पिंपरी चिंचवडमध्ये कोरोनाचा कहर सुरुच, कोणत्या प्रभागात किती रुग्ण?

पिंपरी चिंचवड शहरात आज (21 मे) दिवसभरात 13 रुग्णांना ‘कोरोना’ची लागण झाल्याचं समोर आलं आहे (Pimpari Chinchwad Ward wise Corona Patients).

पिंपरी चिंचवडमध्ये कोरोनाचा कहर सुरुच, कोणत्या प्रभागात किती रुग्ण?
Follow us
| Updated on: May 21, 2020 | 10:37 PM

पुणे : पिंपरी चिंचवड शहरात आज (21 मे) दिवसभरात 13 रुग्णांना ‘कोरोना’ची लागण झाल्याचं समोर आलं आहे (Pimpari Chinchwad Ward wise Corona Patients). त्यामुळे पिंपरी चिंचवडमधील कोरोनाबाधितांची संख्या 252 वर पोहोचली आहे. शहरातील निगडी, प्रधिकरण, आकुर्डी परिसर कोरोनाचे हॉटस्पॉट ठरत आहेत. या भागात सर्वाधिक 48 रुग्ण आढळले आहेत.

पिंपरी चिंचवडमध्ये आतापर्यंत 154 नागरिकांनी कोरोनावर मात केली आहे. यामध्ये शहरातील 142 तर शहराबाहेरील 12 रुग्णांचा समावेश आहे. तर कोरोनामुळे आतापर्यंत 16 रुग्णांचा मृत्यू झाला आहे (Pimpari Chinchwad Ward wise Corona Patients).

पिंपरी चिंचवड शहरातील 7 कोरोना रुग्णांचा आतापर्यंत मृत्यू झाला, तर शहराबाहेरील 9 कोरोना रुग्णांना प्राण गमवावे लागले. महापालिका रुग्णालयात उपचार सुरु असलेल्या रुग्णांची संख्या 93 इतकी आहे.

पिंपरी चिंचवड महानगरपालिका 21 मे 2020 पर्यंतची कोरोना पॉझिटिव्ह आणि रुग्णालयात दाखल असलेल्या रुग्णांची क्षेत्रीय कार्यालयनिहाय आकडेवारी :

1) प्रभाग अ – निगडी, प्रधिकरण, आकुर्डी- 48

2) प्रभाग ब – काळेवाडी, चिंचवड, रावेत- 06

3) प्रभाग क – इंद्रायणीनगर, नेहरुनगर, अजमेरा कॉलनी – 02

4) प्रभाग ड – वाकड, पिंपळे-सौदागर, ताथवडे – 04

5) प्रभाग ई – भोसरी, मोशी, चऱ्होली – 18

6) प्रभाग फ – यमुनानगर, तळवडे, चिखली – 07

7) प्रभाग ग – पिंपरी थेरगाव रहाटणी – 05

8) प्रभाग ह – दापोडी कासरवाडी सांगवी – 03

पुण्यात आज किती रुग्ण वाढले?

पुण्यात कोरोनाबाधितांचा आकडा वाढत चालला आहे. पुण्यात आज 208 नवीन कोरोनाबाधितांची भर पडली आहे. त्यामुळे पुण्यातील कोरोनाबाधितांची संख्या 4 हजार 107 वर पोहोचली आहे. तर दिवसभरात एकूण 7 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. पुण्यात आतापर्यंत 227 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. पुण्यात आज दिवसभरात 159 रुग्णांनी कोरोनावर मात केली. त्यामुळे त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. पुण्यात आतापर्यंत 2,182 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. सध्या पुण्यात 1,698 रुग्णांवर उपचार सुरु आहे.

संबंधित बातम्या :

Maharashtra Corona | राज्यात कोरोनाचे 2,345 नवे रुग्ण, बाधितांचा आकडा 41 हजार 642 वर

Pune Corona | पुण्यात सात रुग्णांचा मृत्यू, जनता वसाहतीला कोरोनाचा विळखा

Non Stop LIVE Update
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.
मतदार निघाले मतदान करायला पण EVM मशीनच बंद, कुठं घडला प्रकार?
मतदार निघाले मतदान करायला पण EVM मशीनच बंद, कुठं घडला प्रकार?.
लोकसभेच्या मतदानाचा आज दुसरा टप्पा, महाराष्ट्रात या 8 मतदारसंघात मतदान
लोकसभेच्या मतदानाचा आज दुसरा टप्पा, महाराष्ट्रात या 8 मतदारसंघात मतदान.
नो खैरे ओन्ली भूमरे...शिंदेंचं आवाहन, फडणवीसांनी काढली विरोधकांची औकात
नो खैरे ओन्ली भूमरे...शिंदेंचं आवाहन, फडणवीसांनी काढली विरोधकांची औकात.
भरसभेत पवारांनी लावला मोदींचा व्हिडीओ, तर शिंदे-फडणवीसांकडून पलटवार
भरसभेत पवारांनी लावला मोदींचा व्हिडीओ, तर शिंदे-फडणवीसांकडून पलटवार.
बीडमध्ये जातीचं कार्ड कोण खेळतंय? कुणबीपत्रावरून धनंजय मुंडेंचं विधान
बीडमध्ये जातीचं कार्ड कोण खेळतंय? कुणबीपत्रावरून धनंजय मुंडेंचं विधान.
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.