AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

फुले उधळून डिस्चार्ज दिलेल्या महिलेचा रिपोर्ट काही तासात पॉझिटिव्ह, कळंब रुग्णालयाचा कारभार

फुले उधळून डिस्चार्ज दिलेल्या कोरोनाबाधित महिलेचा रिपोर्ट अवघ्या काही तासांत पॉझिटिव्ह आल्याची घटना उस्मानाबादमध्ये घडली आहे. (Osmanabad discharged woman report corona positive)

फुले उधळून डिस्चार्ज दिलेल्या महिलेचा रिपोर्ट काही तासात पॉझिटिव्ह, कळंब रुग्णालयाचा कारभार
| Updated on: May 23, 2020 | 2:51 PM
Share

उस्मानाबाद : उस्मानाबाद जिल्ह्यातील कळंब रुग्णालय प्रशासनाला अति आत्मविश्वास काहीसा अंगलट आला आहे. फुले उधळून डिस्चार्ज दिलेल्या कोरोनाबाधित महिलेचा रिपोर्ट अवघ्या काही तासांत पॉझिटिव्ह आला. (Osmanabad discharged woman report corona positive) संबंधित रुग्णालयात तीन चाचण्या केल्या जातात. दोन चाचण्या निगेटिव्ह आल्याने तिसरीही निगेटिव्ह येईल या आत्मविश्वासाने रुग्णालय प्रशासनाने संबंधित महिलेला डिस्चार्ज दिला. तिसरा अहवाल संध्याकाळी येणार होता, मात्र त्यापूर्वीच दुपारी या महिलेला डिस्चार्ज देण्यात आला. पण संध्याकाळी या महिलेचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने तिला पुन्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं.

मागील अकरा दिवसांपूर्वी कळंब तालुक्यातील तीन जणांना कोरोनाची लागण झाली होती. त्यात पाथर्डी येथील मुंबई वरुन परतलेल्या पती-पत्नीचा समावेश होता. त्यांच्यावर कळंब येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरु होते.

गुरुवारी चाचणीसाठी यांचा स्वॅब घेण्यात आला होता. याचे अहवाल येणे बाकी असतानाच त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. डिस्चार्ज मिळाल्यानंतर अवघ्या काही तासांत त्यातील महिलेच्या कोरोना चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने गोंधळ उडाला. (Osmanabad discharged woman report corona positive)

दरम्यान उस्मानाबाद जिल्ह्याचा कोरोनाचा आकडा 26 झाला आहे. त्यापैकी 5 रुग्ण बरे झाले असून 21 जणांवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. जिल्ह्यातील कोरोना रुग्ण सापडलेले 11 भाग कंटेनमेंट झोन जाहीर करण्यात आले असून तो भाग सील केला आहे.

उस्मानाबाद जिल्ह्यातील वाशी तालुक्यातील 2 आणि परंडा येथील 1 रुग्णाचे अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. वाशी येथील पिंपळगाव येथे 6 वर्षीय मुलीला कोरोनाची बाधा झाली होती. त्या मुलीची आई आणि इतर एकाचा कोरोना अहवाल हा पॉझिटिव्ह आला असून यामुळे उस्मानाबाद जिल्ह्याचा कोरोनाचा आकडा 26 झाला आहे. त्यापैकी 5 रुग्ण बरे झाले असून 21 जणांवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. आई,मुलगी आणि इतर एक हे सर्व तिघे जण मुंबई येथून आल्याचे समोर आले असून, त्यांच्या संपर्कातील लोकांना वैद्यकीय निगराणीखाली ठेवण्यात येत आहे. पिंपळगावात प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविणे सुरु केले आहे.

उस्मानाबाद कोरोना अपडेट

  • उस्मानाबाद एकूण रुग्ण 26
  • बरे झालेले रुग्ण 5
  • उपचार घेत असलेले रुग्ण 21
  • मृत्यू रुग्ण – ०

उस्मानाबादेत काय घडतंय?

1) उस्मानाबाद जिल्ह्यात गेल्या २४ तासात कोरोनाचे ३ रुग्ण सापडले

2) मुंबई येथून आलेल्या ३ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आल्याने बाहेरून आलेल्या नागरिकांपासून धोका निर्माण झाला आहे

३) उस्मानाबाद जिल्ह्यातील सर्व दुकाने सकाळी ९ ते सायंकाळी ५ या वेळेत सुरु करण्याचे जिलाधिकाऱ्यांचे आदेश

४ ) कळंब रुग्णालयातून डिस्चार्ज दिलेल्या महिलेचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्याने खळबळ उडाली असून अहवाल येण्यापूर्वीच कोरोनामुक्त जाहीर करून डिस्चार्ज

५ ) उस्मानाबाद , कळंब , तुळजापूर व उमरगा नगर पालिका क्षेत्रातील ५ भाग कंटेनमेंट जाहीर करून त्या भागातील सर्व दुकाने बंद

६ ) उस्मानाबाद जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील दारू विक्रीची दुकाने सुरु करण्यात आली आहेत.

७) उस्मानाबाद जिल्ह्यात आजवर कोरोनाचे २६ रुग्ण सापडले त्यापैकी २१ जणांवर उपचार सुरू ५ रुग्ण बरे

८) उस्मानाबाद जिल्ह्यातील सर्व न्हावी दुकाने , कटिंग दुकाने सकाळी ९ ते ५ या वेळेत सुरु

९) कोरोना जनजागृतीसाठी उस्मानाबाद पोलीस दलाच्या वतीने ऑनलाईन प्रश्नावली

१०) उस्मानाबाद जिल्ह्यात प्रतिबंधित क्षेत्र वगळून काही भागात भूम परंडा उमरगा आगारातून जिल्हा अंतर्गत बससेवा सुरु

Osmanabad discharged woman report corona positive

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.