माझा बाप्पा किती गोड दिसतो, सुरेश वाडकरांच्या नातीचे पहिलंच गाणे हिट

सुप्रसिद्ध गायक सुरेश वाडकर यांच्या 6 वर्षीय नातीने गाणं गायलं आहे. दिया वाडकर असे या चिमुरडीचे नाव (Deeya Wadkar sing Majha Bappa Song) आहे.

माझा बाप्पा किती गोड दिसतो, सुरेश वाडकरांच्या नातीचे पहिलंच गाणे हिट
Namrata Patil

|

Sep 01, 2020 | 12:23 AM

नवी मुंबई : सध्या सगळीकडे गणेशोत्सवाचा आनंद ओसांडून वाहत आहे. मात्र कोरोनामुळे यंदाचा गणेशोत्सव अगदी साध्या पद्धतीने महाराष्ट्रासह संपूर्ण देशभरात साजरा होत आहे. नुकतंच सुप्रसिद्ध गायक सुरेश वाडकर यांच्या 6 वर्षीय नातीने गाणं गायलं आहे. दिया वाडकर असे या चिमुरडीचे नाव आहे. सध्या सोशल मीडियावर या चिमुकलीचे नाव हिट होत आहे. (Suresh Wadkar Granddaughter Deeya Wadkar sing Majha Bappa Song)

गणेशोत्सवात नैवेद्यासोबत नेहमी बाप्पाच्या विविध गाण्यांची रेलचेल आपल्याला पाहायला मिळते. माझा बाप्पा किती गोड दिशतो असे या गाण्याचे नाव आहे. सध्या हे गाणे प्रेक्षकांची मने जिंकत आहे.

कोळीवुड प्रोडक्शनने हे गाणं निर्मिती केली आहे. गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर हे गाणं युट्यूबर प्रदर्शित करण्यात आलं आहे. या गाण्याला “पोरी माझे मनानं” आणि “माझा पिल्लू” सारखे सुपरहिट गाणी सादर केली आहे. ही गाणी सादर करणाऱ्या प्रवीण कोळी यांनी संगीतबद्ध केलं आहे. अवघ्या 7 दिवसांमध्येच या गाण्याला 15 लाखांहून अधिक प्रेक्षकांनी पाहिले आहेत.

या गाण्याचे संपूर्ण चित्रीकरण बेलापूरसहित रायगड जिल्ह्यातील पेण, गोरगाव आणि रसायनीमध्ये करण्यात आले आहेत. या गीताचे संगीत संयोजन तेजस पाडावे यांनी केले आहे.

दियाने गायिलेल्या बाप्पाच्या या गाण्याने फक्त महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण जगभरातील रसिकांची मने जिंकली. या गाण्याच्या व्हिडीओसाठी मितेश तांडेल, संदेश कोळी यांच्यासह संपूर्ण टीमचे मोलाचे सहकार्य लाभले आहेत. (Suresh Wadkar Granddaughter Deeya Wadkar sing Majha Bappa Song)

संबंधित बातम्या :

शिवसेना नगरसेवकाकडून कपिल शर्माचे आभार, चार वर्ष जुन्या वादावर पडदा

लता मंगेशकर राहत असलेली इमारत सील, प्रभुकुंज सोसायटी परिसरात कोरोना रुग्ण आढळल्याने खबरदारी

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें