ठाकरेंच्या टीकेला शिंदेंचं उत्तर; म्हणाले, राणेंची अटक अन् पालघर साधू हत्याकांड, विसरलात काय?

CM Eknath Shinde on Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंच्या टीकेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं उत्तर; म्हणाले, नारायण राणेंची अटक अन् पालघर साधू हत्याकांड. तुम्ही 'त्या' घटना जरा आठवा... ठाकरेंच्या टीकेला शिंदेंनी काय उत्तर दिलं? पालघरमध्ये बोलताना शिंदे नेमकं काय म्हणाले? वाचा सविस्तर...

ठाकरेंच्या टीकेला शिंदेंचं उत्तर; म्हणाले, राणेंची अटक अन् पालघर साधू हत्याकांड, विसरलात काय?
CM Eknath Shinde
Follow us
| Updated on: Feb 11, 2024 | 10:20 AM

पालघर | 11 फेब्रुवारी 2024 : राज्यात सुरु असलेल्या गोळीबाराच्या घटनांवरून शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सरकारवर टीका केली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर उद्धव ठाकरेंनी टीका केली. ठाकरेंच्या या टीकेला एकनाथ शिंदे यांनी उत्तर दिलं आहे. महाविकास आघाडी सरकारच्या काळात झालेल्या घटनांवर शिंदेंनी बोट ठेवलं. महाविकास आघाडी सरकारच्या काळामध्ये पालघरमध्ये झालेले साधू हत्याकांड झालं. हनुमान चालीसा पठण करणाऱ्या राणादांपत्यावर जेलमध्ये टाकून त्यांच्यावर देशद्रोहाचा खटला चालवला. ते तुम्ही विसरलात का?, असा सवाल एकनाथ शिंदे यांनी केला आहे.

शिंदेंचा ठाकरेंना सवाल

तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नारायण राणेंनी केलेल्या भाषणाविरोधात एका केंद्रीय मंत्राला जेवणावरून उठवून जेलमध्ये टाकण्याचं काम केलं. अभिनेत्री कंगना राणावतचं घर तोडायला एक कोटी रुपये महापालिकेच्या खर्च केले. त्यांच्याविरुद्ध बोलणाऱ्यांना जेलमध्ये टाकले सुशांत सिंग राजपूत दिशा सालियान यांची देखील पुरावे मिटवण्याचं काम त्या सरकारने केल्याची चर्चा आहे. हे तुम्ही विसरलात का?, असंही शिंदे म्हणालेत.

शिंदेंचं ठाकरेंना उत्तर

अर्णव गोस्वामी यांना ही जेलमध्ये टाकलं तेव्हा गोंधळ चालू होता. त्यावेळेस गृहमंत्री जेलमध्ये गेले होते. महाराष्ट्राला बिहार म्हणणाऱ्यांना चंबल ही कमी पडेल? अशी त्यावेळेची गुंडाराज सुरू होते. दरोडेखोरी सुरू होती त्यांना विहार म्हणण्याचा अधिकार नाही, असं उत्तर उद्धव ठाकरे यांच्या आरोपानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलं आहे.

यांची भूमिका दुटप्पी

महाविकास आघाडी सरकारच्या काळामध्ये अंबानीच्या घराखाली बॉम्ब लावण्याचे काम त्यांच्या सरकारमधील एका पोलीस अधिकाऱ्याने लावलं आपलं ठेवायचं झाकून आणि दुसऱ्याचं बघायचं वाकून अशा परिस्थितीमध्ये आरोप करणं सोपं आहे. ही त्यांची दुटप्पी भूमिका आहे. अडीच वर्षाच्या काळात जी दरोडेखोरी व गुंडागिरी सुरू होती ती शोभणारी नव्हती. त्याचा त्यांनी हिशोब दिला पाहिजे, असं शिंदे म्हणाले.

त्या दरोडेखरांनी मुंबई महापालिका लुटली खिचडी घोटाळा,कोविड बॉडी बॅग घोटाळा,कोविड सेंटर घोटाळा ऑक्सिजन प्लांट त्यावेळी एकीकडे लोक मरत होते. दुसरीकडे पैसे मिळवणारी टोळी सक्रिय होते. आता ते जेलमध्ये जात आहेत. हे अर्बन थीफ असून ते परवडणारे नाही त्यामुळे त्यांनी बिनबुडाचे आरोप करू नये, असा घणाघात शिंदेंनी केला आहे.

Non Stop LIVE Update
बारामतीत मतदानाच्या आदल्या रात्री..अमोल कोल्हेंचं निवडणूक आयोगाला पत्र
बारामतीत मतदानाच्या आदल्या रात्री..अमोल कोल्हेंचं निवडणूक आयोगाला पत्र.
तर धनुष्यबाणावर विरोधात निवडणूक लढवणार, किरण सामंत यांचा इशारा कुणाला?
तर धनुष्यबाणावर विरोधात निवडणूक लढवणार, किरण सामंत यांचा इशारा कुणाला?.
ठाकरेंवर मानसिक परिणाम, त्यांना.., भाजपच्या बड्या नेत्याचा हल्लाबोल
ठाकरेंवर मानसिक परिणाम, त्यांना.., भाजपच्या बड्या नेत्याचा हल्लाबोल.
लोकसभा निवडणुकीत केजरीवालांना दिलासा, तिहार तुरुंगातून येणार बाहेर
लोकसभा निवडणुकीत केजरीवालांना दिलासा, तिहार तुरुंगातून येणार बाहेर.
मोदींच्या ऑफरवर शरद पवारांचं उत्तर, म्हणाले, ... हे माझं स्पष्ट मत
मोदींच्या ऑफरवर शरद पवारांचं उत्तर, म्हणाले, ... हे माझं स्पष्ट मत.
सगळी स्वप्न पूर्ण होतील, फक्त... मोदींची ठाकरे-पवारांना भर सभेतून ऑफर
सगळी स्वप्न पूर्ण होतील, फक्त... मोदींची ठाकरे-पवारांना भर सभेतून ऑफर.
... तर तुम्हीच औरंगजेबाचे वंशज, संजय राऊतांची मोदींवर घणाघाती टीका
... तर तुम्हीच औरंगजेबाचे वंशज, संजय राऊतांची मोदींवर घणाघाती टीका.
प्रियंका चतुर्वेदींनी केलेल्या 'त्या' टीकेवर मुख्यमंत्री म्हणाले.....
प्रियंका चतुर्वेदींनी केलेल्या 'त्या' टीकेवर मुख्यमंत्री म्हणाले......
नकली संतान... मोदींच्या टीकेवर ठाकरे म्हणाले, बेअकली माणसा तेव्हा लाज
नकली संतान... मोदींच्या टीकेवर ठाकरे म्हणाले, बेअकली माणसा तेव्हा लाज.
ब्रेक घेतोय... कोल्हेंचा 5 वर्ष अभिनयातून संन्यास, का घेतला निर्णय?
ब्रेक घेतोय... कोल्हेंचा 5 वर्ष अभिनयातून संन्यास, का घेतला निर्णय?.