INS विक्रांतमधील इलेक्ट्रॉनिक उपकरण चोरी प्रकरणी 14 राज्यात तपास, 6 हजार 500 जणांची चौकशी, NIA कडून 2 चोरांना अटक

INS विक्रांत मधून इलेक्ट्रॉनिक उपकरणे चोरी प्रकरणात 2 चोरांना पकडण्यात आलं आहे. तपासात हाती आलेल्या माहितीनुसार ३ जून रोजी मॅक्सवे इंजिनिअरिंग कंस्ट्रक्शन प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीने सप्टेंबर 2018 ते 2019 दरम्यान INS विक्रांतचं रंगकाम हाती घेतलं होतं.

INS विक्रांतमधील इलेक्ट्रॉनिक उपकरण चोरी प्रकरणी 14 राज्यात तपास, 6 हजार 500 जणांची चौकशी, NIA कडून 2 चोरांना अटक
Follow us
| Updated on: Nov 08, 2020 | 9:27 AM

नवी दिल्ली: आयएनएस विक्रांत (INS VIKRANT)मधून इलेक्ट्रॉनिक उपकरणे चोरी प्रकरणात 2 चोरांना पकडण्यात आलं आहे. या चोरांना पकडण्यासाठी राष्ट्रीय तपास यंत्रणा अर्थात NIA ने जवळपास 6 हजार 500 लोकांची चौकशी केली आहे. NIA ने गेल्या 9 महिन्यात 14 राज्यांमध्ये तपास केला. INS विक्रांतमधून प्रोसेसर, रँडम एक्सेस मेमरी आणि सॉलिड स्टेट ड्राइव्ह यासह अन्य महत्वपूर्ण इलेक्ट्रॉनिक उपकरणं चोरीला गेले आहेत. INS विक्रांत ही कोचीन शिप यार्ड लिमिटेड (CSL) मध्ये बनवण्यात आलेलं भारताचं पहिलं स्वदेशी विमानवाहू जहाज आहे. (NIA arrests 2 thieves in INS Vikrant theft case)

तपासात हाती आलेल्या माहितीनुसार ३ जून रोजी मॅक्सवे इंजिनिअरिंग कंस्ट्रक्शन प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीने सप्टेंबर 2018 ते 2019 दरम्यान INS विक्रांतचं रंगकाम हाती घेतलं होतं. त्या कंपनीच्या काही कमगारांनी छोट्या-मोठ्या वीज उपकरांची चोरी केली होती, असं कंपनीच्या मालकांने मान्य केलं आहे.

NIAकडून 2 चोरांना अटक

NIA ने मॅक्सवे इंजिनिअरिंग कंस्ट्रक्शन प्रायव्हेट लिमिटेडच्या कामगारांना त्यांच्या फिंगर प्रिंट आधारे ताब्यात घेतलं आहे. त्यात बिहारच्या मुंगेरमधील सुमित कुमार सिंह आणि राजस्थानच्या हनुमानगढ इथला दया रामचा समावेश आहे. दोघांचे फिंगर प्रिंट मिळाल्यानंतर तपास यंत्रणेकडून त्यांना १० जून रोजी अटक करण्यात आलं. अटकेत असलेल्या सुमितकडून चोरी केलेला एक ड्राइव्ह आणि एक रॅम ताब्यात घेतला आहे. या दोघांनी सप्टेंबर 2019 मध्ये एक प्रोसेसर विकला होता. हा प्रोसेसरही तपास यंत्रणेनं ताब्यात घेतला आहे.

26 सप्टेंबर 2019 पासून तपास सुरु

या चोरीचा तपास 26 सप्टेंबर 2019 मध्ये NIAकडे सोपवण्यात आला होता. विमानावर एका दिवसात दीड ते दोन हजार लोकांनी काम केल्याचं तपासात पुढे आलं. त्यात 600 ते 700 कामगारांनी ओव्हरटाईम केलं आणि संध्याकाळी 6 नंतर रात्री 200 ते 300 कामगारांनी विमावर काम केलं.

जहाजावर जाणाऱ्या सर्वांचीच तपासणी

ऑगस्ट आणि सप्टेंबर 2019 मध्ये जहाजावर जाणाऱ्या सर्वांचीच म्हणजे जवळपास 3 हजार 638 कंत्राटी कामगारांसह 195 ठेकेदारांची यादी बनवण्यात आली. त्यांच्या तपासासाठी टीम बनवण्यात आल्या. NIA ने तपासासाठी VOIP तंत्राचाही वापर केला पण हाती काही लागलं नाही. त्यानंतर तामिळनाडू, कर्नाटक, तेलंगना, आंध्र प्रदेश, महाराष्ट्र, मध्य प्रदेश, झारखंड, उत्तराखंड, छत्तीसगड, ओडिशा, बिहार, राजस्थान, पश्चिम बंगाल आणि गुजरात अशा 14 राज्यांमध्ये NIA च्या टीमने तपास केला. सर्व संशयीतांच्या बोटांचे ठसे घेण्यात आले. कोचीमध्ये जवळपास 6 हजार 14 जणांच्या फिंगर प्रिंटचा तपास करण्यात आला. चोरांचं नाव सांगणाऱ्यांना 5 लाखाचं बक्षिसही जाहीर करण्यात आलं होतं.

NIA arrests 2 thieves in INS Vikrant theft case

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.