक मोठं संकट
सिंधुदुर्ग जिल्ह्यात गॅस तुटवड्यानंतर आणखी एक मोठं संकट.
मुंबईला गँगवॉरकडे जाऊ देणार नाही - CM फडणवीस
मुंबईला गँगवॉरकडे जाऊ देणार नाही - CM फडणवीस.
दिल्ली मेट्रो स्टेशनजवळील सदनगर परिसरात भीषण आग; 7 जणांचा मृत्यू
दिल्ली मेट्रो स्टेशनजवळील सदनगर परिसरात भीषण आग; 7 जणांचा मृत्यू.
बलिदान मास पूर्ण करत, शंभू भक्तांकडून छत्रपती संभाजी महाराजांना अभिवाद
बलिदान मास पूर्ण करत, शंभू भक्तांकडून छत्रपती संभाजी महाराजांना अभिवाद.
अजित पवारांच्या अपघातावरून रोहित पवार यांचा थेट सरकारवर आरोप
अजित पवारांच्या अपघातावरून रोहित पवार यांचा थेट सरकारवर आरोप.
दिल्ली दौऱ्यात शिंदेचं मोदींसोबत खलबतं; केंद्रीय मंत्रिमंडळ....
दिल्ली दौऱ्यात शिंदेचं मोदींसोबत खलबतं; केंद्रीय मंत्रिमंडळ.....
हे सर्व भाजपचे अंगवस्त्र, संजय राऊत यांची कुणावर टीका; काय दिला इशारा?
हे सर्व भाजपचे अंगवस्त्र, संजय राऊत यांची कुणावर टीका; काय दिला इशारा?.