AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Non AC Train | 1 जूनपासून वेळापत्रकानुसार 200 नॉन AC रेल्वे सुरु, रेल्वे मंत्र्यांची घोषणा

स्थलांतरित मजुरांसाठी 15 विशेष ट्रेन सुरु केल्यानंतर (Piyush Goyal on Non AC train) भारतीय रेल्वे हळूहळू रुळावर येताना दिसत आहे.

Non AC Train | 1 जूनपासून वेळापत्रकानुसार 200 नॉन AC रेल्वे सुरु, रेल्वे मंत्र्यांची घोषणा
आता मोदी सरकार छोट्या व्यावसायिकांना भारतीय रेल्वेसोबत (Indian Railway) काम करून पैसे कमावण्याची सुवर्णसंधी देत आहे.
| Updated on: May 19, 2020 | 10:55 PM
Share

नवी दिल्ली : स्थलांतरित मजुरांसाठी 15 विशेष ट्रेन सुरु केल्यानंतर (Piyush Goyal on Non AC train) भारतीय रेल्वे हळूहळू रुळावर येताना दिसत आहे. रेल्वे मंत्री पीयूष गोयल यांनी एक मोठी घोषणा केली आहे. येत्या 1 जूनपासून देशभरात 200 नॉन एसी रेल्वे गाड्या नियोजित वेळेनुसार धावणार आहेत. रेल्वे मंत्र्यांनी ट्विटवर याबाबत माहिती दिली आहे (Piyush Goyal on Non AC train).

“भारतीय रेल्वे 1 जून पासून नियोजित वेळापत्रकानुसार दररोज 200 एसी रेल्वे सुरु करणार आहे. या रेल्वेंसाठी तिकिट बुकिंग लवकरच सुरु करण्यात येईल. रेल्वे प्रशासनाच्या या निर्णयामुळे देशभरात अडकलेल्या स्थलांतरित मजुरांना दिलासा मिळेल”, असं पीयूष गोयल म्हणाले आहेत.

“देशातील सर्व राज्य सरकारांना विनंती आहे की, त्यांनी मजुरांना मदत करावी. मजुरांची नाव नोंद करुन त्याची अचूक माहिती रेल्वे प्रशासनाला द्यावी, जेणेकरुन मजुरांना विशेष ट्रेनमार्फत त्यांच्या गावी सोडता येईल”, अशी विनंती रेल्वे मंत्र्यांनी देशातील सर्व राज्य सरकारांना केली आहे.

भारतीय रेल्वे प्रशासनाने देशभरात अडकलेल्या मजुरांना आपापल्या घरी सोडण्यासाठी विशेष ट्रेन सुरु केल्या आहेत. रेल्वे प्रशासनाने आतापर्यंत 21.5 लाख स्थलांतरित मजुरांना आपापल्या नियोजित स्थळी पोहोचवलं आहे.

भारतीय रेल्वे प्रशासनाने देशभरात अडकलेल्या सर्व स्थलांतरित मजुरांना संयम बाळगण्याचा सल्ला दिला आहे. सर्व मजुरांना आपापल्या घरी पोहोचवण्यासाठी रेल्वे प्रशासनाकडून नियोजन आखलं जात आहे. यासाठी केंद्र सरकारसोबत योग्य समन्वय साधलं जात आहे, अशी माहिती रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार.
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार.