AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

शिवसेना नगरसेवकाकडून कपिल शर्माचे आभार, चार वर्ष जुन्या वादावर पडदा

'द कपिल शर्मा शो'मध्ये डॉक्टरांनी मुख्यमंत्री, राज्य सरकार आणि मुंबई महापालिकेच्या कामाचे कौतुक केले. या क्लिपचा शिवसेनेकडून समाज माध्यमांवर प्रसार करण्यात आला

शिवसेना नगरसेवकाकडून कपिल शर्माचे आभार, चार वर्ष जुन्या वादावर पडदा
| Updated on: Aug 31, 2020 | 11:50 AM
Share

मुंबई : कॉमेडी किंग कपिल शर्मा आणि शिवसेना यांच्यातील जुना वाद अखेर संपुष्टात आला आहे. पाच लाखांच्या लाचेवरुन शिवसेनेची सत्ता असलेल्या मुंबई महापालिकेवर कपिल शर्माने चार वर्षांपूर्वी गंभीर आरोप केले होते. मात्र शिवसेनेने सोशल मीडियावर ‘कपिल शर्मा शो’चे गुणगान गायल्याने जुन्या वादावर पडदा पडल्याचे चित्र आहे. (Shivsena Kapil Sharma Old Controversy solved as Party praises The Kapil Sharma Show Doctors Special Episode)

‘द कपिल शर्मा शो’मध्ये खाजगी डॉक्टरांना आमंत्रित केलं होतं. कोविड काळात बजावलेल्या कर्तव्याबद्दल डॉक्टरांचा सन्मान करण्यात आला. यावेळी डॉक्टरांनी आपल्याला आलेले अनुभव सांगितले. डॉक्टरांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राज्य सरकार आणि मुंबई महापालिकेच्या कामाचे कौतुक केले. या कौतुकाच्या क्लिपचा शिवसेनेकडून समाज माध्यमांवर प्रसार करण्यात आला आहे. शिवसेना नगरसेवक अमेय घोले यांनी व्हिडीओ ट्वीट करत कपिल शर्माचेही आभार व्यक्त केले आहेत.

“कपिल शर्मा पाजी, सर्वांचे मनोरंजन, आनंद पसरवणे आणि मानवता टिकवून ठेवण्यासाठी आभार” असेही अमेय घोले यांनी लिहिले आहे.

(Shivsena Kapil Sharma Old Controversy solved as Party praises The Kapil Sharma Show Doctors Special Episode)

शिवसेना संघटक विनय शुक्ला यांनीही व्हिडीओ शेअर केला आहे.

काय होता वाद?

कपिल शर्मा आणि शिवसेना यांच्यात चार वर्षांपूर्वी टोकाचा वाद झाला होता. गेली पाच वर्षे 15 कोटी आयकर भरुनही आपल्या कार्यालयाच्या बांधकामासाठी आपल्याला महापालिकेला 5 लाखांची लाच द्यावी लागते, असा आरोप कपिल शर्माने ट्विटरवर केला होता. यामध्ये त्याने थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना टॅग केलं होतं.

या ट्वीटमुळे कपिल शर्मा आणि शिवसेनेत मोठा वाद झाला होता. मुंबई महापालिकेत सत्ताधारी असलेल्या शिवसेनेने कपिल शर्माला लक्ष्य केले होते. कार्यालय अनधिकृत ठरवत महापालिकेने कारवाईही केली होती.

पंतप्रधान नरेंद्र मोदींना टॅग करत मुंबई महापालिकेच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केल्याने राज्यातील तत्कालीन सत्ताधारी राजकीय पक्ष भाजप कपिल शर्माच्या पाठीशी उभा राहिला होता. याच मुद्यावर शिवसेना विरुद्ध भाजप अशी आरोप-प्रत्यारोपांची मालिका रंगली होती.

(Shivsena Kapil Sharma Old Controversy solved as Party praises The Kapil Sharma Show Doctors Special Episode)

महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार.
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार.
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन.
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा.
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान.
महापालिकांमध्ये सत्तेचा पेच; महाराष्ट्रात पुन्हा ‘घोडेबाजार’ रंगणार?
महापालिकांमध्ये सत्तेचा पेच; महाराष्ट्रात पुन्हा ‘घोडेबाजार’ रंगणार?.