वेल्डर, कटर, सीएनसी ऑपरेटर्स मिळेनात, उद्योगांना कुशल कर्मचाऱ्यांची वाणवा

परराज्यातील 50 टक्केच मजूर कामावर परतल्यामुळे उद्योगांवर ताण पडत असल्याचे दिसत आहे. नागपुरातील हिंगणा औद्योगिक वसाहतीमध्येही तशीच काहीशी परिस्थिती आहे.

वेल्डर, कटर, सीएनसी ऑपरेटर्स मिळेनात, उद्योगांना कुशल कर्मचाऱ्यांची वाणवा
Follow us
| Updated on: Oct 23, 2020 | 7:35 PM

नागपूर : राज्यातील उद्योगांना लॉकडाऊनमुळे मोठा फटका बसला. अनलॉकनंतर आता ते रुळावर येत आहेत. बाजारात उत्पादनाची मागणी वाढली आहे. पण परराज्यातील 50 टक्केच मजूर कामावर परतल्यामुळे उद्योगांवर ताण पडत असल्याचे दिसत आहे. नागपुरातील हिंगणा औद्योगिक वसाहतीमध्येही तशीच काहीशी परिस्थिती आहे. (only 50 percent workers returning to work labor Demand increased Nagpur)

“कोरोनाच्या संकटात लॉकडाऊनमुळे उद्योगांना मोठा फटका बसला. अनलॉकनंतर नागपूर जिल्ह्यातील उद्योग रुळावर यायला लागले आहेत. मागील काही दिवसांपासून बाजारात मागणी वाढली आहे. त्यामुळे उत्पादनातही वाढ करावी लागते आहे. पण कामगार कमी पडत आहेत.” असं हिंगणा एमआयडीसी उद्योजक संघटनेचे अध्यक्ष चंद्रशेखर शेगावकर यांनी सांगितलं.

उत्तर प्रदेश-बिहारचे 50 टक्के मजूर कामावर न परतल्यानं फटका

उत्तर प्रदेश, बिहार सारख्या राज्यातून महाराष्ट्रात येणाऱ्या मजुरांची संख्या बरीच आहे. पण कोरोना महामारी आणि लॉकडाऊनमुळे त्यांना आपापल्या राज्यात जावं लागलं. आता राज्यात निर्बंध शिथील झाले आहेत. उद्योगधंदे बऱ्यापैकी सुरु झाले आहेत. पण परराज्यातले मजूर वापस महाराष्ट्रात आलेले नाहीत. लॉकडाऊनच्या काळात उत्तर प्रदेश-बिहारमध्ये परत गेलेल्यांपैकी 50 टक्केच मजूर कामावर परत आले आहेत. त्यामुळे कामगारांची कमतरता भासत असल्याचं चंद्रशेखर शेगावकर यांनी सांगितलं. आम्ही रोज 10 ते 12 जणांच्या मुलाखती घेतो; पण त्यापैकी फार तर एक किंवा दोन जण नोकरीवर येतात असं ते म्हणाले. वेल्डर, कटर, सीएनसी ऑपरेटर असे कुशल कामगार कमी पडत असून उद्योगांना तारेवरची कसरत करावी लागत असल्याचंही त्यांनी सांगितलं.

दरम्यान, कोरोना काळात नागपुरातील काही सहकारी संस्थानी स्थानिकांचे रोजगार जपले. सुरुवातीच्या काळात त्यांना थोड्या अडचणी आल्या. “कोरोना महामारीच्या काळात आम्ही संस्थेतील कर्मचाऱ्यांना मदत केली. आम्हाला कुठल्याही कर्मचाऱ्याला काढण्याची गरज पडली नाही. आम्ही कुणाचाही पगार कमी केला नाही,” असं धरमपेठ महिला सहकारी संस्थेच्या अध्यक्ष निलीमा बावणे म्हणाल्या. एकंदरी लॉकडाऊनमध्ये कामगार आपापल्या गावी गेल्याने उद्योगांना आता कामगारांची कमतरता भासत आहे. कामगार नसल्याने उत्पादन क्षमतेवर परिणाम झालाआहे.

संबंधित बातम्या : Anil Parab | एसटी कामगारांचे पगार लवकरच होणार : अनिल परब

केंद्राचे काळे कायदे शेतकरी-कामगारांना वेठबिगार बनवून उद्ध्वस्त करणारे : बाळासाहेब थोरात

ऑनलाईन बांधकाम कामगार नोंदणी बंद करा; कामगार संघटनांची कोर्टात याचिका

(only 50 percent workers returning to work labor Demand increased Nagpur)

Non Stop LIVE Update
बीडमध्ये जातीचं कार्ड कोण खेळतंय? कुणबीपत्रावरून धनंजय मुंडेंचं विधान
बीडमध्ये जातीचं कार्ड कोण खेळतंय? कुणबीपत्रावरून धनंजय मुंडेंचं विधान.
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.