AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

तुम्ही खचू नका, तुमच्या जीवावर मी उभी आहे, पंकजा मुंडेंचं कार्यकर्त्यांना आवाहन

"ज्या ठिकाणी माझ्या चिन्हावर माझा व्यक्ती निवडून आला आहे, तिथली मी आमदार आहे", असं पंकजा मुंडे म्हणाल्या (Pankaja Munde appeal to party workers that Do not give up).

तुम्ही खचू नका, तुमच्या जीवावर मी उभी आहे, पंकजा मुंडेंचं कार्यकर्त्यांना आवाहन
| Updated on: Oct 25, 2020 | 3:22 PM
Share

बीड :भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे साहेब तुमच्या सगळ्यांच्यादृष्टीने मला आशीर्वाद देत आहेत. मी खचतच नाही. पण तुम्ही तरी खचून जाऊ नका. मुंडे साहेब गेले, मी तुमच्या जीवावर उभी राहिली. तुम्ही खचले तर माझ्याकडे कोण बघणार आहे? खचायचं नाही. तुमच्या जीवावर मी भक्कम उभी आहे, भक्कम उभी राहणार आहे. कोणालाही चिंता करायची गरज नाही”, असं भावनिक आवाहन भाजप नेत्या पंकज मुंडे यांनी भगवानगडावरुन कार्यकर्त्यांना केलं (Pankaja Munde appeal to party workers that Do not give up).

“पहिले मी वाट्टेल तेवढा निधी द्यायचे. निधीच्या रुपात पैशांचा पाऊस पाडला. आता रस्त्यावर उतरुन आम्ही सरकारला जाब विचारणार. या सरकारचं चांगल्या कामांचं कौतुक करण्याचं धारिष्ट्य गोपीनाथ मुंडेंच्या कन्येत आहे. त्याचप्रमाणे या सरकारला जाब विचारण्याचं धारिष्ट्यदेखील आहे. हे धारिष्ट्य तुम्हा सगळ्यांच्या बळावर आहे. माझं जीवनच तुम्हाला अर्पण आहे”, असं पंकजा मुंडे म्हणाल्या.

“मला कुणी म्हणतं ताई तुम्ही आमदार, खासदार नाहीत, तुम्ही कसं काम करतात? मी पाथर्डी, जिंतुरची आमदार आहे. ज्या ज्या ठिकाणी माझा आमदार आहे, ज्या ठिकाणी माझ्या चिन्हावर माझा व्यक्ती निवडून आला आहे, तिथली मी आमदार आहे”, असंदेखील मुंडे म्हणाल्या (Pankaja Munde appeal to party workers that Do not give up).

“माझ्या माणसांना संधी मिळते, तेव्हा मला खूप आनंद होतो. मी खोट्या विचारांची नाही. मला काहीच गरज नाही. त्यामुळे मला महाराष्ट्रात किमान 120 आमदार बनायचं आहे. हा पक्षाचा मेळावा नाही. पण धर्मकारण आणि राजकारण एकत्र केल्याचाशिवाय समाजाचा उद्धार होऊ शकत नाही. छत्रपती शिवाजी महाराजांनीदेखील आपल्यासमोर याबाबत एक पायंडा घालून दिला आहे. छत्रपती शिवरायांना स्मरुन समाजाच्या उद्धाराच्या या कामात स्वत: लागणाऱ्या पदांची पर्वा न करता जीवनाच्या शेवटच्या श्वासापर्यंत काम करणार. भगवान बाबा माझ्या पाठिशी आहेत”, असं पंकजा मुंडे यांनी सांगितलं.

“मुंडे साहेब जिल्हा परिषदेलाही उभे नव्हते. भाजपचं सरकार येईल, असं कधी स्वप्नातही वाटलं नव्हतं, तेव्हा मुंडे साहेबांनी राजकीय जीवनाला सुरुवात केली. तेव्हा मित्रांसोबत बसून मी शिवाजी पार्क भरुन सभा घेणार, असं बोलले होते. मुंडे साहेबांच्या संघर्ष यात्रेचा समारोप शिवतीर्थावर झाला. त्यामुळे शिवतीर्थावर एक दिवस मी सभा घेतल्याशिवाय राहणार नाही”, असा निश्चय पंकजा मुंडे यांनी केला.

संबंधित बातमी :

पंकजा मुंडे संपल्या असं वाटणाऱ्यांनी ही जनसंपत्ती पाहावी; पंकजा मुंडेंचा विरोधकांना टोला

महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.