AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

तोंडावर वार, एकतर्फी प्रेमातून तरुणीच्या वडिलांची हत्या

एकतर्फी प्रेमातून नंदुरबार येथे एका तरुणाने तरुणीच्या वडिलांची हत्या (nandurbar murder deu to one side love) केली आहे.

तोंडावर वार, एकतर्फी प्रेमातून तरुणीच्या वडिलांची हत्या
| Edited By: | Updated on: Feb 28, 2020 | 9:02 AM
Share

नंदूरबार : एकतर्फी प्रेमातून नंदुरबार येथे एका तरुणाने तरुणीच्या वडिलांची हत्या (nandurbar murder deu to one side love) केली आहे. ही घटना नंदूरबार जिल्ह्यातील नवापूर तालुक्यातील श्रावणी येथे शेतातील घराजवळ घडली. एकतर्फी प्रेम करत असलेल्या तरुणीच्या वडिलांनी लग्नासाठी नकार दिल्याने तरुणाने त्यांची हत्या केली. या धक्कादायक घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केली असून अधिक चौकशी सुरु आहे. भटुलाल परदेशी असं मृताचं नाव (nandurbar murder deu to one side love) आहे.

आरोपी तरुण तरुणीवर एकतर्फी प्रेम करत होता. तरुणीवर एकतर्फी प्रेम करत असलेल्या आरोपी तरुणाला तिचे लग्न असल्याची माहिती मिळाली. त्याने थेट तरुणीच्या गावी येऊन तिच्या वडिलांची समजूत काढली. परंतु तरुणीच्या वडिलांना विवाह मान्य नसल्याने त्यांनी सदर युवकाला शिवीगाळ केले. तसेच त्यांच्यात झटापटी झाली. या झटापटीत युवकाने दगडाने डोक्यावर, तोंडावर वार करुन तरुणीच्या वडिलांची हत्या केली.

या हत्येनंतर घटनास्थळी पोलिसांनी धाव घेतली. मारण्यासाठी वापरलेल्या रक्ताने माखलेला दगड आणि इतर महत्वाचे पुरावे जप्त केले. या गुन्ह्यासंदर्भात मयताचा मुलगा मिलिंदकुमार भटुलाल परदेशी यांनी विसरवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिल्याने अज्ञाताविरुध्द खूनाचा गुन्हा दाखल झाला होता.

हा गुन्हा उघडकीस आणण्यासाठी स्वतंत्र पथक तयार करुन तपासासाठी रवाना केले. या पथकाने शेतशिवारात जावून रखवालदारांची विचारपूस केली. परंतु हाती काहीच लागले नाही. पोलीस निरीक्षक किशोर नवले यांनी मयत परिवाराच्या दुःखात सहभागी होत आपल्या अनुभवातून गुन्ह्याच्या तपासाबाबत विचारपूस केली, तरीही काही थांगपत्ता लागत नव्हता.

मृत व्यक्तीची मुलगी नाशिक येथील कंपनीत कामाला होती. तिचा एक सहकारी अधूनमधून घरी येवून चार ते पाच दिवस मुक्कामी राहत असल्याची माहिती पोलीस निरीक्षक नवले यांना मिळाली. या माहितीच्या आधारे त्यांनी पथकास सदर सहकारीचा शोध घेण्यासाठी नाशिक येथे रवाना केले. या पथकाने नाशिकचा परिसर पिंजून काढत पाथर्डी फाटा परिसरातील दामोदर नगरात संशयित राहत असल्याने तो एका अ‍ॅसॉर्ट नावाच्या ऑनलाईन खरेदी-विक्री कंपनीत काम करित असल्याची माहिती मिळाली.

आरोपी काम करत असलेल्या ठिकाणी 400 ते 500 कर्मचारी असल्याने पथकाने अगदी शिताफीने माहिती मिळवित गुन्ह्यातील संशयित देवदत्त उदयवीरसिंग (रा.नरहरीनगर नाशिक, मुळगांव कादरवाडी उत्तरप्रदेश) यास ताब्यात घेतले. त्यास नंदुरबार येथे आणून पथकाने विचारपूस केल्याने त्याने गुन्ह्याची कबुली दिली आहे.

KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार.
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार.
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन.