AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

राज्यात 10 लाखांपेक्षा जास्त रुग्ण कोरोनामुक्त, रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 76 टक्क्यांवर

राज्यात दहा लाखांपेक्षा जास्त रुग्ण कोरोनातून बरे झाले आहेत. रुग्ण बरे होण्याचं प्रमाणही 76 टक्क्यांवर पोहोचलं आहे. (patients recovery in Maharashtra crossed Ten lakh)

राज्यात 10 लाखांपेक्षा जास्त रुग्ण कोरोनामुक्त, रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 76 टक्क्यांवर
| Updated on: Sep 26, 2020 | 9:46 PM
Share

मुंबई : राज्यामध्ये कोरोनातून बरे झालेल्या रुग्णसंख्येने 10 लाखांचा टप्पा ओलांडला आहे. दिवसभरात 23 हजार 644 रुग्ण रुग्ण कोरोनामुक्त झाले असून त्यांनी डिस्चार्ज देण्यात आला. त्यामुळे राज्यभरात आतापर्यंत 10 लाख 16 हजार 450रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत, असे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले. (Corona patients recovery in Maharashtra crossed Ten lakh mark)

गेल्या काही दिवसांमध्ये राज्यात नविन निदान झालेल्या रुग्णांपेक्षा बरे झालेल्या रुग्णांची संख्या वाढली आहे. त्यामुळे राज्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाणही वाढलं आहे.

राज्यात पहिला रुग्ण 9 मार्चला आढळला. त्यानंतर 25 मार्चला पहिले दोन रुग्ण बरे झाले. त्यानंतरच्या सात महिन्यांमध्ये दररोज कोरोनामुक्त होणाऱ्या रुग्णांची संख्या वाढत गेली. जुलै महिन्यापासून बरे होणाऱ्या रुग्ण संख्येत वाढ होतानाच रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 50 टक्क्यांवर पोहोचले. जुलैच्या शेवटच्या आठवड्यातही कोरोनामुक्त रुग्णांची संख्या 2 लाखांवर पोहोचली.

राज्यात कोरोनामुक्त रुग्णांचे टप्पे ( लाखांत)

2 जुलै- 1 लाखाचा टप्पा (1 लाख 1 हजार 172 रुग्ण बरे) 25 जुलै- 2 लाखांचा टप्पा (2 लाख 7 हजार 194 रुग्ण बरे) 5 ऑगस्ट- 3 लाखांचा टप्पा (3 लाख 5 हजार 521 रुग्ण बरे) 14 ऑगस्ट- 4 लाखांचा टप्पा (4 लाख 1 हजार 442 रुग्ण बरे) 24 ऑगस्ट- 5 लाखांचा टप्पा (5 लाख 2 हजार 490 रुग्ण बरे) 3 सप्टेंबर- 6 लाखांचा टप्पा (6 लाख 12 हजार 484 रुग्ण बरे) 10 सप्टेंबर- 7 लाखांचा टप्पा (7 लाख 715 रुग्ण बरे झाले) 17 सप्टेंबर- 8 लाखांचा टप्पा (8 लाख 12 हजार 354 रुग्ण बरे) 21 सप्टेंबर- 9 लाखांचा टप्पा (9 लाख 16 हजार 648 रुग्ण बरे) 26 सप्टेंबर- 10 लाखांचा टप्पा (10 लाख 16 हजार 450 रुग्ण बरे)

हे ही वाचा : रुग्णांसाठी कमी दरात प्लाझ्मा उपलब्ध होणार, आरोग्यमंत्र्यांची घोषणा, प्रति बॅग किंमत

अशातच ‘माझे कुटुंब-माझी जबाबदारी’ या मोहिमेची अंमलबजावणी करण्याचे राज्य सरकारने ठरवले आहे. या मोहिमेंतर्गत गावपतळीवर आरोग्यसेवकांमार्फत नागरिकांची आरोग्यविषयक माहिती गोळा गेली जात आहे. या मोहिमेमुळे कोरोनाला थोपवता येऊ शकतं, असा दावा राज्य सरकारचा आहे.

दरम्यान,अनलॉक प्रक्रियेत दळणवळणाबरोबरच बाजापेठा सुरू करण्यात आल्या आहेत. उद्योगधंदेही सुरू झाल्याने मोठ्या प्रमाणीत गर्दी वाढल्याचे पाहायला मिळत आहे. रोजच्या कामामुळे नागरिकांना सोशल डिस्टन्सिंग पाळणेही अवघड झाले आहे. त्याचबरोबर प्रवासादरम्यान सोशल डिस्टन्सिंग पाळणे शक्य नाही. त्यामुळे जनजीवन पूर्वपदावर येत असले तरी यामुळे कोरोनाचा संसर्ग वाढताना दिसतोय. कोरोना रुग्णांमध्ये होत असलेल्या वाढीमुळे आरोग्य यंत्रणेवर ताण वाढल्याचा पाहायला मिळतोय.

संबंधित बातम्या :

रेमडेसीवीर संजीवनी नाही; त्याने रुग्णांचा जीव वाचेलच असं नाही: राजेश टोपे

‘वैद्यकीय ऑक्सिजनच्या किमतीचा प्रश्न सोडवा’, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची पंतप्रधान मोदींकडे मागण

राजेश टोपेंकडून रेमडेसिवीर इंजेक्शनच्या तुटवड्याची कबुली, शरद पवारांकडून तात्काळ व्यवस्था

(Corona patients recovery in Maharashtra crossed Ten lakh mark)

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.