पनवेलमध्ये खवल्या मांजरांची तस्करी, पाच जणांना अटक, वनविभागाची यशस्वी कारवाई

पनवेलमध्ये खवल्या मांजरांची तस्करी करणाऱ्या पाच जणांना वेगवेगळ्या ठिकाणाहून पनवेल वनविभागाच्या पथकाने पकडले आहे.

पनवेलमध्ये खवल्या मांजरांची तस्करी, पाच जणांना अटक, वनविभागाची यशस्वी कारवाई
Nupur Chilkulwar

|

Oct 14, 2020 | 6:07 PM

पनवेल : पनवेलमध्ये खवल्या मांजरांची तस्करी करणाऱ्या (Panvel Pangolin Smuggling) पाच जणांना वेगवेगळ्या ठिकाणाहून पनवेल वनविभागाच्या पथकाने पकडले आहे. त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणात खवले मांजरांची खवले हस्तगत केली आहेत (Panvel Pangolin Smuggling).

खवल्या मांजरांच्या खवल्यांची तस्करी होणार असल्याची माहिती पनवेल वनविभागाच्या अधिकारी यांना मिळताच अधिकाऱ्यांनी मुंबई-गोवा महामार्गावरील असलेल्या क्षणभर विश्रांती हॉटेलजवळ सापळा रचला. तिथे दोन मोटरसायकलवरुन आरोपी ज्ञानेश्वर मधुकर शिवकर आणि आरोपी प्रवीण बबन जाधव, प्रतिश सुभाष भोस्लेकर तिथे आले.

दरम्यान, हे आरोपी एकमेकांच्या पिशव्या आदलाबदल करत असताना वनविभागाच्या पथकाने त्यांना पकडण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी दोघेजण त्यांना सापडले, तर एक जण पळून जात असताना पाठलाग करुन त्याला पकडले. तेव्हा त्यांच्याकडे खवले मांजर (Pongolin) या वन्यप्राण्याचे खवले असल्याचे दिसून आले. वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी ते जप्त केले आहेत.

या आरोपींविरुध्द गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या आरोपींना न्यायालयात हजर केले असता न्यायायलाने त्यांना उद्यापर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

Panvel Pangolin Smuggling

संबंधित बातम्या :

सोनसाखळी चोरांचा सिनेस्टाईल पाठलाग, नाशकात सुट्टीवरील पोलिसाची पत्नीसह धडाकेबाज कामगिरी

कोल्हापुरात मोबाईलचं दुकान फोडलं, साडे 16 लाखांचा मुद्देमाल लंपास

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें