नितीश सरकारचे खातेवाटप जाहीर, फडणवीसांप्रमाणे गृह विभाग स्वतःकडे, भाजपला कोणती खाती?

सोमवारी शपथविधी सोहळा पार पडल्याबरोबर आज मंगळवारी मुख्यमंत्री  नितीश कुमार यांनी खातेवाटप जाहीर केलं आहे.

नितीश सरकारचे खातेवाटप जाहीर, फडणवीसांप्रमाणे गृह विभाग स्वतःकडे, भाजपला कोणती खाती?
Follow us
| Updated on: Nov 17, 2020 | 4:25 PM

पाटणाबिहारमध्ये नितीश कुमार यांच्या नेतृत्वात एनडीएचं सरकार स्थापन झालं आहे. सोमवारी शपथविधी सोहळा पार पडल्याबरोबर आज मंगळवारी मुख्यमंत्री  नितीश कुमार यांनी खातेवाटप जाहीर केलं आहे. मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्याबरोबर एकूण 14 जणांनी मंत्रिपदाची शपथ घेतली होती. (Nitish kumar Government PortFolio Distribution)

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याप्रमाणे नितीश कुमार यांनी गृहखाते स्वत:कडे ठेवलं आहे. गृहखात्याबरोबच सामान्य प्रशासन तसंच ज्या खात्यांचं वाटप झालेलं नाही अशी खाती त्यांनी स्वत:कडे ठेवली आहे. तर उपमुख्यमंत्री तारकिशोर प्रसाद यांच्याकडे अर्थ, पर्यावरण, वन, आपत्ती व्यवस्थापन तसंच नगरविकास खात्याचा कार्यभार सोपवला आहे.

बिहारच्या उपमुख्यमंत्री रेणू देवी यांच्याकडे पंचायत राज, सामाजिक न्याय तसंच ईबीसी कल्याण त्याचबरोबर उद्योग विभागही देण्यात आला आहे. विजय चौधरी यांच्याकडे ग्रामविकास, जलसंपदा, माहिती आणि प्रसारण तसंच संसदीय कार्यविभाग सोपवण्यात आला आहे. बिजेंद्र यादव यांच्याकडे उर्जा मंत्रालयाबरोबर अन्न आणि नागरी पुरवठा विभाग देण्यात आला आहे.

अशोक चौधरी यांच्यावर बांधकाम, समाजकल्याण तसंच विज्ञान तंत्रज्ञानासह अल्पसंख्याक विभागाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. मेवालाल चौधरी यांना शिक्षण मंत्रालयाची महत्त्वाची जबाबदारी देण्यात आली आहे. शीला कुमार यांना परिवहन मंत्रालय, संतोश मांझी यांना सिंचन खात्याबरोबर अनुसूचित जाती आणि जमाती कल्याण खात्याची जबाबदारी देण्यात आली आहे. मुकेश सहानी यांना पशुसंवर्धन तसंच मत्स्य मंत्रालय देण्यात आलं आहे.

भाजपच्या कोट्यातून मंगल पांडे यांच्यावर मोठी जबाबदारी सोपवण्यात आली आहे. पांडे यांच्याकडे आरोग्याबरोबरच रस्ते बांधकाम, कला आणि संस्कृती यांसारखी महत्त्वाची खाती दिली गेली आहेत. अमरेंद्र सिंग यांच्याकडे कृषी आणि सहकार अशी दोन मंत्रालये देण्यात आली आहेत. रामप्रीत पासवान यांना पीएचडी विभाग मिळाला आहे. जीवेश कुमार यांना पर्यटन आणि कामगार मंत्रालयांची जबाबदारी देण्यात आली आहे. तर राम सुंदर यांना महसूल आणि कायदा मंत्रालयाची जबाबदारी मिळाली आहे.

बिहार सरकारमध्ये कोण कोण मंत्री

जेडीयू : विजय चौधरी, विजेंद्र यादव, अशोक चौधरी, मेवालाल चौधरी, शीला मंडल भाजप : तारकिशोर प्रसाद, रेणु देवी, अमरेंद्र प्रताप सिंह, मंगल पांडे, रामसूरत राय, रामप्रीत पासवान, जीवेश मिश्रा विकासशील इन्सान पक्ष : मुकेश सहानी हिंदुस्तान आवाम मोर्चा : संतोष सुमन

(Nitish kumar Government PortFolio Distribution)

संबंधित बातम्या

बिहारमध्ये पुन्हा नितीश’राज’!; नितीश कुमार यांनी घेतली मुख्यमंत्रिपदाची शपथ

बिहारच्या सीएमपदी निवडीनंतर नितीश कुमार ‘अ‍ॅक्शन मोड’मध्ये; मंगळवारी सकाळी 11 वाजता कॅबिनेटची पहिली बैठक

“सरकारचा कार्यकाळ पूर्ण होईपर्यंत एनडीएचेच मुख्यमंत्री राहा”, बिहारच्या युवा नेत्याचा नितीश कुमारांना चिमटा

Non Stop LIVE Update
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?.
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण.
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं.
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा.
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?.
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री.
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली.
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज.
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?.
ठरलं... रत्नागिरी-सिंधुदुर्गातून राणे लढणार, भाजपकडून 13 वी यादी जाहीर
ठरलं... रत्नागिरी-सिंधुदुर्गातून राणे लढणार, भाजपकडून 13 वी यादी जाहीर.