मगरीच्या तोंडातून आपल्या कुत्र्याला वाचवलं, 74 वर्षांच्या आजोबांचा धाडसी व्हिडीओ व्हायरल

एका व्हिडीओत एक व्यक्ती मगरीच्या तावडीत सापडलेल्या आपल्या कुत्र्याला वाचवण्यासाठी जीव धोक्यात टाकताना दिसत आहे.

मगरीच्या तोंडातून आपल्या कुत्र्याला वाचवलं, 74 वर्षांच्या आजोबांचा धाडसी व्हिडीओ व्हायरल
Follow us
| Updated on: Nov 23, 2020 | 8:03 PM

वॉशिंग्टन : जगभरात पाळीव प्राण्यांची आवड असणाऱ्यांची संख्या मोठी आहे. या सर्वांनाच आपल्या घरी पाळलेल्या प्राण्यांबद्दल खूप प्रेम आणि लळा असतो. हे प्राणी संबंधित व्यक्तींच्या कुटुंबाचाच भाग असतात. त्यामुळे हे प्राणी संकटात सापडले तर संबंधित व्यक्ती त्याला वाचवण्यासाठी अगदी आपल्या जीवाची पर्वा न करता प्रयत्न करतात. हेच सिद्ध करणारा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओत एक व्यक्ती मगरीच्या तावडीत सापडलेल्या आपल्या कुत्र्याला वाचवण्यासाठी जीव धोक्यात टाकताना दिसत आहे (Old man jumps into pond to save pet dog from jaws of alligator video viral).

ही घटना अमेरिकेच्या फ्लोरिडा राज्यातील आहे. या ठिकाणी 74 वर्षीय रिचर्ड विलबँक्स (Richard Wilbanks) आपल्या कुत्र्याला वाचवण्यासाठी थेट मगरीशी भिडले. त्यांचा मगरीशी केलेल्या या झुंजीचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होता आहे. या व्हिडीओत रिचर्ड कुत्र्याला वाचवण्यासाठी तलावात उडी घेतात आणि मगरीच्या जबड्यातून कुत्र्याला वाचवतात. यासाठी ते स्वतःचा जीव धोक्यात टाकत आपल्या हाताने मगरीचा जबडा उघडतात आणि कुत्र्याला मगरमिठीतून सोडवतात. यावेळी मगरीने त्यांच्यावर हल्ला करण्याचाही मोठा धोका होता. मात्र, रिचर्ड यांनी आपल्या कुत्र्याला वाचवताना याचीही पर्वा केली नाही.

आपल्या कुत्र्याला वाचवण्यासाठी रिचर्ड यांनी या धाडसाने मगरीशी सामना केला त्याचं अनेकजण कौतुक करत आहेत. त्यांनी मगरीचा जबडा दोन्ही हातांनी उघडत कुत्र्याला वाचवलं. रिचर्ड यांनी सांगितलं की, मगरीला पकडणे कठीण नव्हतं, मात्र मगरीचा जबडा उघडणं खूपच अवघड होतं. मगरीने चावल्याने कुत्र्याच्या पोटाला जखम झाली आहे. पण त्याचा जीव वाचला आहे. ते आता सुरक्षित आहे. कुत्र्याला मगरीच्या तोंडातून बाहेर काढताना रिचर्ड यांच्या हातालाही दुखापत झाली.

सोशल मीडियावर आपल्या कुत्र्याला वाचवतानाचा हा व्हिडीओ वेगाने व्हायरल होत आहे. आपल्या पाळीव कुत्र्यासाठी आपल्या जीवाची बाजी लावणाऱ्या रिचर्ड याचं लोक चांगलंच कौतुक करत आहेत. तसेच हा व्हिडीओ शेअर करुन आपल्या भावना व्यक्त करत आहेत.

हेही वाचा :

अमेरिकेने गायब केल्याचा आरोप, हुकूमशाह किम जोंगचा पुतण्या हान सोल कोण आहे?

नासाच्या क्युरॉसिटी रोव्हरचा थेट मंगळावर सेल्फी, खोदकाम करताना धुळीने माखलेल्या रोबोटची जोरदार चर्चा

विश्वास बसणार नाही, पण अलास्कातील ‘या’ शहरात आता थेट 2021 मध्ये सूर्योदय होणार

Old man jumps into pond to save pet dog from jaws of alligator video viral

Non Stop LIVE Update
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ.
हातकणंगलेत धैर्यशील माने यांची वाट बिकट, भाजपा कार्यकर्त्यांची नाराजी
हातकणंगलेत धैर्यशील माने यांची वाट बिकट, भाजपा कार्यकर्त्यांची नाराजी.
काँग्रेस पक्षाला आयकरकडून नवी नोटीस, इतक्या कोटींचा ठोठावला दंड
काँग्रेस पक्षाला आयकरकडून नवी नोटीस, इतक्या कोटींचा ठोठावला दंड.
तर युतीतून बाहेर पडू पण उमेदवार मागे नाही, बच्चू कडू यांचा थेट इशारा
तर युतीतून बाहेर पडू पण उमेदवार मागे नाही, बच्चू कडू यांचा थेट इशारा.
हर्षवर्धन यांची नाराजी दूर होणार का? फडणवीसांच्या सागर बंगल्यावर बैठक
हर्षवर्धन यांची नाराजी दूर होणार का? फडणवीसांच्या सागर बंगल्यावर बैठक.
गैरव्यवहाराच्या आरोपात अजितदादांनंतर प्रफुल्ल पटेलांनाही दिलासा
गैरव्यवहाराच्या आरोपात अजितदादांनंतर प्रफुल्ल पटेलांनाही दिलासा.
महायुतीत जागा वाटपावरून तिढा कायम, कुठं अंतर्गत रस्सीखेच तर पेच कायम?
महायुतीत जागा वाटपावरून तिढा कायम, कुठं अंतर्गत रस्सीखेच तर पेच कायम?.
भाजपवरून शिंदे गटात अंतर्गत नाराजी,अनेक मतदारसंघ भाजपने स्वतःकडे खेचले
भाजपवरून शिंदे गटात अंतर्गत नाराजी,अनेक मतदारसंघ भाजपने स्वतःकडे खेचले.
शिवसेनेत गोविंदाची एन्ट्री अन् दादांचं 15 दिवसांपूर्वी वक्तव्य चर्चेत
शिवसेनेत गोविंदाची एन्ट्री अन् दादांचं 15 दिवसांपूर्वी वक्तव्य चर्चेत.
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका.