AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पंतप्रधान मोदींची पाचव्यांदा सर्व मुख्यमंत्र्यांशी व्हिडिओ कॉन्फरन्स, पुढील रणनीतीविषयी चर्चा होण्याचे संकेत

पंतप्रधान नरेंद्र मोदी सर्व राज्यातील मुख्यमंत्र्यांशी पुन्हा एकदा संवाद साधणार (PM Modi Video Conference with Chief Ministers on Lockdown) आहेत.

पंतप्रधान मोदींची पाचव्यांदा सर्व मुख्यमंत्र्यांशी व्हिडिओ कॉन्फरन्स, पुढील रणनीतीविषयी चर्चा होण्याचे संकेत
| Updated on: May 10, 2020 | 5:08 PM
Share

नवी दिल्ली : राज्यात कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे देशात लॉकडाऊन तिसऱ्यांदा वाढवण्यात आले आहे. मात्र काही ठिकाणी या लॉकडाऊनचे नियम शिथील केले होते. दरम्यान यानंतर पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी सर्व राज्यातील मुख्यमंत्र्यांशी व्हिडीओ कॉन्सफरसिंगद्वारे संवाद साधणार आहे. यात सर्व राज्यातील सर्व मुख्यमंत्र्यांना बोलण्याची संधी मिळणार आहे. त्यामुळे ही आतापर्यंत दीर्घकाळ चालणारी बैठक ठरणार आहे. (PM Modi Video Conference with Chief Ministers on Lockdown)

पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या (11 मे) दुपारी 3 वाजता सर्व राज्यातील मुख्यमंत्र्यांशी संवाद साधतील. या बैठकीला सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांचे मुख्यमंत्री उपस्थित राहतील. या बैठकीत देशातील लॉकडाऊनच्या पुढील रणनीतीविषयी चर्चा होण्याचे संकेत आहेत. येत्या सोमवारी पंतप्रधानांची पाचव्यांदा सर्व मुख्यमंत्र्यांशी व्हिडिओ कॉन्फरन्स होणार आहे.

देशात सुरुवातीला 25 मार्च ते 14 एप्रिल यादरम्यान पहिला लॉकडाऊन जाहीर केला होता. त्यानंतर पंतप्रधान मोदींनी पुन्हा घोषणा करत लॉकडाऊन 3 मेपर्यंत वाढवला होता. मग केंद्रीय गृहमंत्रालयाने 17 मेपर्यंत लॉकडाऊन वाढवण्याची घोषणा केली होती.

  • यापूर्वीचा लॉकडाऊन (24 मार्च मध्यरात्रीपासून) 25 मार्च ते 14 एप्रिल 15 एप्रिल ते 3 मे 4 मे ते 17 मे

मात्र त्यादरम्यान भारतातील काही राज्यांची 3 झोनमध्ये विभागणी करण्यात आली होती. देशातील 319 जिल्हे हे ग्रीन झोनमध्ये आहेत. तर 284 जिल्हे हे ऑरेज झोनमध्ये असणार आहेत. ग्रीन आणि ऑरेंज झोनसाठी काही अटी-शर्ती शिथिल करण्यात येण्याची शक्यता आहे. मात्र रेड झोनमध्ये कडक संचारबंदी आणि काटेकोर प्रतिबंध असेल, असेही जाहीर करण्यात आले होते.

मोदी-मुख्यमंत्र्यांच्या बैठका

  • पहिली बैठक – 20 मार्च
  • दुसरी बैठक – 2 एप्रिल
  • दुसरी बैठक – 11 एप्रिल
  • तिसरी बैठक – 27 एप्रिल
  • पाचवी बैठक – 11 मे

पंतप्रधान मोदींनी आतापर्यंत पाच वेळा मुख्यमंत्र्यांशी अशाप्रकारे व्हिडीओ कॉन्सफरसिंगद्वारे संवाद साधला आहे. यातील प्रत्येक बैठकीनंतर मोदींनी मोठ्या घोषणा केल्या आहेत. त्यामुळे उद्या होणार बैठकीनंतरही अशाच प्रकारे मोठा निर्णय होण्याची शक्यता आहे.

(PM Modi Video Conference with Chief Ministers on Lockdown)

संबंधित बातम्या : 

Lockdown 3 | देशातील लॉकडाऊन 17 मेपर्यंत वाढवला

पंतप्रधानांची तिसऱ्यांदा सर्व मुख्यमंत्र्यांशी व्हिडिओ कॉन्फरन्स, 3 मेनंतरच्या रणनीतीविषयी चर्चेची शक्यता

राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना.
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं.
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न.
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी.
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण.
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर.
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी.
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान.
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप.
भाजपच्या धोरणांवर वर्षा गायकवाड यांचा हल्लाबोल
भाजपच्या धोरणांवर वर्षा गायकवाड यांचा हल्लाबोल.