नागपूरकरांवर आता ‘एनडीएस’ पथकाची नजर, बाजारपेठेत गर्दी केल्यास कारवाई

शहरात गर्दी टाळण्यासाठी उपद्रव शोध पथक म्हणजेच एनडीएस पथकाकडून शहरात गस्त घालण्यात येत आहे. दुकान, बाजारपेठेत नागरिकांनी गर्दी केल्याचे आढळल्यास या एनडीएस पथकाकडून कारवाई केली जाणार आहे.

नागपूरकरांवर आता 'एनडीएस' पथकाची नजर, बाजारपेठेत गर्दी केल्यास कारवाई

नागपूर : नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर संभाव्य गर्दी टाळण्यासाठी नागपूर महानगरपालिकेने मोठे पाऊल उचलले आहे. गर्दी टाळण्यासाठी उपद्रव शोध पथक म्हणजेच एनडीएस पथकाकडून शहरात गस्त घालण्यात येत आहे. दुकान, बाजारपेठेत नागरिकांनी गर्दी केल्याचे आढळल्यास या एनडीएस (NDS)  पथकाकडून कारवाई केली जाणार आहे. (patrolling by NDS in Nagpur to prevent crowdin markets)

नागपुरात कोरोना रुग्णांची संख्या कमी होत आहे. असे असले तरी, कोरोना संसर्गाची दुसरी लाट येण्याची भीती तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. त्यामुळेच संभाव्या धोका लक्षात घेता, नागपूर महानगरपालिकेने खबरदारी घेण्यास सुरुवात केली आहे. नवरात्रोत्सव तसेच आगामी सणांमुळे सार्वजनिक ठिकाणी तसेच शहराच्या बाजारपेठांत गर्दी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे मनपाने एनडीएस पथकाला गर्दीवर नजर ठेवण्यास सांगितले आहे. त्यामुळे उपद्रव शोध पथक म्हणजेच एनडीएस पथक शहरातील मोठ्या बाजारपेठांत जाऊन गर्दी न करण्याचं आवाहन करत आहे. तसेच कोरोना काळात योग्य खबरदारी घ्या, असेही या एनडीएस पथकाकडून सांगितले जात आहे.

गर्दी केल्यास एनडीएस पथक  कारवाई करणार

बाजारपेठा तसेच दुकानांच्या समोर गर्दी केल्यास एनडीएस पथकाकडून कारवाई केली जाणार आहे. तसे आदेश  नागपूर महानगरपालिका आयुक्तांनी दिले आहेत. त्यामुळे शहरातील प्रत्येक मोठ्या बाजारपेठेतील गर्दीवर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न एनडीएस पथकाकडून केला जातोय. नागपुरातील दहाही झोनमधील बाजारपेठांवर मनपाच्या एनडीएस टीमचा वॉच आहे.

संबंंधित बातम्या :

Special Report | नागपूरकरांनो, मास्क नीट घाला !

अंतिम वर्षातील परीक्षांना ग्रहण, नागपूर विद्यापीठात तांत्रिक गोंधळ, परीक्षा पुढे ढकलल्या

ATM फोडणाऱ्या टोळीकडे ट्रक सापडला, पोलीस हैराण, नागपूर पोलिसांची मोठी कारवाई

(patrolling by NDS in Nagpur to prevent crowdin markets)

Published On - 10:27 am, Sat, 17 October 20

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI