AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ऑनलाईन पैसे ट्रान्सफर करताय? 1 लाख लोकांना 6 अब्ज रुपयांचा चुना

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (आरबीआय) दिलेल्या आकडेवारीनुसार, 2016 पासून 2019 म्हणजेच गेल्या तीन वर्षात जवळपास 1 लाख 76 हजार 423 लोकांना ऑनलाईन पैसे ट्रान्सफर करताना तब्बल 6 अब्ज 96 कोटी 35 लाख रुपयांचा चुना लागला आहे.

ऑनलाईन पैसे ट्रान्सफर करताय?  1 लाख लोकांना 6 अब्ज रुपयांचा चुना
| Updated on: Jul 17, 2019 | 1:51 PM
Share

नवी दिल्ली : देशात डिजीटल माध्यामातून पैसे ट्रान्सफर करताना अनेक लोकांची फसवणूक झाल्याचे प्रकरण वारंवार समोर येतात.  याप्रकरणी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (आरबीआय) दिलेल्या आकडेवारीनुसार, 2016 पासून 2019 पर्यंत (गेल्या तीन वर्षात) जवळपास 1 लाख 76 हजार 423 लोकांना ऑनलाईन पैसे ट्रान्सफर करताना तब्बल 6 अब्ज 96 कोटी 35 लाख रुपयांचा चुना लागला आहे. माहिती कायद्यातंर्गत आरबीआयने ही धक्कादायक माहिती दिली आहे.

या आकडेवारीमुळे देशात ऑनलाईन फसवणूक करणाऱ्या लोकांना रोखणं सरकारला दिवसेंदिवस कठीण होत असल्याचे स्पष्ट होत आहे. ‘दैनिक जागरण’ या हिंदी वृत्तपत्राने याबाबतची माहिती मागवली होती. वित्त मंत्रालयाने त्यांना याबाबत माहिती दिली आहे.

रिझर्व्ह बँकेने दिलेल्या माहितीनुसार,  गेल्या तीन वर्षात 87 हजार 956 लोकांनी ऑनलाईन फसवणूक झाल्याची तक्रार पोलीस ठाण्यात दाखल केली आहे. तर 88 हजार 467 लोकांनी फसवणूक झाल्यानंतर त्यांनी केवळ संबंधित बँकेला याबाबत तक्रार केली. मात्र त्यानंतर यापुढे कोणत्याही प्रकारची चौकशी केलेली नाही.

तर 206-17 या वर्षात देशभरात 4 हजार 559 लोक ऑनलाईन फसवणुकीचे शिकार झालेत. यातील 3 हजार 187 लोकांनी पोलिसात तक्रार दाखल केली आहे. धक्कादायक बाब म्हणजे 2017-18 या वर्षात ऑनलाईन फसवणुकीच्या आकडेवारीत तब्बल 15 टक्क्यांनी वाढ झाली आहे. 2017-18 वर्षात 72 हजार 205 लोकांची ऑनलाईन फसवणूक झाली आहे. त्यातील केवळ 37 हजार 414 लोकांनी पोलिसात तक्रार दाखल केली. तर इतर 34 हजार 791 लोकांनी या प्रकरणी बँकेला सूचना दिल्या आहेत.

दरम्यान आरबीआयने ऑनलाईन फसवणुकीच्या प्रकरणांची दोन विभागात विभागणी केली आहे. एका विभागात 1 लाखापेक्षा अधिक आणि दुसऱ्या विभागात 1 लाखाहून कमी पैशांची फसवणुकीचा समावेश आहे. यानुसार ही आकडेवारी जाहीर केली आहे.

देशात सध्या टेक्नॉलॉजीचा वाढत्या वापरामुळे कोणत्याही व्यक्ती घरबसल्या पैसे पाठवणे सहज शक्य झाले आहे. BHIM, UPI, गूगल पे, NEFT/RTGS, Paytm यासारख्या विविध डिजीटल वॉलेटचा वापर पैसे ट्रान्सफर करण्यासाठी अनेकजण करतात. मात्र यामुळे अनेकांची फसवणूक होत असल्याची प्रकरण वारंवार समोर येतात. त्यातच आरबीआयने दिलेली आकडेवारी ही धक्कादायक स्वरुपाची आहे. या आकडेवारीतून सरकारला ऑनलाईनच्या माध्यमातून होणारी फसवणुकीची प्रकरण रोखणे आव्हान बनल्याचे समोर येत आहे.

Follow Us
ठाणे कोपरी पोलीस ठाण्यात सिद्धू अभंगे यांना महिलांकडून मारहाण; नेमकं..
ठाणे कोपरी पोलीस ठाण्यात सिद्धू अभंगे यांना महिलांकडून मारहाण; नेमकं कारण काय?
दुष्काळातून तालुका वगळला, आता लोक... कार्यकर्त्याचा थेट भाजप खासदार...
दुष्काळातून तालुका वगळला, आता लोक... कार्यकर्त्याचा थेट भाजप खासदाराला फोन; नेत्याच्या उत्तराने सगळेच अवाक्
धर्मेंद्र प्रधान यांच्यानंतर ज्ञानेश कुमारांची विकेट पडणार? महिला...
धर्मेंद्र प्रधान यांच्यानंतर ज्ञानेश कुमारांची विकेट पडणार? महिला नेत्याच्या विधानाने खळबळ!
केंद्र सरकार 2000 वरील यूपीआय व्यवहारांवर शुल्क आकारणार
केंद्र सरकार 2000 वरील यूपीआय व्यवहारांवर शुल्क आकारणार. सर्वोच्च न्यायालयाने मागवले प्रतिज्ञापत्र
35 वर्षांच्या पाणी संघर्षानंतर तुळशी गावकऱ्यांनी घेतला टोकाचा निर्णय
Solapur : शेती उद्ध्वस्त, तरुण बेरोजगार अन्...; 30-35 वर्षांच्या पाणी संघर्षानंतर तुळशी गावकऱ्यांनी घेतला टोकाचा निर्णय...
यायचे असेल तर आमच्यात या, विलिनीकरणावर शरद पवारांचं मोठं विधान
Sharad Pawar : यायचे असेल तर आमच्यात या, विलिनीकरणावर शरद पवारांचं मोठं विधान, नेमकं काय म्हणाले?
मॅनहोलमध्ये काम करताना कामगाराचा मृत्यू
मॅनहोलमध्ये काम करताना कामगाराचा मृत्यू, मृतदेह स्वीकारण्यास कुटुंबीयांचा नकार
रकुल प्रीत , वासू भगनानी आयकर विभागाच्या रडारवर; अनेक ठिकाणी धाड
Video : रकुल प्रीत , वासू भगनानी आयकर विभागाच्या रडारवर; अनेक ठिकाणी धाड, सिनेमांच्याआड पैशांची लपवालपवी?
Video : पाणी प्रश्न ऐरणीवर, जिल्हाधिकारी कार्यालयावर विराट मोर्चा
Video : पाणी प्रश्न ऐरणीवर, जिल्हाधिकारी कार्यालयावर विराट मोर्चा
निवडणूक आयोगाने पक्षचिन्ह दिलं नाही तरी... विलिनीकरणाच्या विषयावर...
निवडणूक आयोगाने पक्षचिन्ह दिलं नाही तरी... विलिनीकरणाच्या विषयावर शरद पवारांचं मोठं विधान