आता मीम बनणार, सूर्यग्रहण पाहतानाच्या मोदींच्या फोटोवर प्रतिक्रिया, मोदी म्हणाले…

सामान्य नागरिकांप्रमाणेच पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देखील सूर्यग्रहण पाहण्यासाठी उत्साहित होते. मात्र, ढगाळ वातावरणामुळे ते सूर्यग्रहण पाहू शकले नाही. मोदींनी ट्विटरवर त्यांचे काही फोटो शेअर केले

आता मीम बनणार, सूर्यग्रहण पाहतानाच्या मोदींच्या फोटोवर प्रतिक्रिया, मोदी म्हणाले...

मुंबई : देशभरातील जनतेने आज (26 डिसेंबर) दशकातील शेवटचं सूर्यग्रहण पाहिलं (Solar Eclipse). हे पूर्ण सूर्यग्रहण नसून कंकणाकृती सूर्यग्रहण होतं. हे ग्रहण देशातील दक्षिण भाग केरळ, कर्नाटक आणि तामिळनाडूमध्ये दिसेलं, तर महाराष्ट्रासह देशातील इतर भागात खंडग्रास ग्रहण दिसलं. भारतीय वेळेनुसार, सकाळी आठ वाजेपासून ते दुपारी 11 वाजेपर्यंत होतं. सामान्य नागरिकांप्रमाणेच पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देखील सूर्यग्रहण पाहण्यासाठी उत्साहित होते. मात्र, ढगाळ वातावरणामुळे ते सूर्यग्रहण पाहू शकले नाही. मोदींनी ट्विटरवर त्यांचे काही फोटो शेअर केले (PM Narendra Modi Tweet).

‘इतर भारतीयांप्रमाणे मी देखील सूर्यग्रहण पाहण्यासाठी अत्यंत उत्साहित होतो. मात्र, ढगाळ वातावरणामुळे मी सूर्याला पाहू शकलो नाही. पण मी कोझीकोड आणि इतर भागातील ग्रहणाची झलक लाईव्ह स्ट्रीमवर पाहिली. विशेषज्ञांसोबत चर्चा करुन या विषयावरील ज्ञान समृद्ध केलं’, असं ट्वीट मोदींनी केलं. यासोबत मोदींनी काही फोटोही ट्वीट केले. यावर एका ट्विटर युझरने मोदींच्या सूर्यग्रहण पाहणाऱ्या फोटोला शेअर करत आता यावर मीम बनतील असं म्हटलं. यावर मोदींनी मजेशिर उत्तर दिलं.

तुमचं स्वागत आहे, आनंद घ्या

युझरच्या ट्वीटवर पंतप्रधान मोदींनी मजेशिर प्रतिक्रिया दिली. त्यांच्या ट्वीटला रिट्वीट करत मोदी म्हणाले ‘तुमचं स्वागत आहे, आनंद घ्या’.

मफलरवर केजरीवालचं उत्तर

मोदींनी ट्वीट केलेल्या फोटोंमध्ये मफलर परिधान केलं आहे. यावरुन ट्विटर युझर अरुण अरोरा नावाच्या युझरने दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना टॅग करत त्यांची चेष्टा करण्याचा प्रयत्न केला. यावर अरविंद केजरीवाल यांनीही अरुण अरोरा यांना उत्तर दिलं. अरुण अरोरा यांनी विचारलं की, ‘हेलो अरविंद केजरीवाल, यावेळी आतापर्यंत मफलर बाहेर नाही आलं. थंडीही खूप आहे, जनता विचारत आहे सर’. यावर अरविंद केजरीवाल म्हणाले, ‘मफलरतर कधीच निघाला. तुम्ही लोकांनी लक्ष दिलं नाही. थंडी खूप जास्त आहे. सर्वांनी स्वत:ची काळजी घ्या’.

PM Narendra Modi reaction on Twitter users tweet

Published On - 6:37 pm, Thu, 26 December 19

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI