Palghar mob lynching | गडचिंचले झुंडबळी पीडितांची बाजू मांडणाऱ्या वकिलाचा कोर्टात जाताना अपघाती मृत्यू

पालघरमधील गडचिंचले झुंडबळीत मृत्यू झालेल्या पीडितांची बाजू मांडणाऱ्या मुख्य वकिलाच्या सहयोगी वकिलाचा अपघाती मृत्यू झाला आहे.

Palghar mob lynching | गडचिंचले झुंडबळी पीडितांची बाजू मांडणाऱ्या वकिलाचा कोर्टात जाताना अपघाती मृत्यू
Follow us
| Updated on: May 15, 2020 | 12:19 PM

Palghar mob lynching पालघर : गडचिंचले झुंडबळीत मृत्यू झालेल्या पीडितांची बाजू मांडणाऱ्या मुख्य वकिलाच्या सहयोगी वकिलाचा अपघाती मृत्यू झाला आहे. दिग्विजय त्रिवेदी (Palghar lynching case Lawyer Digvijay Trivedi accident ) असं या वकिलाचं नाव आहे. दिग्विजय त्रिवेदी हे बुधवारी सकाळी भाईंदरवरुन स्वत:च्या कारने डहाणू न्यायालयात जात होते. त्यावेळी मुंबई-अहमदाबाद महामार्गावर मेंढवणच्या खिंडीत त्यांचा अपघाती मृत्यू झाला. यावेळी त्यांच्यासोबत असलेली महिला सहकारी गंभीर जखमी झाली आहे. (Palghar lynching case Lawyer Digvijay Trivedi accident )

गेल्या महिन्यात पालघरमधील गडचिंचले या गावात मोठ्या समुहाने संशयावरुन तिघांना बेदम मारहाण करुन त्यांची हत्या केली होती. यामध्ये दोन साधू आणि त्यांच्या चालकाचा मृत्यू झाला. याप्रकरणी गावातील शेकडो नागरिकांना अटक करण्यात आली आहे. स्वत: गृहमंत्री अनिल देशमुख यांनी काही दिवसापूर्वी या भागात जाऊन माहिती घेतली होती. देशभर हे प्रकरण गाजलं होतं.

याप्रकरणी मृत्यू झालेल्या पीडितांची बाजू दिग्जिवज त्रिवेदी मांडत होते. विश्व हिंदू परिषदेने पालघरमधील सामूहिक हत्याकांड प्रकरणाचं वकीलपत्र त्रिवेदी यांना दिलं होतं. बुधवारी सकाळी दहाच्या सुमारास ते कोर्टाकडे जात होते. त्यावेळी कारवरील ताबा सुटल्याने कार रस्त्याच्या कडेला उलटली. या जबर अपघातात त्यांचा मृत्यू झाला तर सोबतची सहकारी जखमी झाली. त्यांच्यावर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

काय आहे पालघर झुंडबळी प्रकरण? (What is Palghar mob lynching case)

गडचिंचले गावात चोर-दरोडेखोर शिरल्याची अफवा पसरल्यानंतर गावकऱ्यांनी एकत्रितपणे पहारा देण्याचा निर्णय घेतला होता. गुरुवारी 16 एप्रिलच्या रात्री उशिरा एक इको गाडी दाभाडी-खानवेल मार्गावरुन जात होती. या गाडीत वाहनचालकासह तिघे जण होते.

दाभाडी-खानवेल मार्गावर मोठ्या जमावाने त्यांची गाडी अडवली. त्यांची पूर्णपणे विचारपूस न करताच चोर समजून त्यांच्यावर दगडफेक आणि लाठ्यांनी हल्ला केला. या हल्ल्यात तिघांचा मृत्यू झाला. पालघरच्या डहाणू तालुक्यातील गडचिंचले गावात ही घटना घडली

वाचा :  पालघरमध्ये चोर-दरोडेखोर असल्याच्या अफवेतून तिघांची हत्या, 101 आरोपींना पोलीस कोठडी

पालघरच्या कासा पोलिसांना या घटनेची माहिती मिळाली. त्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत जमावाला शांत करण्याचा प्रयत्न केला. मात्र, जमावाने पोलिसांवरही हल्ला केला. पोलिसांच्या गाडीवर दगडफेक केली. अखेर पोलिसांनी मोठा फौजफाटा तैनात करत सर्वांना ताब्यात घेतलं. डहाणू न्यायालयाने 101 आरोपींना 30 एप्रिलपर्यंत पोलिस कोठडी सुनावली. यातील 9 आरोपी 18 वर्षाखालील असल्याने त्यांना भिवंडीच्या बालसुधारगृहात पाठवण्यात आले. पोलीस इतर फरार आरोपींचा शोध घेत आहेत.

(Palghar lynching case Lawyer Digvijay Trivedi accident )

संबंधित बातम्या 

Palghar Mob Lynching | नेमकं त्या दिवशी काय घडलं? गृहमंत्री थेट गडचिंचलेत, घटनास्थळी जाऊन आढावा 

गडचिंचले भाजपचा गड, 10 वर्षांपासून त्यांचा सरपंच, अटकेतील बहुसंख्य भाजपचेच : काँग्रेस

Non Stop LIVE Update
मी निष्क्रिय खासदार मग मोदींची...ओमराजे यांचा पंतप्रधानांवर निशाणा काय
मी निष्क्रिय खासदार मग मोदींची...ओमराजे यांचा पंतप्रधानांवर निशाणा काय.
डोंबिवलीत उद्धव ठाकरे गटाला खिंडार, शहरप्रमुखच हाती घेणार धनुष्यबाण
डोंबिवलीत उद्धव ठाकरे गटाला खिंडार, शहरप्रमुखच हाती घेणार धनुष्यबाण.
राज्याचे महानालायक उद्धव ठाकरे, भाजपच्या बड्या नेत्यानं काढली लायकी
राज्याचे महानालायक उद्धव ठाकरे, भाजपच्या बड्या नेत्यानं काढली लायकी.
खैरेंच्या 'त्या' वक्तव्यावरून शिरसाटांचा निशाणा तर दानवेंचा पलटवार काय
खैरेंच्या 'त्या' वक्तव्यावरून शिरसाटांचा निशाणा तर दानवेंचा पलटवार काय.
लोकसभेचं तिकीट मिळताच रवींद्र वायकरांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
लोकसभेचं तिकीट मिळताच रवींद्र वायकरांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले....
सुप्रिया सुळेंचा 'हा' लकी नंबर, प्रत्येक भाषणातून होतोय वारंवार उल्लेख
सुप्रिया सुळेंचा 'हा' लकी नंबर, प्रत्येक भाषणातून होतोय वारंवार उल्लेख.
हे मटण खाणारे ब्राम्हण, देवेंद्र फडणवीसांवर कुणाचा निशाणा?
हे मटण खाणारे ब्राम्हण, देवेंद्र फडणवीसांवर कुणाचा निशाणा?.
भुताटकी, आत्मा, ढोंग आणि बरंच काही..., राऊतांचा मोदींवर हल्लाबोल काय?
भुताटकी, आत्मा, ढोंग आणि बरंच काही..., राऊतांचा मोदींवर हल्लाबोल काय?.
कॉलर उडवताना सकाळ की संध्याकाळ पहावं..., शरद पवारांचा उदयनराजेंना टोला
कॉलर उडवताना सकाळ की संध्याकाळ पहावं..., शरद पवारांचा उदयनराजेंना टोला.
ते टरबूज उन्हाळ्यात तरी कामी येतं, पण हे ..., ठाकरेंची फडणवीसांवर टीका
ते टरबूज उन्हाळ्यात तरी कामी येतं, पण हे ..., ठाकरेंची फडणवीसांवर टीका.