AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कोरोनाचा फटका, कांद्याची निर्यात खुली होऊनही भावात घसरण सुरुच

जगभरात कोरोनाचं थैमान सुरु आहे. त्यामुळे त्याचे मोठे परिणाम पाहायला मिळत आहेत. असाच परिणाम कांद्याच्या दरावरही झाला आहे (Corona effect on Onion Price).

कोरोनाचा फटका, कांद्याची निर्यात खुली होऊनही भावात घसरण सुरुच
| Updated on: Mar 16, 2020 | 1:49 PM
Share

नाशिक : जगभरात कोरोनाचं थैमान सुरु आहे. त्यामुळे त्याचे मोठे परिणाम पाहायला मिळत आहेत. असाच परिणाम कांद्याच्या दरावरही झाला आहे (Corona effect on Onion Price). 15 मार्चपासून कांदा निर्यात सुरू झाली आहे. मात्र, त्यानंतरही कोरोनामुळे कांद्याचे दर घसरत असल्याचं पाहायला मिळत आहे. बाजारात कांद्याची मोठ्या प्रमाणात आवक होत आहे. शनिवारच्या तुलनेत आज (16 मार्च) लासलगाव बाजार समितीत कांद्याच्या बाजारभावात 250 रुपये प्रति क्विंटल घसरण झाली. त्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ झाली आहे.

मागील काळात कांदा निर्यात खुली करावी यासाठी नाशिक जिल्ह्यासह अनेक ठिकाणी कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी आंदोलनं केली. त्यामुळे अखेर केंद्र सरकारला निर्यात खुली करावी लागली. 15 मार्चपासून कांद्याची निर्यात बांगलादेश, नेपाळ, मलेशिया, श्रीलंका, सिंगापूर, दुबई आणि सौदी अरेबिया या देशांमध्ये सुरु झाली. मात्र, सध्या भारतासह जगभरात कोरोनाने मोठा धुमाकूळ घातला आहे. त्याचा परिणाम कांद्याच्या निर्यातीवरही दिसून येत आहे.

लासलगाव बाजार समितीत 1600 वाहनांतून 30 हजार क्विंटल कांद्याची विक्रमी आवक झाली. उन्हाळी कांद्याला जास्तीजास्त 1790, सरासरी 1600 तर कमीतकमी 1000 रुपये प्रति क्विंटल भाव मिळाला. लाल कांद्याला कमाल 1780, सरासरी 1500 तर कमीतकमी 900 रुपये प्रति क्विंटल बाजार भाव मिळाला, अशी माहिती लासलगाव बाजार समितीच्या सभापती सुवर्णा जगताप यांनी दिली.

गेल्या 13 दिवसांपूर्वी कांद्याची निर्यात बंदी उठणार असल्याचं केंद्र सरकारच्यावतीने जाहीर करण्यात आलं होतं. तेव्हापासून कांद्याचे बाजार भाव वाढतील अशी शेतकऱ्यांना अपेक्षा होती. या अपेक्षेने कांदा उत्पादक शेतकर्‍यांनी मोठ्या प्रमाणात कांदा साठवला. मात्र, आज लासलगाव बाजार समितीत कांद्याची मोठी आवक झाल्यानं कांद्याचा बाजार भाव प्रति क्विंटल 250 रुपयांनी घसरला. त्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी केंद्र सरकारवर नाराजी व्यक्त केली आहे.

Corona effect on Onion Price

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.