बसच्या मागे ओढत नेऊन जमावाकडून अभिनेत्रीशी गैरवर्तन, मदतीऐवजी लोक व्हिडीओ काढण्यात दंग

मध्य प्रदेशमध्ये एका 22 वर्षीय अभिनेत्रीसोबत शारिरीक लगट करण्याचा प्रयत्न झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे (Physical molestation of actress).

बसच्या मागे ओढत नेऊन जमावाकडून अभिनेत्रीशी गैरवर्तन, मदतीऐवजी लोक व्हिडीओ काढण्यात दंग
Follow us
| Updated on: Dec 19, 2019 | 10:33 PM

भोपाळ : मध्य प्रदेशमध्ये एका 22 वर्षीय अभिनेत्रीसोबत शारिरीक लगट करण्याचा प्रयत्न झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे (Physical molestation of actress). जवळपास 10 ते 12 जणांच्या टोळक्याने अभिनेत्रीची छेड काढली. विशेष म्हणजे त्यावेळी तेथे उपस्थित लोकांनी मदत करण्याऐवजी या घटनेचा व्हिडीओ काढण्याला प्राधान्य दिलं (Physical molestation of actress).

पीडित अभिनेत्री आपल्या मैत्रिणीसोबत वाढदिवसासाठी भोपाळला आली होती. त्यावेळी एका टोळक्याने दोघींनाही एका बसमागे ओढत नेत त्यांच्याशी गैरवर्तन केलं. यावेळी आजूबाजूला असलेले लोकही तमाशा पाहात उभे राहिले. अखेर कुणीतरी 100 नंबरवर कॉल केल्यावर अर्ध्या तासाने पोलीस घटनास्थळावर पोहचले. पोलिसांनी या प्रकाराची तक्रार दाखल करुन घेण्याऐवजी पीडित अभिनेत्री आणि तिच्या मैत्रिणीला तब्बल साडेचार तास पोलीस स्टेशनमध्येच बसवून ठेवलं. बऱ्याचवेळाने तक्रार दाखल करुन घेण्यासाठी दबाव वाढल्याने पीडितेची तक्रार नोंदवून घेण्यात आली. पीडित अभिनेत्री मूळची इंदौरची असून मुंबईमध्ये राहते.

छेडछाडीच्या आधी अश्लील कमेंट्सने सुरुवात

सोमवारी (16 डिसेंबर) रात्री 11 वाजता ही घटना घडली. पीडित अभिनेत्री तिची मैत्रिण आणि मैत्रिणीचा भाऊ यांच्यासोबत नडरा बस स्टेशनजवळील एका रेस्टॉरंटमध्ये जेवण करत होते. रेस्टॉरंटच्या बाहेर उभ्या असलेल्या काही लोकांनी अभिनेत्रीवर अश्लील कमेंट करण्यास सुरुवात केली. याकडे पीडितेने दुर्लक्ष केलं आणि हॉटेलमध्ये जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, काही लोक तेथे येऊनही शेरबाजी करु लागले. याला पीडित अभिनेत्रीने विरोध केला. तेवढ्यात पीडितेची मैत्रिण आणि तिचा भाऊ देखील बाहेर आले.

हा वाद वाढल्यानंतर आरोपींच्या टोळक्याने मैत्रिणीच्या भावाला मारहाण करत पीडित अभिनेत्रीसह तिच्या मैत्रिणीला बस मागे ओढत नेले. त्यावेळी आणखी काही लोक तेथे जमा झाले. या सर्वांनी अभिनेत्रीसह तिच्या मैत्रिणीशी शारिरीक लगट करण्याचा प्रयत्न केला. मैत्रिणीच्या भावाला मारहाण झाल्याने तो जखमी अवस्थेत पडला होता. विशेष म्हणजे छेडछाड सुरु असताना जमावातील लोक याचा व्हिडीओ देखील काढत होते.

पीडित अभिनेत्रीने सांगितलं, “तो अर्धा तासाचा काळ माझ्या आयुष्यातील सर्वात वाईट काळ होता. घटनास्थळावर काढण्यात आलेले सर्व व्हिडीओ पोलिसांकडे आहेत. तरिही पोलिसांनी साडेचार तास आम्हाला बसवून ठेवलं.” या प्रकरणाचा तपास करणारे पोलीस उपनिरिक्षक घुमेंद्र सिंह म्हणाले, “तक्रार दाखल करुन घेण्यात आली आहे. आरोपींना लवकरात लवकर अटक करण्यात येईल.”

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.