AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Indian Railways : देशाला एक साथ मिळणार 10 वंदे भारत एक्सप्रेस, PM मोदी 15 सप्टेंबर रोजी दाखविणार हिरवा झेंडा

वंदेभारत 'मेक इन इंडिया' अंतर्गत तयार केलेली पहिली सेमी हायस्पीड ट्रेन आहे. या ट्रेनचा कमाल वेग दर ताशी 160 किमी इतका आहे. सध्या देशाच्या अनेक राज्यात 100 हून अधिक वंदेभारत ट्रेन सुरु आहेत. देशातील 24 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशातील 280 हून अधिक जिल्ह्यांना वंदेभारतने कव्हर केले आहे.

Indian Railways : देशाला एक साथ मिळणार 10 वंदे भारत एक्सप्रेस, PM मोदी 15 सप्टेंबर रोजी दाखविणार हिरवा झेंडा
Vande bharat
| Updated on: Sep 11, 2024 | 10:18 PM
Share

भारतीय रेल्वे प्रवाशांचा प्रवास आरामदायी आणि वेगवान करणाऱ्या वंदेभारत एक्सप्रेसना आता आणखीन विस्तार केला जात आहे. येत्या 15 सप्टेंबरला पंतप्रधान नरेंद्र मोदी तब्बल दहा वंदेभारत एक्सप्रेसना हिरवा झेंडा दाखविणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी झारखंडच्या जमशेदपूर हून वंदेभारत एक्सप्रेसना हिरवा झेंडा दाखविणार आहेत. पहिल्यांदा एवढ्या मोठ्या प्रमाणावर वंदेभारत एक्सप्रेसना हिरवा झेंडा दाखविला जाणार आहे. देशात पहिली वंदेभारत एक्सप्रेस दिल्ली ते वाराणसी मार्गावर साल 2019 मध्ये चालविली होती. आतापर्यंत देशात शंभरहून अधिक वंदेभारत एक्सप्रेस धावत आहेत.

या राज्यांना मिळणार नवी वंदे भारत

वंदेभारत ही देशाची पहिली सेमी हायस्पीड ट्रेन आहे. ही ट्रेन इंजिन लेस असल्याने इंजिन बदल्याचा त्रासातून मुक्ती झालेली आहे. आता दहा नवीन वंदेभारतना पंतप्रधान नरेंद्र मोदी झारखंड राज्यातील जमशेदपूरहून हिरवा झेंडा दाखविणार आहेत. आता पर्यंत झारखंड, बिहार, पश्चिम बंगाल, ओदीशा, आंध्र प्रदेश, महाराष्ट्र, तेलंगाना, कर्नाटक, छत्तीसगढ़ आणि उत्तर प्रदेश या राज्यांना वंदेभारत एक्सप्रेस मिळाल्या आहेत.

आता नवीन वंदेभारतपैकी बहुतांशी वंदेभारत या बिहारवरुन जाणार आहेत. येत्या काही दिवसात झारखंड राज्यात विधानसभेच्या निवडणूका आहेत. त्यामुळे पंतप्रधान येत्या 15 सप्टेंबर रोजी जमशेदपूरला पोहचणार आहेत. 15 सप्टेंबर रोजी किमान तीन आणखी वंदे भारत एक्सप्रेस ओदीशा राज्यातून जाणार असल्याचे ईस्ट कोस्ट रेल्वेने म्हटले आहे.

ओदीशा मिळणार 3 नवीन वंदे भारत

ओदीशाहून सुटणाऱ्या तीन नवीन वंदेभारत टाटा-बरहामपुर, राऊरकेला-हावडा आणि दुर्ग-विशाखापट्टनम अशा आहेत. या दहा वंदेभारत ट्रेन पैकी असून पंतप्रधान त्यांचे उद्घाटन करणार आहेत. ओदिशातील पायाभूत सुविधांची निर्मिती करण्यासाठी केंद्राने साल 2024-25च्या अर्थसंकल्पात 10,586 कोटी रुपयांची तरतूद केली आहे.

महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.