भारतात येण्यापूर्वी अभिनंदन यांची बळजबरी मुलाखत, छेडछाड केलेला व्हिडीओ शेअर

वाघा बॉर्डर/नवी दिल्ली : पाकिस्तानच्या F16 या विमानाचा पाठलाग करुन त्याला जमिनीवर पाडणारा भारताचा ढाण्या वाघ, वायूदलाचा विंग कमांडर अभिनंदन वर्धमान अखेर पाकिस्तानच्या तावडीतून सुटून, मायदेशी परतला. वाघा बॉर्डरवर  अभिनंदन वर्धमान या विजयीवीराचं जल्लोषी स्वागत करण्यात आलं. ढोल-ताशे, हार तुऱ्यांसह भारतीय नागरिकांनी विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांचं स्वागत केलं. पाकिस्तानी रेंजर्सने विंग कमांडर अभिनंदन यांची […]

भारतात येण्यापूर्वी अभिनंदन यांची बळजबरी मुलाखत, छेडछाड केलेला व्हिडीओ शेअर
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 4:22 PM

वाघा बॉर्डर/नवी दिल्ली : पाकिस्तानच्या F16 या विमानाचा पाठलाग करुन त्याला जमिनीवर पाडणारा भारताचा ढाण्या वाघ, वायूदलाचा विंग कमांडर अभिनंदन वर्धमान अखेर पाकिस्तानच्या तावडीतून सुटून, मायदेशी परतला. वाघा बॉर्डरवर  अभिनंदन वर्धमान या विजयीवीराचं जल्लोषी स्वागत करण्यात आलं. ढोल-ताशे, हार तुऱ्यांसह भारतीय नागरिकांनी विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांचं स्वागत केलं. पाकिस्तानी रेंजर्सने विंग कमांडर अभिनंदन यांची पिस्तुल परत करत, मानाने त्यांना पाठवलं. सीमेवर जवळपास 8 तासांची औपचारिकता पूर्ण करुन अभिनंदन भारतात परतले.

अभिनंदन यांचं स्वागत करण्यासाठी उत्सुक असलेल्या भारतीयांना पाकिस्तानने जाणीवपूर्वक वाट पाहायला लावली. भारतीय वायूसेने आणि बीएसएफचे अधिकारी वाघा बॉर्डरवर अभिनंदन यांच्या स्वागतासाठी तीन वाजल्यापासून वाट पाहत होतो. पण दोन वेळा वेळ वाढवून घेत पाकिस्तानने सव्वा नऊ वाजता अभिनंदन यांना भारताच्या ताब्यात दिलं.

लाहोरमध्ये औपचारिकता पूर्ण करण्यात आली आणि तिथून पुढे अभिनंदन यांना बॉर्डरवर आणण्यात आलं. यापूर्वी पाकिस्तानने अभिनंदन यांची बळजबरी मुलाखत घेतली. पण नेहमीप्रमाणे पाकिस्तानने नापाकपणा करत छेडछाड केलेला व्हिडीओ जारी केलाय. ज्यात अभिनंदन पाकिस्तानी लष्कारचं कौतुक करत आहेत आणि भारतीय मीडियाविषयी अपशब्द वापरत आहेत.

पाकिस्तानमधील अनेक चॅनल्सकडून हा व्हिडीओ जारी करण्यात आलाय. पण हा व्हिडीओ पाहताना दिसून येतं की अनेक ठिकाणी कट मारण्यात आले आहेत. त्यामुळे पाकिस्तानने अभिनंदन यांचा चेहरा वापरुन स्वतःची गरळ ओकल्याचं स्पष्ट होतंय. यामध्ये पाकने स्वतःच्या आर्मीचं कौतुक केलंय, तर भारतीय मीडियावर निशाणा साधलाय.

व्हिडीओ पाहा

Non Stop LIVE Update
मोठी कारवाई, नाकाबंदीत ATM कॅश व्हॅनमधील 4 कोटींची रोकड कुठं जप्त?
मोठी कारवाई, नाकाबंदीत ATM कॅश व्हॅनमधील 4 कोटींची रोकड कुठं जप्त?.
चंद्रकांत पाटलांच्या त्या वक्तव्याने अजितदादा नाराज, बोलून दाखवली खंत
चंद्रकांत पाटलांच्या त्या वक्तव्याने अजितदादा नाराज, बोलून दाखवली खंत.
आता ठाकरेंसमोर एवढाचं प्रश्न.. पवारांच्या मुलाखतीवर शिरसाटांचं वक्तव्य
आता ठाकरेंसमोर एवढाचं प्रश्न.. पवारांच्या मुलाखतीवर शिरसाटांचं वक्तव्य.
लोकसभेच्या निवडणुकीदरम्यान महाराष्ट्रात आणखी एका निवडणुकीचं वाजल बिगूल
लोकसभेच्या निवडणुकीदरम्यान महाराष्ट्रात आणखी एका निवडणुकीचं वाजल बिगूल.
पवारांचा पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होणार? फडणवीसांनी थेट तारीख सांगितली
पवारांचा पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होणार? फडणवीसांनी थेट तारीख सांगितली.
लोक कडाक्याच्या उन्हान हैराण अन भर उन्हाळ्यात पाण्यात बुडाल्या गाड्या?
लोक कडाक्याच्या उन्हान हैराण अन भर उन्हाळ्यात पाण्यात बुडाल्या गाड्या?.
अयोध्येत राऊत म्हणाले, आपण बंड करू; शिवसेना नेत्याच्या दाव्यानं खळबळ
अयोध्येत राऊत म्हणाले, आपण बंड करू; शिवसेना नेत्याच्या दाव्यानं खळबळ.
शिंदेंना शिवसेना संपवायची होती, 2013 मध्ये.. विचारेंचा मोठा गौप्यस्फोट
शिंदेंना शिवसेना संपवायची होती, 2013 मध्ये.. विचारेंचा मोठा गौप्यस्फोट.
शरद पवार गट काँग्रेसमध्ये विलीन होणार? एका मुलाखतीतून मोठा गौप्यस्फोट
शरद पवार गट काँग्रेसमध्ये विलीन होणार? एका मुलाखतीतून मोठा गौप्यस्फोट.
नॉट रिचेबल असणाऱ्या किरण सामंत यांच्याबद्दल नारायण राणे म्हणाले...
नॉट रिचेबल असणाऱ्या किरण सामंत यांच्याबद्दल नारायण राणे म्हणाले....