निफाड पोलिसांची मोठी कारवाई, 74 लाखांचा मुद्देमालासह 4 जणांना अटक, युवासेनेच्या शहरप्रमुखाचाही समावेश

नांदेडच्या दिशेने जाणारा मद्याचा ट्रक अज्ञात नागरिकांनी पळवून नेल्याची धक्कादायक घटना बुधवारी (9 डिसेंबर) पहाटेच्या सुमारास घडली.

निफाड पोलिसांची मोठी कारवाई, 74 लाखांचा मुद्देमालासह 4 जणांना अटक, युवासेनेच्या शहरप्रमुखाचाही समावेश

नाशिक : नांदेडच्या दिशेने जाणारा मद्याचा ट्रक अज्ञात नागरिकांनी पळवून नेल्याची धक्कादायक घटना बुधवारी (9 डिसेंबर) पहाटेच्या सुमारास घडली. यानंतर निफाड पोलिसांनी तात्काळ कारवाई करत विंचूर औद्योगिक वसाहतीतून ट्रक ताब्यात घेतला. या प्रकरणी निफाड पोलिसांनी चौघांना ताब्यात घेतले आहे. विशेष म्हणजे यात मनमाडच्या युवासेनेच्या शहर प्रमुखाचाही समावेश आहे. इरफान याकूब मोमीन असं या युवासेनेच्या शहर प्रमुखाचं नाव आहे. पोलिसांनी आरोपींकडून तब्बल 74 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय (Niphad Police Action on thief of alcohol in Nashik Yuvasena leader arrested).

निफाड पोलिसांची केलेल्या या मोठ्या कारवाईत मॅकडॉल कंपनीची विदेशी दारूचे 950 बॉक्स आणि आयशर आणि ट्रक असा मुद्देमाल सापडला. तसेच चाकूचा धाक दाखवू लुटमार करण्याचा प्रयत्न करणाऱ्या 6 ते 7 जणांचा भांडाफोड झाला. पोलिसांनी 74 लाखांच्या मुद्देमालासह 4 जणांना अटक केली आहे. यात मनमाड युवासेनेच्या शहरप्रमुखाचाही समावेश असल्याचं उघड झालं. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलंय.

अधिक माहिती अशी की, दिंडोरी येथून बुधवारी (9 डिसेंबर) रोजी पहाटेला एक ट्रक मद्याचे बॉक्स घेऊन नांदेडकडे निघाला होता. हा ट्रक निफाडमार्गे नांदेडकडे निघाला असताना पहाटे 2 ते 5 वाजेच्या सुमारास पाच ते सहा जणांच्या टोळक्याने निफाड तालुक्यातील शिवरे फाटा नजीक चालक आणि त्याच्या पत्नीला बळजबरीने वाहणाखाली उतरवले आणि एका खासगी वाहनात बसवून नेले. तर इतर काही संशयितांनी हा ट्रक पळवून नेला.

दरम्यान, याबाबतची माहिती निफाड पोलिसांना मिळाल्यानंतर त्यांनी ताबडतोब तपासाची चक्रे फिरवली. यानंतर हा ट्रक त्यांना विंचूर औद्योगिक वसाहतीत आढळून आला. हा ट्रक पोलिसांनी ताब्यात घेतला असून यामध्ये जवळपास 59 लाखांचे मद्य मिळून आले आहे.

संपूर्ण मद्य वैध स्वरूपाचे असून अद्याप मात्र बिले प्राप्त झाली नसल्याचे निफाड पोलिसांनी सांगितले. जवळपास या 90 ते 99 टक्के मुद्देमाल हा आपल्याला मिळून आल्याचेही ते म्हणाले. या घटनेत आतापर्यंत चौघांना ताब्यात घेण्यात आले असून तिघे मनमाडचे तर एक आरोपी नाशिकचा आहे. अधिक तपास निफाड पोलीस करत आहेत.

हेही वाचा :

‘लस टोचल्यानंतर दोन महिने दारूला हात लावू नका’, रशिया सरकारचा नागरिकांना इशारा

चहा-कॉफी की बियर-वाईन, काय पिता तुम्ही… त्याचे फायदे-तोटे तुम्हाला माहिती आहे का?

चिअर्स! पर्यटनस्थळं, महामार्गालगतची दारुची दुकानं पुन्हा सुरू होणार; सरकारचा मोठा निर्णय

Niphad Police Action on thief of alcohol in Nashik Yuvasena leader arrested

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI